Breaking News
Home / मनोरंजन / माकडाचे पिल्लू हौदात पडलं असताना ज्याप्रकारे आईने वाचवले ते पाहून तुमच्यादेखील डोळ्यांत पाणी येईल, बघा व्हिडीओ

माकडाचे पिल्लू हौदात पडलं असताना ज्याप्रकारे आईने वाचवले ते पाहून तुमच्यादेखील डोळ्यांत पाणी येईल, बघा व्हिडीओ

जेवढं वय लहान तेवढ्या उचापती फार हे आपण सगळेच जण जाणतो. अर्थात काही जणांचं वय वाढलं तरी या उचापती करण्याची सवय जात नाही हे ही खरं आहे. पण सहसा आपलं वय लहान असताना आपण जास्त उचपतीखोर असतो. कारण ही अगदी सरळच आहे. आपण सगळेच नवनवीन गोष्टी शिकत असतो. मनात उत्सुकता असते आणि अंगात रग असते. बरं या उर्जेला चालना द्यावी वगैरे विचार नसतात डोक्यात. त्यामुळे जे आकर्षक वाटेल, थोडं आव्हानात्मक वाटेल ते आपण करायला जातो. मग अगदी पालकांनी दरडावून सांगितलेल्या गोष्टी ही करण्याकडे आपला कल असतोच. पण एक दिवस असा येतो की सगळी मस्ती अशी काही अंगाशी येते की चांगलाच धडा बसतो.

बरं हे केवळ आपल्याच बाबतीत होतं असं नाही. अनेक प्राण्यांच्या बाबतीत ही होतं. त्यामुळेच अनेक वेळेस प्राण्यांच्या पिल्लांचे वायरल व्हिडियोज समोर येत असतात. सुदैवाने हे व्हिडियो रेकॉर्ड करणारी मंडळी अनेक वेळेस या प्राण्यांना मदत करतात. त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यापासूनही वाचवतात. काही वेळेस तर खुद्द प्राणीच प्राण्यांना मदत करतात. त्यातही प्राण्यांमधील आई पिल्लांची जोडी असेल तर हमखास आई ही धावून येतेच. मग वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती या पिल्लांना वाचवते.

काही वेळेस इतर प्राण्यांशी सामना करावा लागतो. तर काही वेळा आपल्याच पिल्लाच्या बालिश वागण्याचा सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय एका व्हिडियोतून येतो. हा व्हिडियो तसा एक दोन वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडियोत आपल्याला माकडीणीचं पिल्लू आणि माकडीण दिसून येते. शेवटी माकड म्हंटलं की माकडचाळे आलेच. कदाचित हेच माकडचाळे करता करता हा छोटा जवळच्याच एका हौदात पडतो असं वाटतं. बरं तो हौद गोलाकार आणि या पिल्लासाठी उंच असल्याने त्याला वर येता येत नाही. सुदैवाने पाणी कमी असतं त्या हौदात. पण अशा प्रसंगात अडकलं की जीव कासावीस होतोच. या पोराचीही हीच अवस्था झालेली दिसून येते. त्यात भिजल्यामुळे जणू तो थिजल्या सारखा वाटतो. पण सुदैवाने त्याची आई जवळच असते. ती येते आणि त्याला कसं तरी करून वर उचलते आणि मग अंगाशी कवटाळते. तो पुन्हा पडणार नाही याची दक्षता घेते. पण एक खरं सांगायचं झालं तर हे केवळ वाचून आपल्याल अंदाज येणार नाही. आपण हा व्हिडियो प्रत्यक्ष बघा. आपल्याला ही घटना बघता येईल. कदाचित आपण ही घटना बघितली ही असेल.

असो. पण आपल्या टीमने यावर थोडी माहिती मिळते का ते बघितलं. तेव्हा लक्षात आलं की हे ठिकाण मलेशिया किंवा सिंगापूर येथील असावे. कारण या ठिकाणच्या काही व्यक्ती माकडांना पाळतात असं लक्षात आलं. तसेच त्यांच्या व्हिडियोजमधून याच ठिकाणचे अन्य काही व्हिडियोज ही बघता आले. गंमत म्हणजे पाण्यात पडण्याची या माकडांची ही काही पहिली वेळ नव्हे आणि शेवटची तर नाहीच नाही. पण तरी चिंता नसावी. कारण इतर माकडं तिथे असतात. तसेच त्यांना पाळणारी काही माणसं सुदधा असतात. त्यामुळे त्या हौदात पडली तरी त्यांना बाहेर काढायला कोणी ना कोणी तरी असतं हे जाणवतं. बाकी त्यांच्याविषयी जास्त माहिती नसल्याने इतर काही भाष्य करता येत नाही. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.