Breaking News
Home / मनोरंजन / ‘मला नवर्याकडे जायचं आहे, माझा नवरा कु’ठे आहे’ असा हट्ट करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

‘मला नवर्याकडे जायचं आहे, माझा नवरा कु’ठे आहे’ असा हट्ट करणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लहान मुलं आणि वायरल व्हिडियो हे अतूट नातं गेले काही आठवडे मराठी गप्पाची टीम आणि आमच्या लेखांचे वाचक सातत्याने अनुभवत आले आहेत. लहान मुलं, त्यांचा निरागसपणा, त्यातून निर्माण होणारा नैसर्गिक विनोद हा सगळ्यांनाच आवडतो. कारण तो ओढून ताणून केलेला नसतो. अगदी सहज आणि अनपेक्षितपणे झालेला असतो. अनेक वेळेस त्यात काही तर्क ही नसतो. पण लहान मुलांमुळे हसायला येतंच येतं. असंच काहीसं आमच्या टीमच्या बाबतीत झालं जेव्हा आम्ही एक नवीन वायरल व्हिडियो पाहिला. या व्हिडियो मधील मुलगी आणि ती करत असलेलं मागणं आपल्याला हसवून सोडतं. ही मुलगी हिंदी भाषिक दिसून येते. ती एके ठिकाणी बसून रडत असते. जवळच घरातल्या मोठ्या स्त्रिया बसलेल्या असतात.

ही मुलगी का रडते असं विचारलं असता, तिला काही तरी हवं आहे हे कळतं आणि ते काय हवं आहे ते ऐकून हसूच येतं. या चिमुरडीला आपल्या नवऱ्याच्या (जो अस्तित्वातच नाहीये) त्याच्या घरी जायचं असतं. तिचं हे बोलणं ऐकून आजूबाजूच्या स्त्रियांमध्ये खसखस पिकते. तेवढ्यात कॅमेऱ्यामागून एक स्त्री तिला विचारते की कोणाकडे जायचं आहे. तर ही लहानगी म्हणते मामा कडे. तेव्हा ही स्त्री तिला समजावते की मामा हा तर मामीचा नवरा असतो, वडील हे आईचे पती आणि काका काकींचा नवरा असतो, अशी नाती असतात. त्यावर माझा नवरा कोण आहे मग असं म्हणत ही मुलगी रडायला लागते खरी पण ऐकणाऱ्या व्यक्तींना हसायला येतं. तेव्हा कॅमेऱ्यामागील स्त्री हे ही समजावण्याचा प्रयत्न करते की, लहान मुलांना फक्त भाऊ आणि बहिणी असतात आणि मोठं झाल्यावर नवरा किंवा बायको हे नातं तयार होतं. पण या चिमुरडीच्या मनाप्रमाणे होत नसल्याने तिचं रडणं काही थांबत नाही, उलट ती अजून भोकाडं पसरते. तिच्या या बाललीला जशा आजूबाजूच्या बायकांना हसायला भाग पाडतात तशाच आपल्याला सुद्धा आणि व्हिडियो संपतो.

यावरून लक्षात येतं की लहान मुलं कधी काय बोलतील याचा नेम नाही. एवढंच कशाला पण लहानपणी वाचलेली बिरबल आणि अकबराची ‘बालहट्ट’ ही कथाही आठवल्यावाचून राहवत नाही. अर्थात त्या कथेतील पात्र आणि विषय वेगळे असले तरीही बालहट्ट पुरवणं किती जिकिरीचं आणि या व्हिडियो प्रमाणे हास्यास्पद असू शकतं याची कल्पना येते. तसेच या गोष्टीच्या आठवणीने आपण क्षणात जुन्या आठवणींमध्ये रमतो. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे अनेक (खासकरून वायरल व्हिडियोज वरील) लेख आमच्या टीमने वेळोवेळी लिहिले आहेत. या निमित्ताने आपल्याला तेही वाचायला आवडतील याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचावयास मिळतील. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *