Breaking News
Home / मनोरंजन / मराठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

मराठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये अनेक वेळेस शाळेतल्या आठवणी डोकावतात. त्यात वर्गमित्र आणि मैत्रिणींच्या सोबत केलेली धमाल आठवते. सर किंवा बाईंच्या तासाला केलेल्या खोड्या तर हटकून आठवतात. मग मिळालेला मार सुद्धा आठवतो. पण आज तीच शिक्षक मंडळी जेव्हा आपल्याला भेटतात आणि तोंडभरून कौतुक करतात तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. बरं या शिक्षकांकडून केवळ मार खाण्याच्या आठवणी नसतात. अनेक वेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्याच्या आठवणी सुद्धा असतात. त्यावेळी त्यांनी केलेलं अमूल्य मार्गदर्शन आजही आठवतं. आज हे सगळं आठवायचं कारण आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक समारंभात झालेल्या एका डान्सचा. मराठमोळ्या शाळेतील या समारंभात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. पण यातही एक डान्स सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनून राहतो.

हा डान्स असतो काही चिमुकल्या मुलींनी त्यांच्या शिक्षकांसोबत केलेला एक मस्त डान्स. व्हिडियो सुरू होताना आपल्याला सहा मुली दोन रांगांमध्ये उभ्या असलेल्या दिसून येतात. या सहा जणींच्या मध्यभागी उभे असतात त्यांचे शिक्षक. मुलींनी छान साड्या नेसल्या असल्या तरी त्यावर गॉगल्स घातलेले असतात. तेव्हाच कळतं काहीसा वेगळा डान्स बघायला मिळणार आहे. हे गाणं सुरू होतं आणि ही सगळी मंडळी छान नाचायला लागतात. गाणं मस्त डान्स करण्यास उद्युक्त करणारं असतं. पण सोबतच आजूबाजूला एवढा आवाज असतो की गाणं व्यवस्थित ऐकू येत नाही. पण तसं असलं तरीही आपण जे संगीत ऐकायला येतंय त्यावर ताल धरत असतो. याला कारण स्टेज वर असलेली ही मंडळी सुद्धा असतात. त्यांच्या डान्सनुसार जागच्या जागी ते स्टेप्स करत असतात. पण छान नाचतात. त्यातल्या त्यात त्यांचे शिक्षक मात्र पुढे मागे जात वेगवेगळ्या स्टेप्स करत असतात. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे त्यांना आयोजकांकडूनही प्रोत्साहन मिळत असतं. सोबत इतर उपस्थित असतातच.

एकदा तर एक कॅमेरामन दादांनाही त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. त्याचवेळी या सरांनी हातात छत्री धरलेली असते. त्यांच्या स्टेप्स मध्ये वैविध्य असतं. कदाचित त्यांनीच हा परफॉर्मन्स बसवला असावा असं वाटून जातं. कारण काही काही स्टेप्स ते स्वतः करून दाखवतात आणि मुलींना ही प्रोत्साहन देतात. हा व्हिडियो चार मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा आहे. पण बघून मजा येते. शेवट तर गोड आहेच. शिक्षक पुढे आणि मागे या सगळ्या चिमुकल्या अशी एक रेलगाडी बनवत ते स्टेजवरून खाली जातात आणि परफॉर्मन्स संपतो. हल्ली सगळे व्हिडियोज कमी वेळेचे असतात. पण जास्त वेळेचा असूनही हा व्हिडियो मात्र पुन्हा एकदा तरी पहावा असं नक्की वाटून जातं. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही तसंच वाटलं असणार हे नक्की.

सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणारच. आपण नेहमीच आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता आणि अनेक सकारात्मक सूचना ही करत असता. या दोहोंतून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकता येतात. त्यांचा फायदा लेख लिहिताना होतो आणि उत्तमोत्तम लेख लिहिले जातात. तेव्हा आपल्या या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा. आपला स्नेह दिवसेंदिवस वाढत राहू दे आणि आपला आमच्या टीमवरचा लोभ कायम असू द्या. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.