जसजसं लॉकडाऊन शिथिल होत गेले तसतसं लग्नसोहळे पार पडायला सुरुवात झाली. अनेकांनी मग लग्नसोहळे उरकून घेतले. ह्यात मराठी सेलेब्रिटी सुद्धा मागे राहिले नाहीत. मराठी कलाकार आणि त्यांची लग्न, साखरपुडे हे गेल्या काही काळात मनोरंजक गप्पांचा महत्वाचा भाग झाले होते. यात काही सेलिब्रिटीजच्या साखरपुड्याची आणि लग्नाची विशेष चर्चा झाली होती. सई लोकूर, अभिज्ञा भावे, कार्तिकी गायकवाड, शाश्वती पिंपळीकर ह्या सारख्या मराठी सेलेब्रेटींची विवाहसोहळे गेल्या काही महिन्यात पार पडले. काहींनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधणार असं सांगितलं होतं. यातील एका अभिनेत्रीनच्या लग्नाचे विधी गेल्या ४-५ दिवसांपासून चालू होते आणि त्याबद्दल चे फोटोज तिच्या सोशल मिडियावरती दिसून येत आहेत. नुकताच ह्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने आज म्हणजेच १९ जानेवारीला २०२१ रोजी लग्न केले आहे. चला तर जाणून घेऊया कि नक्की कोण आहे हि मराठमोळी अभिनेत्री.
या अभिनेत्रीचं नाव आमच्या सुजाण वाचकांनी ओळखलं असेलंच. ही अभिनेत्री आहे मानसी नाईक. उत्कृष्ठ नृत्यांगना आणि अभिनेत्री असा नावलौकिक असणाऱ्या मानसी ने गेल्या वर्षी आपल्या प्रेमाची कबुली आपल्या चाहत्यांना दिली होती. तिच्या वाढदिवशी ३ फेब्रुवारी २०२० ला तिने परदीप खरेरा याच्या सोबत असलेल्या रिलेशनशिप बद्दल माहिती दिली होती. तेव्हा पासून या गोड जोडीची हवा पूर्ण मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये होती. त्यांच्या या प्रवासातील पुढील टप्पा हा साखरपुड्याचा होता. मग उत्सुकता होती ती त्यांच्या लग्नाची. यातील विधींची सुरुवात १५-१६ जानेवारीला झाली आहे ती हळदीच्या समारंभाने. मानसी आणि परदीप यांचं लग्न हे आज १९ जानेवारीला संपन्न झाले आहे. हळदीला सुरुवात झाल्यापासून मानसीने आणि परदीप यांनी लग्नाच्या विविध विधींचे फोटोज टाकण्यास सुरुवात केली. यात हळदी पासून ते कुटुंबियांसमवेत घरी केलेले विधी यांचे फोटोज आहेत. या प्रसंगी दोन्ही कुटुंबे एकदम प्रसन्न वातावरणात वावरताना दिसताहेत. तसेच नवराई असलेलली मानसी ही तिच्या साडीच्या पेहरावात एकदम सुंदर दिसते आहे. तसेच तिने नुकताच एक इन्स्टाग्राम रील शेअर केला होता. ज्यात तिची आई एक उत्तम उखाणा घेताना दिसत आहे. एकूणच पूर्ण नाईक आणि खरेरा कुटुंब रंगलंय मानसी परदीप च्या लग्नात असं म्हंटल्यास योग्य ठरेल. तसेच या आनंदात मानसी ची अतिशय जवळची मैत्रीण असणाऱ्या उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
येत्या काळात या जोडीचे आणि त्यांच्या मंगल कार्याचे व्हिडीओज आणि फोटोज चाहत्यांच्या भेटीस येतीलच. या निमित्ताने मानसी आणि परदीप यांच्या चाहत्यांनी या नवपरिणीत जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. परदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि मॉडेल ही आहे. समाज जीवनात आपापल्या कारकिर्दीत दोघेही आघाडीवरचे शिलेदार आहेत. या दोघांचा एकत्र प्रवास हा नेहमीच आनंददायक आणि उत्तम राहिला आहे व पुढेही असाच आनंददायी राहो. मराठी गप्पाच्या टिमकडून मानसी नाईक आणि परदीप यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! वर उल्लेख केल्याप्रमाणे मानसी आणि परदीप यांचा साखरपुडा हा काही काळ आधी झाला होता. त्याविषयी आमच्या टीमने एक लेख लिहिला होता. तसेच इतर नवपरिणीत सेलिब्रिटी जोड्यांविषयी सुद्धा लेखन केलेलं आहे. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्द असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात लग्न साखरपुडा असं लिहून सर्च करा. आपल्याला अनेक लेखांची मेजवानी वाचायला मिळेल. आपल्या वाचक प्रेमासाठी मनापासून धन्यवाद !