आजच्या काळात ऑनलाईन फसवेगिरीचे प्रमाण वाढत चालले आहेत. बघता बघता लोकांची पूर्ण कमाई कोणी सहजपणे लुटून जातो आणि लोकांना त्याबद्दल माहीतही नसते. आजच्या काळात पूर्ण देश डिजिटल झाला आहे. डिजिटल काळ आल्यामुळे ऑनलाईन पेमेंट आणि पैसे ट्रान्सफर करणे अधिक लोकप्रिय झाले आहे. बहुतेक लोकं आपले मित्र आणि कुटुंबाला पैसे देण्यासाठी ऑनलाईन पैसे ट्रान्सफरचा उपयोग करतात. असे केल्याने वेळेची बचत होते. याशिवाय लोक आपल्या मोबाईलचा रिचार्ज आणि विजेचे बिल देण्यासाठी मोबाईल बॅंकिंग चा वापर करतात. पण बहुतेक वेळा असे होते कि, लोकं चुकून कोणा दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतात, तर तिथे दुसरीकडे कधी-कधी लोकांच्या अकाउंट मधून चुकीच्या मार्गाने पैसे काढले जातात. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून वाचण्यासाठी काही अशी माहिती देणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेले पैसे वाचवू शकता.
गेल्यावर्षी २०१९ च्या सुरुवातीलाच मुंबई मधील एका उद्योगपती सोबत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. त्या दरम्यान त्या उद्योगपतीला रात्री ६ मिस कॉल आले. जेव्हा ते सकाळी झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या खात्यातून १. ८६ करोड रुपये काढले गेले होते. वारंवार होणाऱ्या या घटनेत वाढ होत आहे. माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये एकूण २०६९ ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहेत. रिजर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार जर तुमच्या सहमतीशिवाय कोणी तुमच्या खात्यातून पैसे काढत असेल तर ३ दिवसांच्या आत बँकेला या घटनेची माहिती द्यावी, असे केल्याने आपले पैसे वाचू शकतात. बँकेला माहिती दिल्यावर बँक चौकशी करेल कि खरेच तुमचे पैसे चुकून दुसऱ्या खात्यात गेले कि नाही किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या खात्यातून पैसे काढले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला पूर्ण पैसे परत करेल. परंतु यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ए टी एम कार्ड नंबर आणि इंटरनेट बँकिंग सेवा बंद करावी लागेल. त्यानंतर पोलिसात या बाबत लेखी तक्रार करावी लागेल. तक्रार दाखल केल्यानंतर एफ आए आर ची एक प्रत बँकेत जमा करावी लागेल. बँक एफ आए आर च्या अंतर्गत काढल्या गेलेल्या पैशांची चौकशी करेल. जर तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळतील, पण जर तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, त्वरित बँकेशी संपर्क साधा. बँकेला ह्याबद्दल संपूर्ण माहिती द्या. तुम्ही योग्य पुरावे दिले तर तुमची बँक, पैसे ज्या चुकीच्या अकाउंटवर पाठवले गेले त्या बँकेशी संपर्क साधून त्यांना ह्या चुकून झालेल्या व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती देईल. आणि जर सर्व माहिती खरी असेल तर तुमचे पैसे परत मिळू शकतात.