Breaking News
Home / जरा हटके / माणुसकी अजूनही जिवंत आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांतून अश्रू थांबणार नाही

माणुसकी अजूनही जिवंत आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांतून अश्रू थांबणार नाही

सोशल मीडिया वरून आपल्याला काही विषयांवर लेख, व्हिडियोज हे सातत्याने प्रसिद्ध होताना दिसतात. या विषयांतील एक समान विषय जो बहुतांश सगळ्यांकडून चर्चिला जातो तो म्हणजे प्राणिमात्र. त्यांच्यावर अनेक वायरल व्हिडियोज तयार होत असतात. आपण ते पाहून त्यांचा आनंद घेत असतो. तसेच सहसा प्रणिमात्रांविषयी प्रेम हे सर्वसामान्य माणसाच्या ठायी असतोच. पण गोष्टी केवळ विचाराधीन असून चालत नाहीत तर कृती सुद्धा आवश्यक असते. आमच्या टीमला एक व्हिडियो दिसला आणि त्यातून हे प्रामुख्याने जाणवलं. आपण काही व्हिडियोज पाहतो त्यात एखाद्या प्राण्याचा आवडता/ती मनुष्य अथवा इतर प्राणी मे’ल्यास त्यांना दुःख्ख होत असतं. यासंदर्भात काही बातम्या ही आपण वाचत असतो. पण हे भर रस्त्यात घडलं तर?

असंच काहीसं घडलं एके ठिकाणी. या व्हिडियोत ते ठिकाण कोणतं आहे ते कळत नाही. पण भर रस्त्यात एक कुत्रं म’रून पडलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्याच्या बाजूला दुसरं कुत्रं उभं असतं. आपलं कोणी तरी गेलं आहे किंवा त्यास काही तरी झालं आहे, त्यामुळे ते जागेवरून हलत नाही, हे जाणवून होणारी संभ्रमावस्था त्या प्राण्याच्या देहबोलीतून कळतात. वागण्यातली अस्थिरता जाणवते. आजूबाजूने गाड्या, टांगे येत जात असतात. पण कोणीही काहीही करत नाही. तेवढ्यात समोरून दोन स्त्रिया रस्ता ओलांडून येण्याच्या तयारीत असतात. त्यांना हे दृश्य दिसतं आणि त्या विचलित होतात. अशा वेळी खरं तर कोणी तरी त्या मृ’त कुत्र्यास बाजूला ठेवावं हे अपेक्षित असतं. पण कोणीही तसं करताना दिसत नाहीत म्हणून या दोघींपैकी एक स्त्री पुढे सरसावते. आपल्या हातातली बॅग ती मैत्रिणीच्या हातात देते. त्या मृ’त कुत्र्यास हातात अलगद उचलून घेण्याचा प्रयत्न करते.

जवळच असणाऱ्या त्या दुसऱ्या कुत्र्यास कोणी तरी काही तरी मदत करण्यास आल्याचं कळतं. तो त्या स्त्रीच्या आजूबाजूस वावरत राहतो, त्या मृ’त कुत्र्यास हुंगत राहतो, अगदी रस्ता ओलांडून जाताना आणि रस्ता ओलांडून गेल्यानंतर ही तो आसपास रेंगाळत राहतो. ती स्त्री त्या मृ’त कुत्र्यास उचलून रस्त्या पलीकडे ठेवते आणि हा व्हिडियो संपतो. त्या स्त्रीचं प्रणिमात्रांवरील प्रेम हे सिद्ध होतंच, सोबत माणुसकी काय असू शकते हे अधोरेखीतही होते. तसेच वेळप्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन निस्पृह भावनेने काम करण्याची वृत्ती ही सुद्धा कौतुकास्पद, कारण फार कमी लोकांमध्ये ही अशी वृत्ती दिसून येते. या माउलीला आमच्या टीमचा मानाचा मुजरा !

बघा व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.