Breaking News
Home / बॉलीवुड / मिथुनची पहिली बायको परदेशात करते हे काम, आजही दिसते खूपच सुंदर

मिथुनची पहिली बायको परदेशात करते हे काम, आजही दिसते खूपच सुंदर

अभिनेता मिथुन चक्रवर्ती बॉलिवूड मधील त्या कलाकारां पैकी आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर नाहीत तर प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा राज्य केलेले आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाला खूप पसंती दिली. चित्रपटा व्यतिरिक्त मिथुन रियालिटी शोमध्ये जजची भूमिका निभावताना दिसतात. मिथुन दा चे स्वतःचे जीवन रहस्यमय आहे. मिथुनने दोन लग्न केले. त्यांची दुसरी पत्नी योगिता बाली विषयी सर्वाना माहिती असेलच. मिथुन १९७९ मधे योगिता सोबत विवाहबध्द झाले. जी आज पर्यंत त्यांच्या सोबत आहे. पण त्या अगोदर त्यांचे पहिले लग्न झाले होते. मिथुनच्या पहिल्या पत्नीचे नाव हेलेना ल्युक. हेलेना एक अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर होती. ७० च्या दशकातील हेलेना फॅशन जगतातील एक प्रसिद्ध डिझायनर होती. त्यानंतर तिने १९८० मधे ‘जुदाई’ मधे काम केले. काही चित्रपटात तीने सहकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ती ‘साथ साथ’ आणि ‘एक नया रिश्ता’ या चित्रपटात काम करताना दिसली. परंतु हेलेना जास्त काळ बॉलिवूडमधे टिकू शकली नाही. आणि नंतर गायब झाली.

चित्रपटात येण्याअगोदर हेलेना एका मोठया धक्क्यातून सावरली होती. हेलेनाच्या अगोदर मिथुनचे अफेयर सारिका सोबत होते. पण ब्रेकअप नंतर मिथुनला नवीन सोबतीची गरज होती. तेव्हा मिथुनची नजर हेलेना वर पडली, तिचासुद्धा तेव्हा जावेद खान सोबत ब्रेकअप झाले होते. दोघे एकत्र वेळ घालवू लागले. मिथुन जितका हेलेनाच्या प्रेमात वेडा होता, तितकी हेलना नव्हती. स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, मिथुन सकाळी ६ वाजल्या पासून रात्री झोपेपर्यंत लग्नासाठी विचारत असे. तो रोज भेटत असे, शेवटी मला त्याचे प्रेम स्वीकारायला भाग पाडले. नंतर कोणालाही न सांगता १९७९ मधे आम्ही विवाह बंधनात अडकलो. त्यावेळी हेलेनाचे वय २१ वर्ष होते आणि मिथुन चित्रपट सृष्टीत संघर्ष करीत होते, पण दोघांचा संसार फक्त ४ महिनेच चालला. लग्ना नंतर मिथुन योगिता बालीवर प्रेम करायला लागले होते. या कारणास्तव दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ लागला. त्याच बरोबर मिथुन तिचा जुना मित्र जावेद बद्दल खूप वाईट बोलायचा. हि गोष्ट स्वतः हेलेनाने सांगितली, ‘मिथुन आपल्या घरात दोन चुलत भाऊ आणि दोन कुत्र्यांसोबत रहात होता. लग्ना नंतर मी सुद्धा त्यांच्या सोबतच रहात होते. लग्ना नंतर मिथुनचे दोन्ही चुलत भाऊ त्याचेच पैसे खर्च करायचे. हे तिला बिलकुल पसंत नव्हतं.

म्हणून तिने एके दिवशी मिथुनला सांगितले तू यांना जायला सांग, त्यावर मिथुन म्हणाला तुला जायचे असेल तर तू जा. ते इथून कुठेही जाणार नाहीत.’ हेलेना म्हणाली , ‘पुर्ण दिवसात मिथुन फक्त 4 तास घरात रहात असे. मी पुर्ण दिवस त्याची वाट पहात असायची. मीडियावर मिथुन आणि योगिता बालीची अफेयरची बातमी पाहून ती थक्क झाली.’ हेलेनाचे पुर्ण कुटुंबासोबत चांगले सबंध होते. तिच्या आई वडिलांनी तिला कशाची कमी भासू दिली नाही. लग्ना नंतर हेलेना खूप त्रासलेली दिसत होती. हेलेनासाठी हा विवाह म्हणजे एका वाईट स्वप्ना प्रमाणे होते.1980 मधे हेलेनाने मिथुन सोबतच्या लग्नाची बातमी मीडियाला दिली. त्यावर मिथुनने त्या बातमीला नकार दिला नाही. काहीच दिवसात दोघे वेगळे झाल्याची बातमी आली. हेलेनाचे म्हणणे होते की मिथुनने आज पर्यंत १० पैसेही दिले नव्हते. वेगळे झाल्यानंतर हेलेनाने पोटगी मागितली. संसार तुटल्यानंतर हेलेनाला दाखवून द्यायचे होते की, ती सुद्धा एक अभिनेत्री बनू शकते. त्यासाठी हेलेनाने चित्रपटात काम करणे सुरु केले पण जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. मीडिया वार्ताहरच्या माहीती प्रमाणे हेलेनाने आता न्यूयॉर्कला वास्तव्य केले आणि ती ‘डेल्टा एअरलाईन्स’मध्ये फ्लाईट अटेंडेंट म्हणून काम करते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *