Breaking News
Home / मनोरंजन / मित्र असावेत तर असे, समोरून रेल्वे येत असताना एकाचा पाय रुळात अडकतो, बघा श्वास रोखून ठेवणारा हा प्रसंग

मित्र असावेत तर असे, समोरून रेल्वे येत असताना एकाचा पाय रुळात अडकतो, बघा श्वास रोखून ठेवणारा हा प्रसंग

वायरल हा जणू हल्लीच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे. खासकरून व्हिडियो या शब्दासोबत तर हा शब्द जणू खेटूनच येत असतो. या शब्दाची महती हल्ली एवढी वाढली आहे की जी जी व्यक्ति व्हिडियोज बनवते त्यांना आपले व्हिडियोज वायरल व्हावेत असं वाटत असतं. त्यात काही गैर ही नाही. पण म्हणून प्रत्येक व्हिडियो वायरल होतोच असं नाही. तर काही वेळेस अनाहूतपणे रेकॉर्ड झालेले व्हिडियोज सुद्धा वायरल झालेले बघितले असतीलच. त्यात या दोहोंच्या मध्ये संभ्रम निर्माण करतील असे व्हिडियोज ही वायरल होत असतात. त्यातीलच एक व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला. आजचा लेख त्याच व्हिडियो विषयी आहे.

हा व्हिडियो मुंबई येथील आहे असं प्रथम दर्शनी दिसून येतं. बहुधा वेस्टर्न रेल्वेवरील दोन स्थानकांच्या आसपासचा हा व्हिडियो असावा. ही दोन स्थानकं कोणती याविषयी मात्र कल्पना नाही. तसेच हा व्हिडियो केवळ १८ सेकंदांचा असल्याने इतर जास्त माहिती कळावी असेही काही होत नाही. पण जी घटना घडते ते पाहून क्षणभर का होईना आपला श्वास रोखला जातो हे नक्की.

होतं हे की व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला पाच जण रेल्वे ट्रॅक पार करताना दिसतात. बहुधा मित्र असावेत असा एक अंदाज बांधता येतो. व्हिडियोत उजव्या बाजूला आपल्याला एक डिजिटल घड्याळ दिसत असतं. ज्यात किती वाजून किती वेळ झाला असावा हे कळून येतं. त्या वेळेवरून ही घटना घडली ती सायंकाळची वेळ असावी. काम संपवून ही मंडळी ट्रॅक ओलांडून येत असावीत अस प्रथमदर्शनी वाटतं. दुरून येणाऱ्या ट्रेनकडे त्यांचं लक्ष असतं. पण कदाचित नेहमीची वाट असल्याने रमत गमत ही मंडळी जात असतात. ट्रेन जवळ येण्याच्या आत ही मंडळी हा रेल्वे ट्रॅक पार करून जातील अस वाटत असत पण नेमका त्याचवेळी एक माणूस खाली पडतो. एका रुळात त्याचा पाय अडकला असल्याचं दिसतं. आतापर्यंत दूर दिसणारी ट्रेन एव्हाना अगदी नजरेच्या टप्प्यात आलेली असते. तेवढ्यात ही बाकीची चार जण डोकं आणि जोर लावून या माणसाची सुटका करताना दिसतात. ही सुटका अगदी वेळेत होते आणि पापणी लवते न लवते तोच ट्रेन झर्रकन निघून जाते. व्हिडियो ही संपतो. जेव्हा त्या व्यक्तीचा पाय अडकला आहे असं दिसू लागतं तेव्हा नकळत आपल्या मनात अघटित विचार यायला लागतात. पण जेव्हा बाकीची मंडळी त्याला दूर नेतात तेव्हा चट्कन बरं वाटतं. पण या क्षणांमध्ये हा व्हिडियो म्हणजे एखादा स्टंट तर नसावा असं मात्र वाटून जातच.

जर हा स्टंट असेल आणि सगळं पूर्वनियोजित असेल तर मात्र हे असे स्टंट अजिबात योग्य नव्हेत. आपलं एक चुकीचं पाऊल आपल्याच जीवावर उठू शकतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थात ही घटना म्हणजे स्टंट आहे ही केवळ एक शक्यता आहे. कदाचित जी घटना आपण पाहतो ती सत्य सुद्धा असावी. पण या घटनेतून एक गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा अधोरेखित होते ती म्हणजे – तुम्ही कुठेही असाल तरीही रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नका. प्रत्येक वेळी तुम्हाला या चार मंडळींसारखी कोणीतरी वाचवायला हजर असतीलच असे नाही. आणि असलेच जरी, तरी त्यांचा उपयोग होईलच असे नाही.उलट उशीर झाला तर त्याच चार खांद्यावरून जाण्याची दुर्दैवी वेळ येऊ शकते हे प्रत्येकाने ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे. तेव्हा कृपा करून कधीही रेल्वे रूळ ओलांडत जाऊ नका. रेल्वेच्या पादचारी पुलांचा वापर करा. वेळ महत्वाची असतेच पण आपल्या जिवा पेक्षा नाही. कारण टायमिंग चुकलं तर कमी वेळेत काम करण्याचा अट्टाहास अंगाशी येऊ शकतो. तेव्हा सुखरूप राहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला आपल्या कमेंट्स मधून नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया, सकारात्मक सूचना आम्हाला बरंच काही शिकवून जातात. त्यांच्यातून बोध घेत आम्ही नवनव्या विषयांवर लेख लिहीत असतो आणि बदल करत असतो. त्यातून आपल्याला उत्तमोत्तम लेख वाचायला मिळत असतात. तेव्हा आपल्या प्रतिसाद आम्हाला कमेंट्स मधून नियमितपणे मिळत राहू दे. तसेच वाचक म्हणून आपला आणि आमच्या टीमचा हा स्नेहबंध दृढ होत जाऊ दे ही सदिच्छा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *