Breaking News
Home / जरा हटके / माकडाला पकडायला वाघ झाडाच्या टोकावर चढला, झेप घेऊन पकडणार इतक्यात माकडानेच वाघाचीच खोड मोडली, बघा व्हिडीओ

माकडाला पकडायला वाघ झाडाच्या टोकावर चढला, झेप घेऊन पकडणार इतक्यात माकडानेच वाघाचीच खोड मोडली, बघा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी एक व्हिडियो वायरल झाला होता. त्यात ताडोबा अभयारण्यातील दोन वाघ वनात विहार करताना दिसत होते. अर्थात त्यात काही नवीन नाही. पण या व्हिडियोत या वाघांसोबत अनेक माणसं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसत होती. यावरून मग काही काळ विविध चर्चा रंगल्या. आता तो विषय मागेही पडला. पण युट्युब भाऊ. त्यांच्या अल्गोरिदम ला कळलं की तुम्ही एखादा व्हिडियो बघितला आहे की मग रांग लागते तशाच विविध व्हिडियोजची. आपल्या टीमच्या बाबतीत ही तसंच काहीसं झालं. वाघांवर आधारित काही व्हिडियोज आपल्या टीमच्या बघण्यात आले. पण त्यातील एका व्हिडियोने लक्ष वेधून घेतलं आणि खिळवून ठेवलं. याच व्हिडियो विषयी आजच्या लेखातून थोडंस.

हा व्हिडियो आहे सुमारे पाच वर्षांपूर्वीचा. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मधला. वन्य जीवनातील एका चित्तथरारक प्रसंगाचा हा व्हिडियो. सुदैवाने यात मानवी हस्तक्षेप अगदी थेट नाहीये. जे काही घडतं ते दोन प्राण्यांमध्ये. एक अर्थातच वाघोबा आणि दुसरा प्राणी म्हणजे एक वानरी आणि तिचं पिल्लु.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्या एक रुबाबदार वाघ एका झाडावर चढलेला दिसतो. त्याच्या समोर असते ती वानरी. ती असते फांदीच्या अगदी टोकाच्या जवळ. तर वाघोबा खोडावर उभे ठाकून पुढे कसं जायचं याचा अंदाज घेत असतात. तेवढ्यात आपल्या लक्षात येतं की वाघोबांनी आपला मोर्चा आता थेट वानरीकडे वळवला आहे. तिच्या कडे येताना अर्थात झाडाच्या मजबूत खोडाला सोडून निमुळत्या फांदीकडे वाघोबा येतात. खुप साऱ्या फांद्या एकत्र असल्यामुळे त्यांना काहीशी पकड घेत पुढे येता येतं. पण म्हणून वानरी गप्प बसलेली असते का, तर अजिबात नाही. वाघोबा जरा जरी हलले की ती सुद्धा चपळाईने जागा बदलत असते. शेवटी तिच्यावर स्वतःची आणि आपल्या लेकराला वाचवण्याची जबाबदारी असते. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाताना प्रसंगावधान असणं महत्वाचं मानतात. हा नियम प्राण्यांना ही लागू होत असावा. कारण एक वेळ अशी येते की वाघोबा अगदीच पुढे येत असतात आणि काही क्षण वानरी स्तब्ध झाल्यासारखी वाटते.

 

आता पुढे काय होणार असं वाटत असताना ती अगदी चपळाईने फांद्या पकडून खाली झुलते. त्यामुळे आधीच अवघडलेले वाघोबा अजून अडचणीत येतात. परत जावं तर पंचाईत आणि पुढे जावं तर पडण्याची भीती. पण शेवटी वाघच तो. सावज नजरेच्या टप्प्यात असताना धाडस करणार नाही असं कसं शक्य होईल. पण ही वानरी ही सतर्क असते. आपलं पूर्ण लक्ष त्या वाघावर केंद्रित केलेलं असलं तरी पुढे काय करावं हे तिच्या मनात तयार असावं. कारण एका क्षणी ती चट्कन जागा बदलते. डाव्या बाजूच्या फांद्यांचा आधार घेत झाडाच्या मजबूत खोडाकडे जाते. भक्ष्य म्हणून जिच्यावर लक्ष असतं, तीच दुसरी कडे जाते आहे म्हंटल्यावर वाघही आपली जागा बदलायला जातो. पण एवढं वजन घेऊन या कसरती करणं काही त्याला जमत नाही. तसेच एवढा वेळ वानरीच्या वजनाने खाली असणाऱ्या फांद्या वाघाची पकड ढिली करतात. वाघोबाचा तोल जातो आणि खाली कोसळू लागतो. तरी एके ठिकाणी लोंबकळतो आणि मग स्वारी जमिनीवर धपाSSSक करुन खाली पडते.

पण वाघ ना तो. त्याचा रुबाब खाली पडल्यावरही कायम असतो. काही घडलंच नाही या तोऱ्यात स्वतःचा श्वास सावरत तो बसलेला असतो. एव्हाना हा प्रसंग बघणाऱ्यांचे कॅमेरे सरसावलेले असतात. त्या रुबाबदार प्राण्याची छबी टिपण्यासाठी. पण त्यांच्या कॅमेऱ्यात दिसत नाही ती या प्रसंगात विजयी ठरलेली वानरी. तिने दाखवलेलं प्रसंगावधान आणि चपळाई यांमुळे ती स्वतःचा आणि आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यात यशस्वी झालेली दिसते.

या व्हिडियोच्या आधीचे आणि नंतरचे भाग आहेत. पण त्यातला हा भाग सगळ्यांत जास्त चित्तथरारक आणि लोकप्रिय झालेला आहे. त्यामुळे या भागविषयी लिहावं असं मनोमन वाटून गेलं. एरवी गोष्टींमध्ये ऐकलेल्या बाबी या व्हिडियोच्या माध्यमातून बघायला मिळाल्या याचा आंनद आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असेलच. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस आला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या टीमने लिहिलेले प्रत्येक लेख मोठ्या प्रमाणात शेअर करत असता. आपल्या टीमसाठी आमच्या कामाची ही एक पोचपावती असल्याचं आम्ही समजतो. तेव्हा आपलं प्रेम आणि पाठिंबा हा असाच राहू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. लोभ असू द्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *