Breaking News
Home / मनोरंजन / माकडावर हात उगारणं तरुणाला पडलं महागात, बघा ह्या माकडाने पुढं काय केलं ते

माकडावर हात उगारणं तरुणाला पडलं महागात, बघा ह्या माकडाने पुढं काय केलं ते

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून आपण त्याला आनंदाने पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ आपल्याला शिकवण देतात तर काही व्हिडीओ आपल्याला काही ना काही माहिती देतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, तो तुमचा दिवस बनवू शकतो. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. अशा परिस्थितीत, अनेक व्हिडिओ जे कॉमेडी किंवा मनोरंजन करणारे असतात, सोशल मीडियावर बरेचदा व्हायरल होतात. विशेषतः वाघ, सिंह तसेच इतर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. याच प्रकारामध्ये सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे.

यात एका व्यक्तीच्या धाडसाचे आणि माकडाच्या धूर्तपणाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, पण हा व्हिडिओ खरोखर खास आहे. कारण हा व्हिडिओ वेगळा आहे. डोक्यासमोर ताकदीचे काहीही चालत नाही, ही शिकवण या व्हिडिओमधून आपल्याला मिळते. माकडाला सर्व प्राण्यांमध्ये सर्वात हुशार आणि खोडकर मानले जाते आणि कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही माकडाच्या हुशारीवर विश्वास बसेल.

माकडांना अनेकदा माकडचाळे करताना पहायला मिळतं. तसेच अनेकदा माकड माणसांची नक्कल देखील करतं. माकडं साधारणरित्या कळपांमध्ये दिसतात. नेहमी फिरतीवर असलेली माकडं कधी मनुष्यवस्ती धुडघूस घातलाना दिसतात. राग आल्यावर माकडं कोणावरही ह’ल्ला करतात. अशातच आता एका रागीट माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इकडे -तिकडे उड्या मारत असताना माकड एक अचानक एका घरावर बसला. काही क्षणांनंतर त्याला हाकलायला तिथला स्थानिक माणुस आला मात्र माकड काही हटले नाही…. शेवटी माकडच ते… अखेर हे माकड एका घरावर जाऊन स्थिरावते तिथेही हा व्यक्ती येतो आणि माकडाला हाकलून देऊ लागतो… आता मात्र माकडाची सटकली, असे दिसून येते. आणि मग माकड अगदी wwf च्या स्टाईलमध्ये माणसाच्या अंगावर झेप घेते आणि त्याला इतक्या जोरात आपटते की, त्याला लक्षात पण येत नाही आपण कसे पडलो आणि कसा हल्ला झाला.

आपल्याला आलेल्या रागाला पूर्ण वाट मोकळी करून देत माकड या माणसाला जमिनीवर आपटवते आणि पळून निघून जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून असे दिसते की या माणसाचा माकडांना स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचा माकडांना हाकलण्याचा हेतू होता, पण त्याला माकडाचा असा ह’ल्ला होईल, याचा अंदाजही नव्हता. परंतु या खोडकर माकडाने धीर धरला नाही आणि रागाच्या भरात या माणसाची अवस्था वाईट केली.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.