Breaking News
Home / मनोरंजन / ‘मला आताच्या आता बायको पाहिजे’ ह्या मुलाचा हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

‘मला आताच्या आता बायको पाहिजे’ ह्या मुलाचा हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

एक जुनी हिंदी म्हण आहे – शादी का लड्डू जो खाये वो पछताये, न खाये वो भी पछताये. लग्नसंस्थेचं एकंदर गंमतीशीर आणि बरचसं खरं विश्लेषण. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की जेव्हा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आपल्या सोबत एक जोडीदार असावा अथवा असावी असं वाटतं. अगदीच नैसर्गिक आहे ते. पण हे वय नक्कीच तारुण्य आणि मध्यम वयातला असतो. पण कधी एखाद्या लहान मुलाने किंवा मुलीने लग्न करण्याचा हट्ट केला आहे असं ऐकलंय का. कदाचित हो. नसेल ऐकलं तरी काही हरकत नाही. आपल्या टीमने याच विषयावर नुकताच एक गंमतीशीर व्हिडियो बघितला. त्याचाच वृत्तांत खाली देत आहोत. हा व्हिडियो आहे एका लहान मुलाचा ज्याला करायचं आहे लग्न. बरं कारण ऐकून त्याच्या निरागसतेची गंमत वाटेल आणि बिचाऱ्याची कीवही येईल.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा कॅमेऱ्यासमोर आपल्याला एक मुलगा रडताना दिसतो. कॅमेऱ्यामागून एक दादा हा सगळा व्हिडियो रेकॉर्ड करत असतात आणि सोबतच सूत्रसंचालन ही करत असतात. त्यांच्या प्रश्नांमुळे या मुलाच्या रडण्याचं कारण कळतं. हा मुलगा रडत असतो कारण त्याला त्याची आई आणि इतर कोणीही त्यावेळी जेवण जेवायला देत नसतात असं त्याचं म्हणणं. आणि या एका कारणामुळे त्याला लग्न करायचं असतं.तेही अगदी आताच्या आत्ता. जेणेकरून बायको असेल तर कसं ती जेवण करून खायला घालेल ही त्या लहानग्याची समजूत. आपण त्याच्या रडवेल्या चेहऱ्याने दिलेल्या उत्तरांनी अगदी हसत सुटतो. काय म्हणावं या लेकराला असं आपल्याला वाटून जातं. पण खरी गंमत पुढे असते. बरं, बायको तर पाहिजे, पण कशी बायको पाहिजे हे तर जाणून घ्यायला हवं. कॅमेऱ्यामागील काका मग तसं या मुलाला विचारतात. त्यावर जे उत्तर येतं ते आधीच्या उत्तरापेक्षा वरचढ असतं. म्हणे बायको ताडामाडाच्या झाडासारखी पाहिजे. म्हणजे मोठी पाहिजे, कारण तिला स्वयंपाक येईल ना. छोटी असेल तर कसं काय जमणार. या बाळराजांचा भुकेचा प्रश्न अगदीच ज्वलंत झालेला दिसून येतो. आपण मात्र आपलं हसू दाबत हा संपूर्ण व्हिडियो पाहतो.

या लहान मुलाच्या निरागसपणाबद्दल जसं हसू येतं तशी त्याचा भुकेमुळे केविलवाणा झालेला चेहरा आपल्याला किवही आणतो. पण असो. त्याच्या मातोश्रींनी त्याला लवकरच काही चविष्ठ बनवून दिलं असणार हे नक्की. पण त्याआधीच्या भुकेने एक गंमतीदार असा व्हिडियो आपल्याला मिळाला हे नक्की. पुढे जाण्याआधी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. या व्हिडियोतील कळत नकळतपणे व्यक्त झालेली मतं ही त्या व्हिडियोतील सहभागी असणाऱ्यांची आहेत. या व्हिडियोवर लिहिलेला हा लेख म्हणजे त्या व्हिडियोविषयी थोडक्यात माहिती आपल्या वाचकांना मिळावी हीच प्रामाणिक इच्छा मनाशी धरून लिहिलेला लेख आहे याची कृपया सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी आशा आहे. आपण आपल्या टीमने लिहिलेले लेख नेहमीच शेअर करत असता. त्यामुळे नवनवीन विषयांवर लेखन करण्याचं प्रोत्साहन मिळतं. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन नेहमी देत राहा, लेख शेअर करत राहा. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. लोभ असावा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *