Breaking News
Home / बॉलीवुड / माधुरीला पाहताच शेखर सुमन पैसे न घेताच चित्रपटात काम करायला तयार झाला

माधुरीला पाहताच शेखर सुमन पैसे न घेताच चित्रपटात काम करायला तयार झाला

शेखर सुमन यांच्याकडे को-स्टार संबंधित गोष्टींचा खजिना आहे. त्यांना या बद्दल विचारले असता त्यांनी मीडियाशी त्यांच्या काही गोड आठवणी शेअर केल्या. एकदा निर्माते सुदर्शन रतन यांचा फोन आला. ते म्हणाले की ते एका चित्रपट बनवण्याचा विचार करीत आहेत. त्याचं नाव ‘मानव हत्या’ असे आहे. अभिनेत्री बद्दल त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, “एक नवीन मुलगी आहे. तिने राजश्री सोबत एक चित्रपट ‘अबोध’ यामध्ये काम केले आहे. त्यावर शेखर सुमन ह्यांनी फिस बद्दल विचारले असता ते म्हणाले की, “फीस देणे शक्य होणार नाही. कारण अभिनेत्री पण अजून या क्षेत्रात नीट रूळलेली नाही, तर कसे देणार”, असे ते म्हणाले. तरीही, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांच्या घरी गेलो. ते मला जेबी नगर येथील, मुंबईच्या छोट्याशा घरात घेऊन गेले. सुदर्शन म्हणाले की, “हिरोईन दोन मिनिटात येईल.” तेवढ्यात माधुरी आल्या. सुदर्शन यांनी विचारले, “काम करणार का?” त्यावर शेखर सुमन म्हणाले, “हो नक्कीच करेन की!”

‘मानव हत्या’ च्या सेटवर सुभाष घई यायचे. तिकडे त्यांची ‘मेरी जंग’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यांना पाहून मी लोकांसमोर बढाया मारायचो कि मी माझा पुढचा चित्रपट घई सोबत साइन करणार आहे. नंतर माहिती झाले की, ते माधुरी साठी सेटवर यायचे. त्यांनी माधुरी यांना ‘कर्मा’ या चित्रपटासाठी एका डान्स सीक्वेंस मधे छोट्याश्या भुमिकेसाठी घेतले होते. परंतु माधुरीच्या कामाने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी तिला ‘कर्मा’ चित्रपटातला तिचा छोटा रोल काढून अनिल कपूर ची हिरोईन म्हणून ‘हिफाजत’ या चित्रपटात मुख्य भूमिका दिली.

बायकोने केला होता मेकअप
शेखर सुमन ह्यांनी माधुरी सोबतची अजून एक आठवण शेअर केली. हि आठवण त्यांच्या शूटिंग दरम्यानची आहे. त्यांनी सांगितले माधुरी आणि मी शूटिंगसाठी एका मोटारसायकल वरून जायचो. कारण माधुरीकडे कोणते वाहन नव्हते व आम्ही एकाच परिसरात राहायचो. त्यांना पिक करायचो आणि सोडून घरी यायचो. एके दिवशी या चित्रपटाची शूटिंग माझ्या घरी झाली. माझ्या बायकोने माधुरी ला तिचे कपडे घालायला दिले. दिग्दर्शकाने सांगितले की, मेकअप खराब दिसतोय तर मेकअप ही माझ्या बायकोने केलं.

लतीफ खान चा ‘इंसाफ अपने लहू से’ हा चित्रपट करत होते. ज्यात संजय दत्त, सोनम आणि मी होतो. चित्रपटाच्या मुहूर्त शॉर्टच्यावेळी अमिताभ बच्चन प्रोत्साहन देण्यासाठी हजर होते. मी उत्साहात होतो की, मी अमिताभ बच्चन ला भेटणार. क्लिप च्या वेळी खोट्या बंदुकीने फायरिंग झाल्यावर आधी मला, मग संजय दत्तला आणि मग सोनमला डायलॉग बोलायचे होते. परंतु बंदुक चालवताना गोळी अडकली, आणि गोळी अडकली म्हणून मी शांत होतो. तितक्यात संजय दत्तने त्याचा डायलॉग बोलायला सुरुवात केली. जेव्हा ते बोलायला लागले, गोळी चालू झाली. गोळी चालू झाली म्हणून मी माझा डायलॉग सुरु केला. तेव्हा संजय दत्त थांबला. मला वाटले कि तो बोलत आहे तर मला थांबायला हवं, ह्यामुळे मी गप्प झालो. आम्ही दोघेही गप्प झालो, तोपर्यंत सोनमने तिचा डायलॉग बोलायला सुरुवात केली. इतकं कन्फ्युजन झाले कि स्वतः बच्चन साहेब म्हणाले कि, “भावांनो अगोदर ठरवा कि कोणाला केव्हा आणि काय बोलायचे आहे. कारण मी हाच विचार करतो आहे कि टाळ्या वाजवू कि नको वाजवू. मी १००-१५० मुहूर्त शॉर्ट अटेंड केलेत, परंतु इतकं कन्फ्युजन कधीच नाही पाहिलं.” तेव्हा तर आम्ही खूप हसले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.