नशीब हि एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला कधी करो’डपती बनवून ठेवेल, सांगता येत नाही. आता थाईलँड मध्ये घडलेली हि घटनाच घ्या ना. इथे ‘नखोन सी थम्मारत’ च्या किनारी (Coast Of Nakhon Si Thammarat) फिरत असताना महिलेला रात्री असं काहीसं मिळालं कि ज्याने ह्या महिलेला रातोरात करोडपती बनवलं. खरंतर ४९ वर्षीय सिरीपो’र्न न्यूमरिन जेव्हा समुद्र किनारी फिरत होती तेव्हा तिला एक विचित्र गाठ दिसली. न्यूमरिनला ह्यातून एका मासळीसारखा गंध येऊ लागला. तिला वाटले कि कदाचित हि गोष्ट कोणत्यातरी कामाची असू शकते, असा विचार करून महिला ती विचित्र गोष्ट आपल्या घर घेऊन आली. ह्यानंतर तिने आजूबाजूच्या शेजारच्यांना ह्या विचित्र गोष्टींबद्दल माहिती मिळते का म्हणून विचारले. एकाने सांगितले कि हि विचित्र गोष्ट खरंतर व्हेल माश्याची उ’ल’टी आहे. ह्याला अंबरग्रीस सुद्धा बोलतात.
हे ऐकून न्यूमरिन थक्क झाली. त्यानंतर तिला हे सुद्धा माहिती झालं कि व्हेल माश्याची उ’ल’टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूपच जास्त किंमतीत विकली जाते. त्यांना ज्या व्हेल माश्याची उ’ल’टी मिळाली होती ती १२ इंच रुंद आणि २४ इंच लांब होती. ह्याची बाजारपेठेत जवळपास किंमत १.८६ लाख पाउंड म्हणजेच १.८ कोटी रु’पयांच्या आसपास आहे. तुमच्या माहितीसाठी, व्हेल माश्याची उ’ल’टी किंवा अंबरग्रीस चे उत्पादन शु’क्रा’णू व्हेलच्या प्रजातीत होते. ह्याचा उपयोग महागड्या परफ्युम मध्ये सुद्धा होतो. खरंतर हे अंबरग्रीस एक सुधारात्मक कार्य करते जे सुंगध जास्त वेळेपर्यंत टिकवून ठेवण्याची क्षमता देते. ह्याचा वापर करून परफ्युम सारख्या महागड्या गोष्टींचा सुगंध जास्त वेळ टिकवता येतो. ज्यामुळे तो सुगंध जास्त वेळ राहतो.
जर तुम्हांला सुद्धा व्हेल माश्याची उ’ल’टी मिळाली तर तुम्हांला त्याची पडताळणी करायची असेल तर पुढीलप्रमाणे करू शकता. ह्याचा एक भाग आ’गी’च्या ज्योतीवर ठेवून द्या. ह्यानंतर जर हे वितळून पुन्हा कठोर झाले तर ते व्हेल माश्याची उ’ल’टी म्हणजेच अंबरग्रीस असू शकतं. अशीच पडताळणी न्यूमरिनने सुद्धा केली होती ज्यात ती यशस्वी झाली. आता ती तज्ञ मंडळी घरी येणाची वाट बघते आहे कारण ते अंबरग्रीसची शुद्धता पडताळू शकतील. व्हेल माशाची किंमती उ’ल’टी मिळाल्यावर न्यूमरिनने सांगितले कि मी खूपच नशीबवान आहे जो मला अंबरग्रीसचा इतका मोठा तुकडा मिळाला. मला अपेक्षा आहे कि ह्यामुळे मला जास्त पै’से मिळतील. सध्या मी ह्याला माझ्या घरी सुरक्षित ठेवले आहे. स्थानिक परिषद लवकरच ह्याची पडताळणी सुद्धा करणार आहे.