Breaking News
Home / मनोरंजन / माकडाची कळ काढणं तरुणीला पडलं महागात, बघा काय केलं माकडाने पुढे

माकडाची कळ काढणं तरुणीला पडलं महागात, बघा काय केलं माकडाने पुढे

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळं पाहायला मिळते. कधी भन्नाट तर कधी रोमांचक व्हिडीओ व्हायरल होतात. वन्य प्राण्यांशी संबंधित मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर आपल्याला व्हायरल होत आहेत. जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना मोठ्या आवडीने पाहायला आवडते. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा अशाप्रकारचा कोणताही व्हिडीओ किंवा कंटेन्ट शेअर केला की लोकं त्याला आवडीने पाहातात आणि एकमेकांना शेअर करतात. ज्यामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होतात.

वन्यजीवनात रस असलेले छायाचित्रकार एक परिपूर्ण क्लिक मिळवण्यासाठी जंगलात तास घालवतात. ज्यामुळे ते त्यांच्या कॅमेरात जंगलातील अनेक गोष्टी कैद करतात आणि आपल्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच अनेकदा फिरायला गेलेले लोक सुद्धा अनेक मजेशीर व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

काही दिवसांपूर्वी जंगलातील एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता, जो 2 प्राण्यांच्या भांडणाचा होता. त्या व्हिडीओत एक हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणगेंडा आणि सिंहिणी यांच्यात झालेले मारामारी दिसून आली होती. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र यात एका प्राण्याचे आणि एका माणसाचे भांडण झालेले दिसत आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका प्राणीसंग्रहलयातील आहे. यात एका माकडाला एक मुलगी खूप डिवचत होती. शेवटी माकडाने एकदम बेकार कार्यक्रम केला. खरं पाहिलं तर जंगलात जाऊन वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, कोल्हा, माकड, हत्ती अशा हिंस्र आणि कधीही अंगावर घ्यायला तयार असणाऱ्या प्राण्यांशी पंगा घ्यायचा नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण एका कुत्र्याने फिरायला आलेल्या मुलीने मात्र तशी डेअरिंग केली. या मुलीने चक्क माकडाशी पंगा घेतला.

आता तिने माकडाशी पंगा घेताना हा तर विचार करायचा की, माकडचं आपले पूर्वज होते ते…. या डेअरिंगबाज मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शांत बसलेल्या माकडाला या मुलीने चिथवण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे जाऊन या मुलीची सगळी डेअरिंगबाजी भीतीत बदलली. आ बैल मुझे मार किंवा आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणं असंच काहीसं ही मुलगी करताना दिसत आहे. आपल्या परिसरात शांतपण बसलेल्या माकडाला जवळ जाऊन त्याच्यावर ओरडून , त्याला राग देण्याचा प्रयत्न या मुलीने केला. शेवटी माकडाने तिला अशी काही अद्दल घडवली की, ती जन्मभर तिच्या लक्षात राहिल. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या तसेच काळजीही घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.