Breaking News
Home / बॉलीवुड / मिशन मंगलच्या सेटसाठी इस्रोकडून परवानगी मिळाली नव्हती म्हणून फिल्मसिटी मध्येच रचला ८ कोटींचा सेट

मिशन मंगलच्या सेटसाठी इस्रोकडून परवानगी मिळाली नव्हती म्हणून फिल्मसिटी मध्येच रचला ८ कोटींचा सेट

‘मिशन मंगल’ चित्रपट तयार होण्याची कथा सुद्धा एखाद्या मिशन प्रमाणेच दिसून येते. याबद्दल नुकतीच एक बातमी हाती लागली आहे. जेव्हा इस्त्रोमध्ये चित्रपट शुट करण्याची परवानगी नाकारली गेली, तेव्हा इस्त्रो मधील इंटेरीअर, उपग्रह आणि रॉकेट सारख्या गोष्टींचा सेट मुंबईच्या फिल्मसिटी मधेच रचण्यात आला. या कामामध्ये जवळपास ८ करोड रुपये इतका खर्च आला. हा सेट तयार करणारे ‘संदीप शरद रवाडे’ यांनीच आम्हाला या सर्पूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
सेट डीजायनर ‘संदीप शरद रवाडे’ यांनी माहिती दिली- सुरक्षा कारणास्तव आम्हाला इस्त्रो च्या वास्तविक परिसरात शुटींग करण्याची परवागी मिळाली नाही. अश्या परिस्तिथीत आम्ही मुंबईच्या फिल्मसिटी मधील वेगवेगळ्या स्टुडिओ मधेच इस्त्रोची प्रतिकृती उभारली. तीन मोठ्या पुनर्निर्मित प्रक्रियांवर नजर टाकूया.

पहिली प्रक्रिया म्हणजे पिएसएलवी रॉकेट. हे उपग्रह अंतराळात पाठवतानाचे दृश्य दाखवले गेले आहे. वास्तविक रॉकेट प्रमाणेच या रॉकेटचेही टेल आणि नोज बनवण्यात आलेले आहे. तर चला बघूया, कसे बनले हि रॉकेट. १० फुट उंचीचा हा वरील भाग. नोज मधील कॅबीनची उंची तब्बल १७ फुट एवढी असून, त्यामध्ये पाच फुट उंचीचा उपग्रह ठेवण्यात आला आहे. रॉकेटच्या नोजची तब्बल उंची २७ फुट एवढी आहे. रॉकेटची एकूण उंची १४५ फुट एवढी आहे. रॉकेटची टेल तब्बल १८ फुट एवढ्या उंचीची आहे. दुसरी प्रक्रिया म्हणजे उपग्रह. हा उपग्रह टेलच्या बाहेरच आहे. याला सेट बनवणार्या टीमनेच बनवला असून याची उंची एका मोठ्या कार एवढी आहे. या मध्ये जिप्सम बोर्ड, वॉल्वोरिन क्लॉद, सोलर पॅनेल यांचाही वापर केला गेला, जे वास्तविक उपग्रहामध्ये वापरले जाणारे साहित्य आहे. सर्वात जास्त वेळ उपग्रहाचे भाग बनवण्यातच खर्च झाला. हे सर्व करण्यात तब्बल दोन ते अडीच महिने इतका कालावधी लागला.

वास्तविक रॉकेट एवढी मोठी प्रतिकृती उभारणे शक्य नसल्याने रॉकेट चा काही भाग हा व्हिडीओ मधेच वीएफएक्स तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आला. आणि हा वाढवलेला भाग सीजीआई च्या सहाय्याने नोज आणि टेल ला जोडला गेलेला दाखवण्यात आला. इस्त्रो वर्क स्टेशन, लोंज, लॉबी, कंट्रोल रूम, तसेच अभिनेत्यांच्या घरांपासून सर्व बनवण्यात तब्बल ८ कोटी एवढा खर्च आला. सेट डिजाइनर्सला इस्त्रो ची प्रतिकृती हि फिल्मसिटी मध्ये जशीच्या तशी सत्यात उतरवयाची होती. म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व गोष्टी रचल्या. तिसरी प्रक्रिया म्हणजे मुख्य वर्क स्टेशन. संपूर्ण परिसराचे थ्रीडी मोडेल बनवून तपासण्यात आले. त्यानंतर मुख्य वर्क स्टेशनच्या प्रमाणाच्या हिशोबाने तुलनात्मक कमी जागेत त्याला तयार करण्यात आले. याची प्रतिकृती हि वास्तविक साहित्य आणि कॉम्पुटर तंत्रज्ञान यांचा वापर करूनच बनवण्यात आली. ह्यात मिनिएचर मॉडल्स, पोलर सैटेलाइट, लॉन्च व्हीकल, पेलोड, मेन वर्क स्टेशन, कंट्रोल रूम ह्या गोष्टींची पुनर्निर्मिती करण्यात आली.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *