वायरल व्हिडियोज चा विषय हाती घेऊन काही महिने झाले आहेत. पण या काळात आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांना आपला जो प्रतिसाद मिळाला आहे तो अतिशय उत्तम आहे. आपल्या या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तसंच आपल्या टीमच्या हे ही लक्षात आलं की डान्स व्हिडियोज नंतर लग्नाच्या व्हिडियोज वरील लेखांना आपली जास्त पसंती मिळते आहे. मग काय, आपली टीम लागली ना कामाला. शेवटी आमचं ध्येय पक्कं आहे. आपल्या वाचकांच्या धकाधकीच्या जीवनात चार निवांत क्षण आमच्या लेखांमुळे आले पाहिजेत. तशीच मजा पण आली पाहिजे. याच परंपरेला जागेत आपल्या टीमने एका वायरल व्हिडियो वर आजचा लेख लिहायचं ठरवलं. हा व्हिडियो म्हणजे एका दाक्षिणात्य लग्नातील प्रसंग आहे. आता आपल्याला तर माहिती आहेच लग्न म्हंटलं की गंमती जंमती आल्या.
त्यात दाक्षिणात्य लग्न म्हणजे त्यात सोन्याचा मुबलक वावर असतो. म्हणजे वर्हाडी मंडळींकडे सोनं असतंच, सोबतच वधू वरांना ही आहेर म्हणून सोनं मिळतं. हे लग्नही यास अपवाद नसतं. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा नवरा नवरी लग्नमंडपात बसलेले दिसतात. जुना व्हिडियो असल्याने बक्कळ माणसं उपस्थित असलेली जाणवतं. व्हिडियो जसा सुरू होतो तसं तसं एकेक मित्र मंडळी पुढे येऊन नवरदेवाला आणि नवराईला भेटवस्तू देत असतात. पहिली भेटवस्तू नवराईला दिली जाते. मग मात्र नवऱ्याचा एक मित्र येतो. तो नवऱ्याच्या गळ्यात सोन्याची चैन घालतो. मग दुसरा मित्र येऊन अजून एक चैन या नवरदेवाच्या गळ्यात घालताना दिसतो. मग येते एक चिमुकली. ती तिच्यासारखीच एक छोटीशी भेटवस्तू नवरदेवाला देते. तोही तिचं कौतुक करत तिच्याशी हातमिळवणी करतो. तेवढ्यात त्याचा तिसरा मित्र येतो आणि नवरदेवाचा हात हातात घेतो. नुसता हातमिळवणी करेल वाटतं असं मनात येईपर्यंत त्याने एक अंगठी या नावरदेवाच्या हातात घातलेली असते.
मजा आहे यार याची असं आपल्याला वाटत राहतं. पुढेही अजून चार मित्र येतात. प्रत्येक जण एकेक चैन घेऊन येतो आणि या नवरदेवाच्या गळ्यात घालतो. त्यांच्यात काही संभाषणही होतं, पण भाषेमुळे काही कळत नाही. खरं तर त्यावेळी भाषेची गरज नसतेच. जे काही चालू आहे त्याची आपल्याला कल्पना येत असते. मग अजून एक मित्र येतात. त्यांच्या हातात मात्र रॅप केलेली भेटवस्तू असते. भेटवस्तू देतात आणि थेट खिशात हात घालतात. खिशातून चैन काढतात आणि नवरदेवाच्या गळ्यात घालतात. आता मात्र वधुसकट सगळे जण हसायला लागतात. पुन्हा एक अंगठिबहाद्दर येतो. नवरदेवाच्या हातात अंगठी घालतो आणि चैन ही घालून निघून जातो. अजून दोन जणं येतात आणि चैन निघून जातात. सगळीकडे खसखस पिकलेली असते. मग एक मित्र येतो, भेटवस्तू देतो आणि हा ‘चैनी’चा कार्यक्रम समाप्त होतो.
व्हिडियो संपतो खरा पण असं काही आपल्या बाबतीत झालं तर किंवा झालं असतं तर किती बरं झालं असतं असं सहज वाटून जातं. असो. हा अवघा सवा मिनिटांचा व्हिडियो धमाल आणतो. एवढी धमाल की आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. प्रत्येक वेळी चैन देताना मित्रांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला आपल्या मित्रांची आठवण करून देतात. आपल्या पैकी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना स्वतःच्या लग्नाची आणि त्यात केलेल्या गंमती जंमतीची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
अशा या आनंद देणाऱ्या व्हिडियो वरचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला क’मेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले नवनवीन लेखही नियमित वाचत जा बरं का. शे’अर ही करा. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :