Breaking News
Home / मनोरंजन / “माझे पप्पा पोलिसांत आहेत, तुला गोळी घालतील..” बघा ह्या चिमुकल्याने दिलेली शिक्षिकेला रडत रडत ध’मकी

“माझे पप्पा पोलिसांत आहेत, तुला गोळी घालतील..” बघा ह्या चिमुकल्याने दिलेली शिक्षिकेला रडत रडत ध’मकी

शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या अनेक संभाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. काही मुले चूक केल्यानंतर माफी मागताना दिसली, तर काही मुले त्यांच्या शिक्षिकेलाच धमकावताना दिसतात. लहानपणी मुलं खूप खोडकर असतात आणि अगदी निरागसतेनं सगळं सांगायला तयार होतात. कधी-कधी लहान मुलं अशा काही गोष्टी बोलतात ज्या ऐकल्यावर आपल्याला विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला काही सेकंदांसाठी धक्का बसेल. तुमचा विश्वास बसणार नाही की लहान मुलं असा विचार कसा करू शकतात? या मुलाचे बोलणे ऐकूण त्याची शिक्षिका देखील चकीत होते. शाळेत वर्गात बसलेले असताना या दोघांमधील हे संभाषण आहे.

तू जानता नहीं मेरा बाप कौन है! हे वाक्य साधारण अनेक चित्रपटात विशेषतः वेबसीरीज मध्ये आपण ऐकून असाल. पण एखाद्या शाळकरी मुलाकडून कधी हे ऐकावं लागेल असं कधी वाटलं होतं का? या शाळेतील शिक्षिकेने तर कधी हा विचारही केला नसेल. एका बालवाडीतल्या चिमुकल्याने चक्क आपल्या शिक्षिकेला धमकी देऊन माझे बाबा पोलीस आहेत तुम्ही मला मारलंत तर ते तुम्हाला बंदुकीने गोळ्या मारतील असं ठणकावून सांगितलं आहे.

ऐकूनच धक्का बसला ना? आता हा व्हिडीओ जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही आणखीनच चक्रावून जाल. आजवर आपण सिनेमात पाहिलेले डायलॉग आपल्याला चक्क लहान मुलांच्या तोंडून ऐकायला भेटतात. आजच्या या व्हायरल व्हिडीओत एकदम खतरनाक पोरगा आहे. ज्याने चक्क आपल्याला शिक्षिकेला धमकावले आहे. किंडर गार्डनमध्ये शिकणाऱ्या या चिमुकल्याचा थेट शिक्षेकेला धमकी देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. खरं पाहिलं तर शिक्षकांची जबाबदारी ही शिक्षण देणे असतेच पण मुलांना योग्य वळण लावणे, शिस्त लावणे, संस्कार शिकवणे, हीसुद्धा असते. ही जबाबदारी पार पाडताना शिक्षकांची होणारी दमछाक ही खूप मोठी असते.

कधी कधी तर विद्यार्थ्यांच्या धमक्या सुद्धा ऐकाव्या लागतात. मजेदारपने या धमक्या ऐकणे, हे फारच मनोरंजक आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण देत असताना अभ्यास घेणं,योग्य वळण लावणं ही शिक्षकांची जबाबदारी ते संपूर्ण पार पाडतात, त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थांना रागवावं ही लागत. पण शिक्षिकेने अभ्यास करत नसल्यानं विद्यार्थ्याला रागवलं म्हणून या चिमुकल्या विद्यार्थ्याने थेट वडीलांच्या खाकीचा धाक दाखवत तुम्हाला बंदुकीने शूट करतील अशी शिक्षिकेला धमकी दिली आहे.

दोन गटात किंवा तरुणांमध्ये मारामारी झाली की मारामारीच्या वेळी धमक्या आपण ऐकत असते. पण जर लहान मुलंच अशी धमकी देऊ लागले तर… असेच काहीसे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले, ज्यामध्ये एक लहान मुलगा शाळेच्या वर्गात उभा राहिलेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये मुलगा रडताना दिसत आहे. तसेच तो खूप रागात देखील आहे. शिक्षका त्याला बोलत असते तेव्हा तो म्हणतो की, माझे वडील पोलिसात आहेत. यावर शिक्षिकेनेही उत्तर दिले की, तुझे वडील पोलिसात आहेत तर काय? त्याला प्रत्युत्तर देताना तो म्हणतो की, गोळी मारेल. मग शिक्षक म्हणाले की गोळी कोणाला मारणार? तर तो म्हणतो की, संदूकच्या वर ठेवली आहे. मग शिक्षिका म्हणते की, तू मला मारशील का? यावेळी मुलगा हो असे उत्तर देतो. यामध्ये हा चिमुकला खूप जास्त रागात दिसत आहे. रडता रडता तो शिक्षिकेला धमकी देत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच हसाल आणि मनसोक्तपणे हसाल.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *