Breaking News
Home / माहिती / महिला डीएसपीला सॅल्यूट करणाऱ्या ह्या सबइन्स्पेक्टरचा फोटो होत आहे वायरल, कारण पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

महिला डीएसपीला सॅल्यूट करणाऱ्या ह्या सबइन्स्पेक्टरचा फोटो होत आहे वायरल, कारण पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

मुली कोणत्याही कामात मुलांपेक्षा कमी नसतात. जे काम तुमचा मुलगा करू शकतो, तेच काम मुलगी सुद्धा करू शकते. आजच्या युगात मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. मुलांप्रमाणे त्या आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करत आहेत. जेव्हा एक वडील आपल्या बाळाला यशाच्या शिखरावर पोहोचलेलं पाहतो तेव्हा त्याची छाती गर्वाने फुलून येते. सोशिअल मीडियावर अश्या प्रगती करणाऱ्या मुलांच्या अनेक घटना वायरल होत असतात ज्या पाहून आपल्याला सुद्धा खूप बरं वाटतं. आज आम्ही तुम्हांला अशी एक घटना सांगणार आहोत, जी सध्या गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेचा विषय ठरत आहे. अशाच एक क्षण ह्या दिवसांत सोशिअल मीडियावर वायरल होत आहे.

ह्या दिवसात सोशिअल मीडियावर एका फोटोने लोकांचे मन जिंकले आहे. ह्या फोटोत एक सीआई वडील आपल्या डीएसपी मुलीला सॅल्यूट करताना दिसत आहे. मनाला स्पर्श करणारा हा फोटो आंध्र प्रदेशमधील तिरुपती मध्ये झालेल्या ‘फर्स्ट ड्युटी मीट’ कार्यक्रमादरम्यानचा आहे. ह्या कार्यक्रमामध्ये मुलगी आणि वडील दोघांची भेट झाली आणि मुलीला पाहताच वडिलांनी गर्वाने छाती फुगवून मुलीला सॅल्यूट केला. आंध्रप्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ह्या सुंदर फोटोला शेअर केले आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आंध्रप्रदेश पोलिसांच्या फर्स्ट ड्युटी भेटीदरम्यान एका कुटुंबाला आपापसांत मिळवलं. सर्कल इन्स्पेक्टर श्याम सुंदर ह्यांनी आपली मुलगी डेप्युटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस जेसी प्रशांती हिला गर्वाने सॅल्यूट केला.’ तर सोशिअल मीडियावर ह्या बापलेकीच्या भेटीदरम्यानचा हा क्षण लोकांना खूप आवडत आहे.

प्रत्येक जण ह्या सुंदर फोटोची प्रशंसा करत आहे. ट्विटरवर ह्या फोटोला जवळजवळ बारा हजार लाईक्स मिळाले आहे. तर दुसरीकडे दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी ह्याला रिट्विट सुद्धा केले आहे. भावुक करणारा हा क्षण पाहून लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. तुमच्या माहितीसाठी, ‘पोलीस ड्युटी मीट २०२१’ कार्यक्रम ३ जानेवारी ला तिरुपतीमध्ये झाला होता. त्यावेळी बापाने आपल्या लेकीला पाहताच गर्वाने सॅल्यूट केला होता. खरंच एका वडिलांना अजून काय हवं असतं. आपली मुलं यशाच्या शिखरावर जावी, त्यांनी त्यांची स्वप्नं पर्ण करावी, इतकंच तर असतं आई वडिलांचं स्वप्न. तसं तुम्हांला बापलेकीचा हा फोटो कसा वाटलं, नक्की सांगा. त्याचप्रमाणे नवीन नवीन माहिती, विविधलेख ह्यांवर देत असलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *