मित्र असावेत का नसावेत असा प्रश्न खरं तर अलाहीदाच. कारण मित्र असणं ही आपली गरज आहे आणि ते आपल्या सारखेच स्वभावाचे असणं हे जणू काही मैत्रीचं अतूट समीकरणच असतं. त्यातही या मैत्रीत आपण जे जे अनुभव एकत्र घेतो, ते पुढे जाऊन रम्य अशा आठवणी बनतात आणि त्या तशा होणं याचं कारण म्हणजे आपण कोणताही अभिनिवेश धारण न करता आपल्या मित्रांसमोर मनमोकळं वागू शकतो. त्यांच्या समोर चुकण्याची मुभा असते आणि त्या चुकांसाठी आपल्यावर ते हसले तरी वाईट वाटत नाही. कारण शेवटी ते आपले जिगरी यार असतात ना. एवढंच नव्हे तर आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रांच्याच खोड्या काढतो. जेवढे जिगरी मित्र तेवढ्याच जास्त खोड्या काढल्या जातात. असाच एका व्हिडियो आमच्या टीमच्या समोर आला आणि आम्हीही काही काळ जुन्या आठवणींत रमलो.
हा व्हिडियो आहे काही मित्रांचा. एक मित्र दुसऱ्या मित्राला हातातलं नाणं गायब करून दाखवतो असं सांगतो. जा’दू दाखवतोय म्हंटल्यावर हा मित्रही तयार होतो. त्यावर पहिला मित्र हातातलं नाणं पाण्याच्या एका पाण्याच्या बाटली खाली ठेवतो. वर रुमाल धरतो. रुमाल अशा पद्धतीने खाली ठेवतो की अगदी व्यावसायिक जादूगार असावा. ते नाणं बॉटलच्या खाली असल्याने दिसू शकत नाही. पण आपल्या मित्राने अजून जवळून येऊन पहावं म्हणून हा मित्र त्याला जवळ बोलावतो. मित्रही येतो आणि नाणं निराखण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पहिल्या मित्राचे हात बॉटल कडे जातात. क्षणात पुढे काय होणार हे आपल्याला लक्षात येतं. लक्षात आल्यापासून आपल्या चेहऱ्यावर स्मित येईपर्यंत पहिल्या मित्राने पाण्याच्या बाटलीला जोरात दाबलेलं असतं. त्यामुळे पाणी एवढ्या जोरात वर येतं की दुसऱ्या मित्राला भिजवतं. दुसरा मित्र झाल्या प्रकाराने पाणी झाडत, डोळे चोळत बाजूला जातो, तर पहिला मित्र आणि आजूबाजूची मंडळी पोट धरून हसत असतात.
आपणही नकळत त्यांच्या या हसण्यात सामील होतो आणि हा व्हिडियो कधी संपतो. व्हिडियो संपल्यावर मनात ताज्या होतात त्या आपल्या मित्रांसोबत च्या आठवणी आणि त्या दिवसभरात आपण आपल्या त्या मित्रांना नकळत कॉल किंवा मेसेज करतो, पुन्हा त्या आठवणी जगावतो. आमच्या टीम सारख्याच आपल्या आठवणी ताज्या झाल्या असतीलच. पण घाई करू नका. तुमच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक लेख आमच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. त्यासाठी एक करा. वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑ’प्शनमध्ये जा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला विविध लेख वाचावयास मिळतील. त्यांचा आनंद घ्या आणि आपल्या मित्रमंडळींनाही हा वाचनाचा आनंद घेऊ द्या. हे आ’र्टिकल आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद !
पहा व्हिडीओ :