Breaking News
Home / मनोरंजन / मानसी नाईकने स्टेजवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा मानसीचा हा जबरदस्त परफॉर्मन्स

मानसी नाईकने स्टेजवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा मानसीचा हा जबरदस्त परफॉर्मन्स

कलाकार म्हंटलं की कलाकृती आल्याचं. प्रत्येक कलाकाराची स्वतःची अशी एखादी किंवा अनेक कलाकृती असतात ज्यांच्यामुळे कलाकार ओळखले जातात. ही ओळख एवढी पक्की असते की केवळ त्या कलाकाराचं किंवा कलाकृतीचं नाव जरी ऐकायला आलं तरी दुसरं नाव लगेच आठवतं. आपल्याकडील काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेतच. यातील एक आघाडीचं उदाहरण म्हणजे मानसी नाईक. हे नाव वाचलं तरी, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ हे शब्द नकळत आठवतात. मानसीजींनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकृती केल्या आहेत. पण ही कलाकृती म्हणजे त्यांची विशेष ओळख बनून राहिली आहे.

आपण त्यांच्या या गाण्यावरील डान्स अनेक वेळेस टीव्ही वरून बघितला असेल. अनेक वेळेस त्यांनी स्टेज शोज ही केले आहेत आणि त्यावेळी लोकाग्रहास्तव या गाण्यावर डान्स केला आहे. आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या डान्सने आपलं मन जिंकलं आहे. आपलं मनोरंजन केलं आहे. आज हेच मनोरंजन पुन्हा एकदा करून घेण्याची नामी संधी आपल्या टीमला साधता आली.

मानसीजींनी एकदा या गाण्यावर जो स्टेज परफॉर्मन्स दिला होता त्याचा व्हिडियो बघायला मिळाला. तसेच हा व्हिडियो अजून एका गोष्टीसाठी खास होता. किंबहुना अजूनही आहे. ही खासियत म्हणजे हा व्हिडियो त्या मंचाच्या विंगेतून रेकॉर्ड केल्याच कळून येतं. एरवी आपण प्रेक्षक म्हणून त्यांना मंचाखालून परफॉर्मन्स देताना पाहतो. पण या व्हिडियोमुळे त्यांचा डान्स आणि सोबत समोर असलेले प्रेक्षक हे एकाच फ्रेम मध्ये दिसून येतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा ‘वाट बघतोय रिक्षावाला’ हे गाणं एव्हाना मध्यावर आलेलं असतं. त्यामुळे मानसीजींना आपण थेट डान्स करतानाच बघत असतो. त्यामुळे अगदी पहिल्या क्षणापासून ते व्हिडियो संपेपर्यंत आपल्याला हा व्हिडियो मानसी यांच्या ऊर्जेने आणि उत्साहाने भारून गेला आहे हे कळतं. नकळतपणे आपणही या उर्जेचा एक भाग होऊन जातो. तिथे उपस्थित असलेल्या मंडळींना तर प्रचंड आनंद झालेला दिसून येतो. त्यात मानसी या डान्स करताना मध्ये मध्ये या प्रेक्षकांना मोठ्या आवाजात प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहन देत असतात. एका उत्तम कलाकाराचं हे लक्षण आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कारण या प्रतिक्रिया देताना प्रेक्षक नकळतपणे त्या परफॉर्मन्स मध्ये सामील होऊन जातात.

भलेही ते स्टेज वर परफॉर्मन्स करत नसतील पण आपणही या परफॉर्मन्सचा एक भाग आहोत हे त्यांना वाटत राहतं. जेव्हा एखादा गायक प्रेक्षकांसमोर माईक धरून त्यांना एकत्र गायला लावतात अगदी तसच हे सुदधा आहे. त्यामुळे मानसी यांचं चातुर्य आणि चाणाक्षपणा यातून दिसून येतो. यानिमित्ताने आपल्या टीमचा मानसी यांना मानाचा मुजरा. मानसी यांचा हा परफॉर्मन्स तसा दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळ चालतो पण तरीही जबरदस्त आनंद देऊन जातो. आपण हा व्हिडियो तर वारंवार पाहतोच. त्यांच्या नृत्याचा आस्वाद घेत रहावा अस वाटत राहतं. सोबतच त्यांची अदाकारी, त्यांचं पदललित्य, त्यांचे ठुमके, त्यांचं लोकांना या परफॉर्मन्स मध्ये सामावून घेणं याच कौतुक वाटत राहतं. आपणही हा परफॉर्मन्स बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असणार यात शंका नाही.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. उत्तमोत्तम कलाकार आणि त्यांच्या कलाकृती यांच्याविषयी आपली टीम नेहमीच लिहीत आली आहे आणि लिहीत राहील. आपणही आपल्या या लेखांना नेहमीच मोठ्या प्रमाणात शेअर करत आम्हाला प्रोत्साहन देत आला आहात. हा लेखही त्यास अपवाद असणार नाही याची खात्री आहे. सोबतच आपला हा पाठिंबा येत्या काळातही आमच्या पाठीशी असू द्या. आपल्या टीमचे लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.