Breaking News
Home / मनोरंजन / माधुरी आणि रेणुका सेटवर असताना अचानक ‘लो चली मै’ गाणं सुरु झालं आणि २४ वर्षानंतर दोघींनी पुन्हा केला एकत्र डान्स

माधुरी आणि रेणुका सेटवर असताना अचानक ‘लो चली मै’ गाणं सुरु झालं आणि २४ वर्षानंतर दोघींनी पुन्हा केला एकत्र डान्स

तुम्ही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या धर्मातील कुठल्याही लग्नात जा, सगळीकडे २ गाणी कॉमन असतील. ही गाणी लागल्याशिवाय लग्न पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. पहिलं गाणं म्हणजे ‘बहारो फुल बरसाओ’ आणि दुसरं गाणं ‘लो चली मै, अपने देवर की बारात ले के’. यातील दुसरं गाणं तमाम मराठीजणांना भावणारं आहे, कारण या गाण्यात आणि सदर चित्रपटात ‘अखिल भारतीय तरुण संघटनेची’ क्रश माधुरी दीक्षित होती. तसेच जोडीला रेणुका शहाणे, लक्ष्मीकांत ब्रेर्डे, प्रिया बेर्डे असे अनेक मराठी कलाकार होते. त्यामुळे फक्त मराठी पुरुषच नाही तर मराठी महिलाही हे गाणं आणि चित्रपट आवर्जून बघतात.

आजही हे गाणं ऐकलं तर आपल्याला आठवते लाजणारी, मुरडणारी माधुरी दीक्षित आणि सलमानसोबत लडिवाळपणे नाचणारी रेणुका शहाणे. आता रेणुका शहाणे यांनी बऱ्यापैकी ब्रेक घेतला असला तरीही माधुरीचं वलय अजूनही कायम आहे. तिच्या दिसण्यात यत्किंचितही फरक पडलेला नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस माधुरीचं सौंदर्य बहरत चाललेलं आहे. मात्र आता ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट आणि गाणं येऊन २७ वर्षे पूर्ण झालीत. मात्र तरीही या गाण्याची मजा, आनंद टिकून आहे.

आता काही सेकंदासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं की, या वयातही माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे एकत्र येऊन ‘लो चली मै, अपने देवर की बारात ले के’ या गाण्यावर थिरकत आहेत तर तुम्हीही म्हणाल, हा तर दुग्धशर्करा योग झाला. कारण त्यानंतर या दोघींना एकत्र फारसं बघितलं गेलं नाही. तसंच दोघीही मराठी असल्याने मराठी मंडळी या दोघींना एकत्र बघायला मिळतंय म्हटल्यावर जर सावरूनच बसणार. या दोघींचाही मराठी महिलांवरही मोठा प्रभाव आहे. आजही हा चित्रपट जेव्हा जेव्हा दाखवला जातो, तेव्हा कायम दुपारीच लागतो. त्याचं कारण आहे, दुपारच्या वेळी महिलांना टीव्ही बघण्यासाठी वेळ असतो म्हणून हा चित्रपट दुपारी दाखवला जातो. यावरून तुम्हाला लक्षात येईल की, या सिनेमाचा आणि माधुरीश रेणुका शहाणेंचा किती प्रभाव आहे.

तर आता आमच्या टीमला या दोघींचा एक लेटेस्ट आणि भन्नाट डान्स असलेला व्हिडीओ मिळालेला आहे. यात या दोघी गप्पा मारताना दिसत आहेत. अचानक कुठुन तरी तमाम भारतीय लग्नात मोठ्या आनंदाने वाजवत जाणारं ‘लो चली मै, अपने देवर की बारात ले के’ हे गाणं सुरू होतं. अचानक लागलेलं हे गाणं ऐकून दोघीही आश्चर्यचकित होतात. आणि मग त्यानंतर सुरू होतो त्यांचा डान्स…

हा डान्स पाहून तुम्हालाही थेट लाजणारी माधुरी दीक्षित आणि सलमानला जीव लावणारी त्याची गोड वहिनी रेणुका शहाणे आठवतात. या व्हिडीओत त्यांनी केलेला डान्स निव्वळ अप्रतिम आहे. कुठलीही तयारी नसताना, अचानकपणे असं डान्स करणं म्हणजे तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी एक पर्वणीच समजायची. व्हिडीओत दिसणाऱ्या प्राथमिक माहितीनुसार हे कुठल्या तरी चित्रपटाचं लोकेशन वाटत आहे. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की, त्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ व्हायरल केला असावा. मात्र असे काही नाही, कारण हा व्हिडिओ साधा कॅमेरा असणाऱ्या मोबाईलवर शूट केलेला आहे. तसेच त्यांनी अचानकपणे हे गाणे सुरू झाल्यावर त्यावर नाच केला आहे. योगायोगानं ते गाणं लागणं आणि या दोघींचं नाचणं हे सगळं अफलातून आणि नैसर्गिक आहे. हा सर्व किस्सा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या सेट वरचा आहे. माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे किंवा या चित्रपटाचे तुम्ही चाहते असाल तर तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच बघा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *