मित्रांनो, बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाचे खूप जुनं नातं आहे. सुरुवातीपासूनच दोघांमध्ये एक वेगळंच नातं तयार झालंय. आता हे सांगायची गरजच नाही आहे कि ह्या दोन्ही विश्वातील संबंध असलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ते. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री बऱ्याच ठिकाणी एकत्र भेटतात, पार्ट्या, डेटिंग नंतर त्यांचे प्रेमाच्या नात्यात सुद्धा रूपांतर होतं. जर काही वर्षा अगोदरचा रेकॉर्ड पाहिलं, तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे मन भारतीय क्रिकेटपटुंवर आलेलं आहे. ह्यामधील एक अभिनेत्रीचे मन तर वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवर सुद्धा आलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताचे तर वेस्ट इंडिजचा लोकप्रिय क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड बरोबर प्रेमसंबंध होते. काही कारणास्तव त्यांचे लग्नामध्ये रूपांतर होऊ शकले नाही. अश्याच प्रकारच्या एका जोडीबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडची धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी माधुरी दीक्षितची लोकप्रियता तर सर्व देशभर आहे. एक वेळ अशी होती कि जेव्हा संपूर्ण बॉलिवूड वर माधुरीचेच राज्य चालत होते. माधुरी दीक्षितची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते वेडे व्हायचे. जरी आता माधुरी बॉलिवूड पासून दूर झाली असली तरी वेळेवेळेला अवॉर्ड फंक्शन, बॉलिवूड पार्टी, रिऍलिटी शोज, मोजके चित्रपट ह्यात दिसुन येते. एकेकाळी माधुरीचे नाव अनेक सेलेब्रेटींसोबत जोडले गेले होते.
तिच्या एका हास्यावर अनेकजन भान हरपून जायचे. पण, माधुरीचं भान मात्र एकाच व्यक्तीने हरपलं होतं. त्या व्यक्तीचं नाव आहे, क्रिकेटर अजय जडेजा. एका मासिकाच्या फोटोशूट निमित्ताने अजय आणि माधुरी पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. अजय जडेजाचं त्यावेळचं क्रिकेट विश्वातील स्थान आणि त्याचं एकंदर राहणीमान पाहता अनेक तरुणी त्याच्यावर भाळल्या होत्या. पण, त्याचे खरे सूत जुळले ते म्हणजे माधुरीशीच. माधुरी आणि अजय एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करु लागले. त्यांची वाढती जवळीक पाहता चित्रपट वर्तुळातही या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. परंतु अजय जडेजाच्या एका चुकीमुळे तिचे मन तुटले.
अश्याप्रकारे झाली होती दोघांची भेट :
अनेक सुपरहिट चित्रपट देणारी माधुरी जडेजावर मनापासून प्रेम करत होती. एका मॅगजीनच्या वेळी दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली. दोघांच्या अफेअरच्या चर्चा देशभर होऊ लागल्या. दरम्यान जडेजा सुद्धा बॉलिवूड चित्रपटात येण्याच्या प्रयत्नात होता. इथे बॉलिवूड डायरेक्टर्सना सुद्धा वाटत होते कि चित्रपटांसाठी एक नवीन जोडी मिळणार आहे. माधुरीच्या शिफारशीने एका प्रोड्युसरने अजय जडेजाला एका चित्रपटात घेण्याची घोषणा सुद्धा केली होती.
अजयच्या ह्या एका चुकीमुळे माधुरीचे मन तुटले आणि दोघात दुरावा निर्माण झाला :
तर इथे बॉलिवूडमध्येही या प्रेमप्रकरणामुळे काही चक्रे हलू लागली होती. असंही म्हटलं जातं की, माधुरीच्याच सांगण्यावरुन एका निर्मात्याने अजय जडेजाला चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून निवडलं होतं. पण, माधुरीसोबतच्या प्रेमप्रकरणादरम्यानच अजयच्या क्रिकेट कारकिर्दीवर काही महत्त्वाचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा क्रिकेटवरील परफॉर्मन्स सतत बदलत होता. माधुरीसोबत भेटी नंतर अजयचे सुद्धा क्रिकेटमध्ये मन लागत नव्हते आणि ह्याचा परिणाम सुद्धा त्याच्या खेळावर दिसत होता. मीडियामध्ये दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या रोज येऊ लागल्या. जडेजाच्या कुटुंबियांना हि गोष्ट आवडली नाही. या साऱ्यामुळे अजयच्या कुटुंबियांनी माधुरीवर नाराजी व्यक्त केल्याचंही म्हटलं जातं. कुटुंबियांची नाराजी, परंपरा या साऱ्याचा कारकिर्दीवर होणारा परिणाम पाहता अजयने आपल्या खेळामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. ह्यानंतर मॅच फिक्सिंग मध्ये जडेजाचे नाव मोहम्मद अजरुद्दीन सोबत समोर आले. ह्या बातमी ने माधुरीचे मन तुटले. त्यानंतर तिने अजय जडेजापासून दूर राहणंच पसंत केलं.