शाळेचा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. मात्र तरीही शाळा प्रत्येकाला आवडतेच. आजही शाळा म्हटलं किंवा कामानिमित्त शाळेच्या भागातून जाणं झालं तर कित्येक आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यासमोर तरळून जातात. शाळा म्हणजे पहिल्या दिवशीचा गोंधळ, विनाकारण आलेलं रडू, अभ्यास न केल्यामुळे खाल्लेला मार, मित्रांमुळे आपल्याला झालेली शिक्षा… अशा कितीतरी गोष्टी आपल्या मनात येतात. सर्वांना आपले शाळेचे दिवस नेहमी आठवतात, कारण हे आयुष्यातील सोनेरी दिवस आहेत. मौजमजा, खोडसाळपणा आणि वेळेवर गृहपाठ पूर्ण करण्याची धडपड असते. काही शाळकरी मुलांना गृहपाठ पूर्ण न झाल्यास विविध सबबी सांगणेही चांगले माहीत असते. गृहपाठ नसेल झाला तर धाकधूक तर असतेच पण शिक्षकांना नवीन काय कारण सांगायचं याचा विचार मनात सुरू असतो. शिक्षकांनी पालकांना भेटायला बोलावलं तर… याची भिती वेगळीच.
मधली सुट्टी ही तर प्रत्येकासाठी एक आठवण असेल. दरदिवसाची मधली सुट्टी ही काहीतरी आठवण देऊन जाणारी होती. एकत्र खाल्लेले डबे, शाळेत मिळणारा आहार. शाळा शिकत असतानाचा काळ म्हणजे आयुष्यात सगळ्यात सुंदर काळ असतो. शाळेतील 2 दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे असतात आणि आपण या 2 दिवसांना इमोशनल कनेक्ट असतो. त्यापैकी एक दिवस असतो तो शाळेचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे शाळेचा शेवटचा दिवस… हे 2 दिवस माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहतात.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन युनिफॉर्म नवे मित्र, नवे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह असतो. शाळा देखील पहिल्या दिवशी मुलांच्या किलबिलाटामुळे गजबजून जाते. पण काही मुलांना शाळा अजिबात आवडत नाही. त्यांना ओरडून मारून शाळेत पाठवावं लागतं. शेवटी तिथे जाऊनही ते शिक्षकांना रडून रडून नको नको करतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चिमुकला हुंदके देऊन रडताना दिसतोय. हा गावाकडचा व्हिडीओ आहे, या चिमुकल्याची भाषा पण एकदम गावरान आहे.
‘अवो आयका माझं. माझ्या बापाला फोन करा’, असं चिमुकला या व्हिडीओ बोलताना दिसतोय. त्याची बोबडी भाषा सगळ्यांना हसायला मजबूर करत आहे. या मुलाला पाहून अनेकांना आपले शाळेचे दिवस आठवले आहेत. या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
शाळेत असताना त्या आपल्याला खूप काही देऊन जातात. या 2 गोष्टींमधील एक गोष्ट मनाला प्रचंड आनंद द्यायची तर दुसरी गोष्ट मनाला प्रचंड दुःख द्यायची. अर्थात त्या त्याकाळी मनाला वाटणाऱ्या भावना होत्या. यापैकी मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे शाळेला अचानक मिळालेली सुट्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही अचानक सुट्टी रद्द व्हायची. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :