Breaking News
Home / मनोरंजन / माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना किती बदलते, बघा हा मजेशीर व्हिडीओ

माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना किती बदलते, बघा हा मजेशीर व्हिडीओ

संवाद ही आपली मूलभूत गरज आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. कारण संवाद साधण्यासाठी आपण विविध माध्यमांचा सतत वापर करत असतो. अनेक वेळेस संवाद न साधणं ही सुद्धा एक प्रकारे संवाद साधण्याचीच कृती असते. असो. पण जेव्हा एखादी माहिती अशा विविध माध्यमांतून जात असते तिच्यावर विविध असे संस्कार होत असतात. याच तत्वावर आधारित एक वायरल गंमतीदार आणि माहितीपूर्ण व्हिडियो आमच्या टीमच्या हाती लागला आहे. ह्या वायरल व्हिडियोज मुळे दोन गोष्टी होतात. एक तर आपण खळखळून हसतो आणि माहितीवर किती प्रमाणात वेगळ्या स्वरूपात संस्कार होऊन तिचा विपर्यास होऊ शकतं हे प्रकर्षाने कळतं.

या व्हिडियोत एका आस्थापनाचे काही कर्मचारी एका ट्रेनिंग सेशन दरम्यान एकत्र झालेले पहावयास मिळतात. वय जास्त असलं तरीही यात सहभागी होण्याचा उत्साह त्यांच्यात दिसून येतो. तसेच काहीशी हुरहूर ही असतेच. या ट्रेनिंग ची सुरुवात होते ती एका टास्क ने. ज्यात कर्मचारी एकमेकांना पाठमोरे राहतील अशा पद्धतीने उभे असतात. त्यातील एका कर्मचाऱ्याला एक मॅडम पुढे येऊन काही डान्स स्टेप्स करून दाखवणार आणि त्याने त्या पुढील कर्मचाऱ्याला करून दाखवायच्या असा हा टास्क. मॅडम स्टेप्स करून दाखवतात. पण थोड्या दडपणाखाली असल्यामुळे असेल पण कर्मचारी पुन्हा एकदा त्या स्टेप्स करून दाखवायला सांगतो. मॅडम त्या स्टेप्स करून दाखवतात आणि सुरू होते ती धमाल. पहिले दोन कर्मचारी आपल्या परीने त्या स्टेप्स करतात. त्यात होत असलेले छोटेसे बदल आपल्याला जाणवतात. पण पुढील काही कर्मचारी मात्र एवढ्या घाईत असतात की विचारता सोय नाही. कदाचित आजूबाजूला चालू असलेल्या हसण्यामुळे त्यांच्यावर दडपण येत असावं.

पण त्यांना समजवल्यावर मात्र ते आपल्या परीने स्टेप्स करतात. यावेळी मात्र स्टेप्स मध्ये झालेले बदल लक्षणीय असतात. जे बदल झालेले आहेत त्यांच्यासकट हा टास्क सुरू राहतो. आजूबाजूला आधी हास्याची कारंजी उडत असतात मग मात्र त्याचं हास्यकल्लोळात रूपांतर होतं. शेवटच्या कर्मचाऱ्याने हा टास्क करेपर्यंत आपणही यात अगदी गुंगून जातो. व्हिडियोच्या शेवटी शेवटी मग शेवटच्या कर्मचाऱ्यास आणि पहिल्या कर्मचाऱ्यास एकमेकांसमोर उभं केलं जातं. दरम्यान ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आहे अशा कर्मचाऱ्यांची हसून हसून पुरेवाट झालेली असते. आणि जेव्हा हे पहिले आणि शेवटचे कर्मचारी समोर येतात आणि डान्स स्टेप करतात तेव्हा हस्यस्फो’ट होतो आणि हा व्हिडियो संपतो.

या व्हिडियोतून आपल्याला जो निखळ आनंद मिळतो त्याला तोड नाही. त्यासाठी हा कार्यक्रम आयोजकांचे आणि त्यात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या मुळे आम्हाला काही क्षण आनंदाचे आणि प्रबोधनाचेही अनुभवता आले. माहिती एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती सांगणाऱ्या व्यक्तीच्या अनुभव, आकलन शक्ती, आजूबाजूचं ताणतणाव असलेलं वातावरण आणि वेळेची मर्यादा त्या माहितीवर कशा प्रकारे अनपेक्षित संस्कार करू शकतात हे लक्षात येतं. तसेच यामुळे एखादी गोष्ट फॉरवर्ड करताना किंवा त्याविषयी बोलताना खातरजमा करून घेतलेली बरी हे ही प्रकर्षाने जाणवतं. असो. आपणांस हा लेख आवडला असल्यास आमच्या या लेखास शेअर करायला विसरू नका बरं का. तसेच वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करून आमच्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लिहिलेले लेखही आपण वाचू शकता. त्यासाठी वायरल असं लिहून आमच्या वेबसाईटवर वर सर्च करा. आपल्याला लेख उपलब्ध होतील. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.