क्रिकेटच्या दुनियेत अनेक महान क्रिकेटर झाले, त्यापैकी एक भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा सुद्धा आहे. ११ जानेवारी १९७३ मध्ये इंदोर शहरात जन्मलेल्या राहुल द्रविडचा काही दिवसांअगोदरच ४८ वा जन्मदिवस साजरा झाला. क्रिकेटजगतात त्याला ‘द वॉल’ नावाने सुद्धा ओळखलं जातं. भारतीय क्रिकेट संघात आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याने करोडों चाहत्यांचे हृदय जिंकले आहेत. परंतु त्याचे हृदय जिंकणाऱ्या मुलीचे नाव आहे विजेता पेंढारकर. विजेता पेंढारकर हिच्यावर राहुल खूप प्रेम करतो. ती त्याची पत्नी आणि एक चांगली मैत्रीण दोन्ही आहे. दोघांची प्रेमकहाणी कोण्या चित्रपटापेक्षा कमी नाही. हि एक प्रेम आणि अरेंजमॅरेजचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सर्वांनी राहुलच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेकवेळा वाचलं असेल, परंतु त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. चला तर जाणून घेऊया दोघांच्या प्रेम कहाणीविषयी.
विजेताचे वडील इंडियन एअरफोर्समध्ये असल्याकारणाने त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली हि आलीच. त्यामुळे विजेता देखील अनेक शहरं फिरली आहे. भारतीय एअरफोर्समध्ये विंग कमांडर असणाऱ्या विजेताच्या वडिलांच्या बदली देशाच्या वेगवेगळ्या भागात होत होत्या. जेव्हा तिचे वडील निवूत्त झाले तेव्हा आपल्या कुटुंबासोबत नागपूरमध्ये वास्तव्य केले. इथूनच विजेताने २००२ मध्ये सर्जरीमध्ये आपले पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केले होते. खरंतर दोघांची फिल्ड वेगवेगळी होती. विजेताला वैद्यकीय तर राहुलला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. परंतु बोलतात ना प्रेम हे व्हायचे ते कसंही होऊन जातेच. खरंतर दोघांचे कुटुंब हे एकमेकांना खूप काळापासून ओळखत होते. अगदी राहुल द्रविडच्या जन्माच्या अगोदर पासूनच. आपल्या नोकरीच्या दिवसात विजेताच्या वडिलांची १९६८ मध्ये बंगलोर मध्ये पोस्टिंग झाली होती. इथेच तिच्या कुटुंबाचे राहुल द्रविडच्या कुटुंबाशी भेट झाली होती. दोन्ही कुटुंबदरम्यान चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबाची एकमेकांकडे उठबस होऊ लागली. दरम्यान राहुल आणि विजेता देखील एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. लवकरच दोघांची मैत्री प्रेमात बदलली. जेव्हा कुटुंबातील लोकांना दोघांच्या नात्याबद्दल माहिती पडलं तेव्हा ते सुद्धा लग्नासाठी लगेच राजी झाले, आणि ते सुद्धा दोघांसाठी खूप खुश होते.
कुटुंबांनी दोघांचे लग्न २००२ मध्येच ठरवलं होते. परंतु राहुलला पुढच्या वर्षी म्हणजेच २००३ मध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासाठी सांगितले. कुटुंबांनी त्याची हि मागणी मान्य केली. परंतु वर्ल्ड कप खेळायला जाण्याअगोदरच त्यांनी राहुल आणि विजेताचा साखरपुडा केला. जेव्हा वर्ल्डकप होत होता तेव्हा तिथे त्याला सपोर्ट करण्यासाठी विजेता सुद्धा दक्षिण आफ्रिकेला गेली होती. काही महिन्यानंतर वर्ल्डकप संपलं आणि राहुल घरी परतला. ह्यानंतर त्याने ४ मे २००३ ला बंगलोरमध्ये विजेतासोबत लग्न केले. हे लग्न संपूर्ण पारंपरिक विधीनुसार संपन्न झाले. लग्नानंतर २००५ मध्ये विजेता आणि राहुल पहिल्यांदा पालक बनले. त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला ज्याचे नाव समित ठेवले गेले. २००९ साली त्यांना अजून एक मुलगा झाला ज्याचे नाव अन्वय असे आहे. सध्या राहुल आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत आहे. दोघांनाही आपल्या मराठी गप्पातर्फे आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.