Breaking News
Home / जरा हटके / मित्र पाण्यात बुडत असताना घाबरला नाही ३ वर्षाचा मुलगा, अश्याप्रकारे वाचवला मित्राचा जीव

मित्र पाण्यात बुडत असताना घाबरला नाही ३ वर्षाचा मुलगा, अश्याप्रकारे वाचवला मित्राचा जीव

तीन वर्षाच्या मुलाला जास्त कळत नसतं. अनेकदा तर मुलांना ह्या वयात गोड गोड खाणे आणि खूप जास्त मजामस्ती करणं इतकंच माहिती असते. परंतु आज आपण तीन वर्षाच्या एका अश्या मुलाला भेटणार आहोत ज्याने छोट्याश्या वयामध्ये खूप जास्त धाडसाचे काम करून सर्वांना थक्क करून सोडले आहे. ह्या तीन वर्षाच्या मुलामुळे एका जीवाचे प्राण वाचले.

पूल मध्ये बुडाला मुलगा, ३ वर्षाच्या मुलाने वाचवले मित्राचे प्राण
खरंतर ह्या दिवसात सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. ह्या व्हिडीओमध्ये दोन मुले पुलाच्या जवळ खेळताना दिसत आहेत. तेव्हा एक मुलगा अचानक स्विमिंग पूलमध्ये पडतो. ह्या मुलाला बुडताना पाहून त्याचा मित्र बिलकुल सुद्धा घाबरत नाही आणि आपला हात पुढे करून त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढतो.

सीसीटीव्ही मध्ये कैद झाली पूर्ण घटना
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ब्राझील येथील असून इथे Arthur De Oliveira आणि त्याचा मित्र Henrique एका छोट्याश्या पुलाजवळ खेळत होते. जेव्हा Henrique पुलामध्ये डुबू लागतो तेव्हा ३ वर्षीय Arthur De Oliveira ने धाडसाने त्याचा जीव वाचवला. हि संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.

बघा व्हिडीओ
आर्थर ची आई Poliana Console de Oliveira ह्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहे.

धाडसाबद्दल मिळाला पुरस्कार
जेव्हा हा व्हिडीओ खूप जास्त वायरल झाला तेव्हा सर्वजण ह्या तीन वर्षीय मुलाच्या धाडसाचे कौतुक करू लागले. ह्या घटनेमुळे military police of Itaperuna ने ह्या मुलाला त्याच्या धाडसाबद्दल bravery अवार्ड देऊन सन्मानित केले. त्यांनी आर्थर ला एक बास्केट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले. ह्यासोबतच ऑफिसर्स म्हणाले कि जगाला अश्याच हिरोंची गरज आहे. तर मुलाने सुद्धा पुरस्कार स्वीकारत सांगितले कि धाडसासाठी कोणते वय नसते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *