Breaking News
Home / बॉलीवुड / मीडियाच्या ह्या गोष्टीमुळे बाहेर पडायला नकार देते अक्षयची ६ वर्षाची मुलगी

मीडियाच्या ह्या गोष्टीमुळे बाहेर पडायला नकार देते अक्षयची ६ वर्षाची मुलगी

आपण अनेकवेळा अक्षयला मीडियासमोर पाहिले असेल, तेव्हा एक गोष्ट जरूर नोटीस केली असणार कि अक्षय जेव्हाकेव्हा मीडियासमोर आला आहे तेव्हा त्याची मुलं त्याच्यासोबत केव्हाच आली नव्हती. कारणही तसेच आहे. का बरं अक्षय आपल्या मुलांना मीडियापासून लांब ठेवतो. पाहूया अक्षय काय म्हणाला ह्यावर. ‘मिशन मंगल’ मधील प्रसिध्द अभिनेता एका गोष्टीमुळे खूपच चिंतेत आहे. अक्षय म्हणतो ” तेव्हा जीव तुटतो, जेव्हा माझी 6 वर्षाची मुलगी म्हणते कि, ती आमच्या सोबत रात्रीचे जेवण करायला बाहेर येणार नाही. कारण तिथे वार्ताहर असतात आणि तिला फ्लॅशलाईट अजिबात आवडत नाही. अक्षय कुमारचे म्हणणे आहे की, त्याची 6 वर्षाची मुलगी नितारा फोटोग्राफर्समुळे घराच्या बाहेर पडायला नकार देते. तसेच त्यांचा मुलगाही सिनेमा बघायला जात नाही. कारण त्याला ही गोष्ट पटत नाही की, लोक त्याला थकलेला म्हणतील, किंवा त्याचे इंस्टाग्रामवर घामाघूम अवस्थेतील फोटो टाकतील”.

अक्षय पुढे म्हणतो , “खरं सांगू तर यासाठी मी त्यांना दोष देत नाही. अभिनेता असल्यामुळे आम्ही यासाठी तयार असतो. परंतु जोपर्यंत आमची मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एखाद्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवत नाही. तो पर्यंत मला नाही वाटत कि, त्यांचा सार्वजनिक ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे, असे मला वाटते. मी माझ्या मुलांना सांगतो की, “दुसऱ्यांच्या बोलण्यावर नाराज व्हायचं की नाही, ते तुम्ही ठरवायचे.” जेव्हा अक्षयला विचारले गेले की, त्यांचा मुलगा आरव याला नेहमी टार्गेट केले जाते. त्याच्यावर नको त्या गोष्टी बोलल्या जातात. त्यावेळी तो या गोष्टीला कसा सामोरा जातो? त्यावर अक्षयने उत्तर दिले, “असे लोक जे मुलांना नको ते बोलतात, त्यांनी स्वतःला आरशात पहायची आणि हे विचारण्याची गरज आहे, की आपल्या मुलांच्या बाबतीत असे घडले तर त्यांना कसे वाटेल!”

अक्षय पुढे म्हणतो की, “मुले आणि युवापिढीला टार्गेट बनवणार्यांसाठी त्याच्याकडे शब्द नाहीत.” शिवाय अक्षय म्हणतो कि, 21 वर्षा खालील मुल/मुलींच्या बद्दल सार्वजनिक रुपात घाणेरडे बोलणे, हे गुन्ह्यास पात्र आहे. खरंतर याचेच सर्वात जास्त दुःख होते की, सोशल मिडीया सारख्या प्रशस्त व बलाढ्य माध्यमाचा वापर लोक दुसऱ्याला दुःखी करण्यासाठी, कमी लेखण्यासाठी तसेच अपमानित करण्यासाठी करतात. मागील सिनेमा ‘मिशन मंगल ‘मध्ये दिसलेल्या अक्षय कुमारचा पुढील सिनेमा ‘हाऊसफुल 4’ 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याचे ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब ‘ आणि ‘सूर्यवंशी ‘ हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. अक्षय यशराज सिनेमा सोबत ‘पृथ्वीराज ‘ चित्रपट सुद्धा करतोय, जी पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होईल.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.