Breaking News
Home / जरा हटके / महिलेने घरी बोलावून तीन हरणांना खाऊ घातल्यामुळे ३९ हजारांचा बसला दंड

महिलेने घरी बोलावून तीन हरणांना खाऊ घातल्यामुळे ३९ हजारांचा बसला दंड

अमेरिकेतील कोलोरॅडो येथील एका महिलेला ५५० डॉलर म्हणजे जवळजवळ ३९२०० रुपयांचा दंड भरावा लागला. कारण तिने तीन हरणांना आपल्या घरातील लिविंग रूममध्ये बोलावून जेवण दिले. खरंतर, महिलेच्या घराच्या आसपास हरणांचा एक कळप आला तेव्हा तिने त्यांना घरी बोलावले आणि खाण्यासाठी ब्रेड आणि फळे दिले. उपाशी हरणांनी सर्व खाल्ले. ह्या घटनेचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर वर सुद्धा आला आहे. ह्यात महिला हातातून हरणांना ब्रेड भरवताना दिसत आहे. जेव्हा पार्क आणि वन्यजीव अधिकाऱ्यांना ह्या गोष्टीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी महिलेवर दंड लगावला. हरणांना खाद्य देणाऱ्या लॉरी डिक्शन ह्यांनी सांगितले कि, ‘मी खूप काळापासून वेटनरी टेक्नीशियन आहे आणि अनेक जनावरांसोबत वेळ घालवला आहे. जर कोणी माझ्या जवळ येतो आणि जर त्यांना माझ्या मदतीची गरज असते, तेव्हा मी त्यांची मदत करत. हि माझी ओळख आहे.’

‘कोलोरॅडो पार्क ऍण्ड वाईल्डलाईफ’ चे म्हणणे आहे कि, ‘घराच्या बाहेर हरणांसाठी खाद्य सोडणे हे जनावरं आणि माणसं ह्या दोघांसाठी हानिकारक होऊ शकतं. फक्त हरणांबद्दल गोष्ट नाही आहे, परंतु त्या जनावरांसाठी सुद्धा आहे जे त्यांचे पाठलाग करतात. हरणं हे डोंगराळ सिंहांचे मुख्य शिकार असतात. अशामध्ये जर खाण्याच्या शोधात जर ते माणसांच्या वस्तीच्या आसपास फिरकणार तर त्यांच्या मागे सिंह, वाघ ह्यांचे येण्याचे चान्सेस सुद्धा वाढणार. ट्विटर वर CPW NE Region ह्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले कि, ‘जंगली जनावरांना अन्न भरवणं खूप चुकीचं काम आहे. अश्या गोष्टींना थांबवणं आवश्यक आहे. तर ‘स्टॉप फीडिंग वाइल्डलाइफ’ ने लिहिले आहे कि, ‘काही लोकांना वाटतं कि हरणांना घरी बोलावून अन्न खाऊ घालणं ठीक आहे. परंतु असे नाही आहे.’ ‘कोलोराडो पार्क एंड वाइल्डलाइफ्ज नॉर्थ-ईस्ट रीजन’ च्या वन्य अधीरकऱ्यांनी सांगितले कि, ‘कोलोरॅडो मध्ये जंगलातील जनावरांना पाळीव बनवणं बेकायदेशीर आहे. त्यांचे फळे आणि ब्रेड हे खाद्य नाही आहे. जर हरणांचा कळप दरवाज्यापर्यंत जरी येत असेल तरीसुद्धा त्यांना एकटं राहू दिले पाहिजे.’

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *