Breaking News
Home / बॉलीवुड / मलाईकासोबत लग्न करणार का विचारल्यावर अर्जुन कपूरने दिले उत्तर

मलाईकासोबत लग्न करणार का विचारल्यावर अर्जुन कपूरने दिले उत्तर

बॉलिवूडच्या जोड्यांचे कधी काय होईल सांगता येत नाही. कोणाचे कुणाबरोबर कधी सूत जमेल हे हि सांगता येत नाही. बॉलिवूडच्या अनेक जोड्या ह्याबाबतीत चर्चेत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर. जेव्हा पासून मलाईका अरबाज खान पासून वेगळी झाली आहे तेव्हा पासून तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही चर्चेत असतात. यांची चर्चा बॉलिवूड ते गल्लीबोळात होत असते. लोकांनी त्यांना जोडी कपल्स केलंय, पण अर्जुन कपूर आणि मलाईका अरोराकडून अजून ही गोष्ट समोर आली नाही. भलेही दोघांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसेल, पण ते दोघेही सतत सोबत दिसतात. देशात परदेशात सर्व ठिकाणी ते सोबत दिसतात.

नेहमीप्रमाणे अर्जुन समोर लग्नाचा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर अर्जुनने बहिणी जान्हवी आणि खुशी बद्दल सुद्धा सांगितले. मलाईका सोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन म्हणाला,

“आता पर्यंत यावर काही निर्णय झाला नाही. परंतु लग्नाबद्दल काहीही निर्णय झाला की आम्ही तुम्हाला सांगू. लग्नाच आम्ही सर्वांना आमंत्रण देऊच. पण आता आम्ही अजून याचा विचार केलेला नाहीये.” त्याने पुढे प्रश्न विचारून म्हटले, “आपण सर्वांना आमच्या कुटुंबातील लग्नाच्या पद्धती बद्दल ठाऊक आहे. काय तुम्हांला असं वाटतं का कि माझी फॅमिली मला लपून लग्न करण्याची परवानगी देईल.”

 

लग्नाशिवाय अर्जुन आपल्या बहिणींबद्दल मोकळ्याने बोलला. तो म्हणाला, “मला यावर जास्त बोलणे मला पटत नाही. कारण मला वाटते कि यामुळे नजर लागते. माझ्या आणि माझ्या बहिणी सोबत इतर भाऊ बहिणी प्रमाणे नाते आहे. आम्ही किती बोलू या बाबतीत. जर बोललो तर लोकं म्हणतील, हा प्रसिद्धीसाठी त्यांचा वापर करत आहे. माझ्या जवळ अशा नकारात्मक गोष्टीसाठी वेळ नाही.” मलाईका आणि अर्जुन सतत सोबत वेळ घालवताना दिसतात. दोघेजण सतत आपले ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकताना दिसतात. अर्जुन कपूरचा येणारा चित्रपट ‘पानीपत’आहे. त्यातच मलाईका अरोरा टीवी रियालिटी शोमध्ये जज म्हणून दिसुन आलेली आहे. आता हे पाहूया, अर्जुन आणि मलाईका कधी आपल्या लग्नाची बातमी देतात ते.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.