Breaking News
Home / मनोरंजन / ‘मला भूक लागलीय’ ह्या मुलीचा क्युट व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, १ कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

‘मला भूक लागलीय’ ह्या मुलीचा क्युट व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, १ कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा व्हिडीओ

रॉकस्टार अवनी भारद्वाज हे नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का? ऐकलं असेल तर तुम्हाला ती माहिती असेल. मात्र ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी खास सांगतो… ही मुलगी महिन्याला कमीत कमी 10 हजार रुपये कमावते. तिची फॅन फॉलोअर्स लाखात आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं आता वय जास्तीत जास्त 7-8 वर्षे असेल. आणि हे पैसे ती स्वतःच्या जीवावर कमावते. … ती गाते? नाही. ती नाचते? नाही. ती एखादी कला सादर करते तर तसही काही नाही. मग ती नेमकं करते काय? तर काहीच नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही काहीच करत नाही तर तिला महिन्याला कमीत कमी 10 हजार रुपये कसे आणि कशाचे मिळतात? तिचे एवढे लाखात फॅन फॉलोअर्स कसे झाले? तेही वयाच्या 7 व्या वर्षी?

तर लहान मुलं दिवसभरात अनेक गमती-जमती करत असतात. आपणही त्या गमती-जमती आपल्यासमोर घडल्यावर ते व्हिडीओ किंवा फोटोच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद करतो. आणि आपल्या आयुष्यात त्या आठवणी व्हाव्यात म्हणून जपून ठेवतो. मुले कशी जेवतात, घरच्यांमध्ये गप्पा चालल्या असतील तर कसे इनव्हॉल्व्ह होतात? अशा दिवसभरातील अनेक गोष्टी लहान मुले एकदम अतरंगी पद्धतीने करतात. आता आपल्याला आपल्या पोरांचं कौतुक असतं. त्याने कुठलीही गोष्ट केली तरी त्यात आपल्याला वेगळेपण दिसून येतं.

हेच रॉकस्टार अवनीच्या बाबतीतही व्हायचं. तिच्या सगळ्याच गोष्टींचा घरच्यांना कौतुक वाटायचं. मग तिच्या दिवसभरातील काही मज्जा-मस्तीचे क्षण ते व्हिडीओत कैद करायचे. एके दिवशी अवनीच्या वडिलांनी तिचा एकदम लहानपणीचा व्हिडीओ युट्युबला टाकला. बघता बघता या व्हिडीओला हजारो विव्ज आले. मग मजा म्हणून त्यांनी अजून एक व्हिडिओ टाकला. मग हळूहळू त्यांनी तिचे व्हिडीओ काढून युट्युबवर टाकायला सुरुवात केली. आता छोटीशी अवनी रॉकस्टार झालीय…अवघ्या 7-8 वर्षात.

ती ठरवून काहीच करत नाही. तिचे व्हिडीओ युट्युबला आहेत, हे तिला नुकतंच कळू लागले आहे. मात्र आता तिच्या काही व्हिडीओला मिलियनमध्ये विव्ज मिळतात. आज आम्ही तिचा जो व्हिडीओ आपल्यासमोर आणणार आहोत, त्याला तब्बल 12 मिलियन विव्ज आहेत. ज्यांना मिलीयन कळत नाही, त्यांनी व्हिडीओ पाहून झाल्यावर मिलियन म्हणजे किती असतात, हे गुगल करा.

तिच्या या अतिप्रचंड व्हायरल झालेल्या व्हिडीओत तिचं वय फक्त 3 वर्ष आहे. ज्यात तीला भूक लागली आहे, असं म्हणून पुरीची मागणी करताना दिसत आहे. मग त्यानंतर तिच्या वडिलांचे आणि तिचे एकदम प्रेमळ संभाषण बघायला मिळते. ही मुलगी एकदम क्युट आणि चुणचुणीत आहे, म्हणूनच तिला लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.