Breaking News
Home / मनोरंजन / महिलेने लहान मुलासोबत केला सुपरफास्ट डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

महिलेने लहान मुलासोबत केला सुपरफास्ट डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

मे महिना म्हटलं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्न सोहळे यांच्या साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे एरवी ही उन्हाळ्यात हे सगळं होत असत. पण यावेळची गोष्ट वेगळीच वाटते. पण अस असलं तरी एक गोष्ट अशी आहे जी या कडकडीत उन्हाळ्यावर ही मात करून जाईल. ही गोष्ट म्हणजे आपलं लग्न समारंभांविषयी असलेलं प्रेम आणि आकर्षण होय. या प्रेमामुळेच आपल्याकडे हा समारंभ कधी सोहळा बनून जातो ते कळत नाही. अर्थात जेवढा मोठा सोहळा तेवढा डोक्याला ताप जास्त असतो. पण हौसेला मोल नसत. त्यात या सोहळयातून मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. या सगळ्याची सुरुवात अर्थातच साखरपुडा या समारंभापासून होते. पण अस असलं तरी घरची मोठी, जुनी जाणती मंडळी असतात. त्यामुळे या समारंभात विधींना जास्त महत्व असतं. तसेच एका अर्थाने आपण सगळ्यांना एका नात्याची ओळख करून देत असतो. पुढचा टप्पा अर्थातच हळदीचा ! या टप्प्यावर मात्र मजा मस्ती अगदी दणक्यात सुरू होते. त्यात हल्ली हळदी समारंभ म्हणजे डीजे हे समीकरण ही झालंय. या समिकरणाला अजून एका गोष्टीची जोड असते ज्यामुळे घसे ओले होतात.

पण असो. तूर्तास आपण इतर गोष्टींकडे बघू. यात अर्थातच डीजे आहे म्हंटल्यावर नाचणाऱ्या व्यक्ती आल्याच. नाचणाऱ्या हा ! नाचकाम करणाऱ्या नव्हे. तर अशा नाचणाऱ्या व्यक्ती असल्या की त्यात अजून मजा येते. बरं अशावेळी सहसा लोकगीतं आपल्याला थिरकायला लावतात आपल्याकडे हे काम कोळीगीते अगदी मस्त करतात. हळदी समारंभात कोळीगीते वाजताहेत आणि आपण त्यावर तुफान डान्स करतोय हे अनेकवेळा झालं असेलच. बरं इतर ठिकाणी ही काही वेगळी परिस्थिती नसते. त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली गाणी हळदीच्या वेळी वाजवली जातात. अर्थात काही सिनेमांची प्रसिद्ध गाणी सुद्धा आपण ऐकतोच. पण अस असलं तरी या गाण्यांना रंग चढतो ते नाचणाऱ्या व्यक्तींमुळे ! एखाद्याचा डान्स जेवढा जबरदस्त, अतरंगी तेवढा आपल्याला जास्त भावतो. त्यात काही जण त्या क्षणांत एवढे मश्गुल झालेले असतात की त्यांना केवळ आणि केवळ संगीत ऐकू येत असत. बाकी आजूबाजूला कोण आहे वगैरेची फारशी चिंता त्यांना नसते. आणि मग अशातूनच भन्नाट असा डान्स होतो. आमच्या टीमने ही असे अनेक डान्स बघितले आहेत. एवढंच काय आपणही असे चित्रविचित्र डान्स बघितले असतील.

नसतील बघितले तर आमची टीम एक व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करेल. तो एकदा बघा. नाही पोट धरून हसलात तर नाव सांगा. काय जबरदस्त वेगाने डान्स होतो या व्हिडियोत ! एकदम खल्लास ! व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक मुलगा काहीसा अभिनय करत नाचत असतो. काही बटणं उघडून शर्ट पाठीमागे घेऊन त्याचा डान्स चालू असतो. तेवढ्यात एक ताई समोरून येतात आणि त्याच्या या डान्समध्ये सामील होतात. पण त्या ज्या येतात त्या एकदम तूफान बनूनच येतात. जबरदस्त ! आम्ही याविषयी अजून काही सांगण्यापेक्षा आपण हा व्हिडियो एकदा बघाच. तसा पण कमी वेळेचा व्हिडियोच आहे. त्यामुळे जास्त वेळही जाणार नाही. असो. पण एकंदर मुद्दा काय तर लग्नातील मजा मस्तीची सुरुवात ही हळदी समारभातून होते. नंतर ही जेव्हा लग्न लागतं, त्या सोहळ्यातही धमाल असतेच. आपल्या नियमित वाचकांना याविषयी वाचलेले असंख्य लेख यानिमित्ताने आठवत असतील. आपल्याला ते पुन्हा वाचायचे असल्यास जरूर वाचू शकता. तसेच जे नवनवीन लेखही येताहेत ते आठवणीने डोळ्याखालून घालत चला. तसेच आपल्या प्रतिक्रिया ही देत चला.

कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *