Breaking News
Home / मनोरंजन / ‘मी तुमच्या पाया पडतो, इंजेक्शन नको ना मला’ ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

‘मी तुमच्या पाया पडतो, इंजेक्शन नको ना मला’ ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

माणसं आयुष्यात कितीही निर्भीड असोत, तरी काही गोष्टींना घाबरतातच. अहं, अंधाराची भीती वगैरे सगळ्यांना वाटत असली तरी त्यावर विजय मिळवता येतो. पण इंजेक्शनची भीती मात्र त्यापलीकडे असते. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांना याची भीती वाटते. आम्हीही यास अपवाद नाही. बरं, त्या इंजेक्शनला व्यवस्थित हाताळलं, तर काही होत नाही हे आपल्याला माहिती असतं. निदान मोठ्या माणसांना तरी माहिती असतंच. पण तरी ती धारदार सुई जवळ आणली जातेय ही भावनाच विचित्र असते.

अगदी भलेभले या छोट्याश्या गोष्टीला लांब ठेऊ बघतात. सोशल मीडियावर तर याचे असंख्य दाखले बघायला मिळतात. अनेकवेळा तर गोळ्या, तोफगोळे यांना ही भीक न घालणारे जवान, या सुईविषयी नफरत, मनात ठेवून असतात. अर्थात त्यांचं मन हे तगड असल्याने, ते या भीतीवर ताबा मिळवतात. तसेच अनेकवेळा जखमी जवानांवर प्रथमोपचार करताना यापेक्षा ही कठोर गोष्टी कराव्या लागू शकतात. त्यामुळे त्या सुईचा धसका घेतला असला तरी वेळ मारून नेली जाते. पण ही झाली जवानांची बाब.

आपण तर साधी सामान्य माणसं. आपली पाचावर धारण बसणं हे अगदीच अपेक्षित असतं. त्यातही लहान मुलं म्हणजे आपल्याही वरचढ ! पण एक फरक असतो. आपल्या मनातील भावना समोरच्यांना कळू न देण्याएवढा अभिनय आपल्या मोठ्या माणसांना जमत असतो. त्यामुळे आतून कितीही भीती वाटत असली तरी तोंडावर शूरपणाचा आव आपण आणत असतो. सुई टोचेपर्यंत. एकदा का ती आत गेली, की सगळ्यांचे खरे रंग कळतात. पण लहान मुलांचं अस नसत. जे मनात ते ओठावर असतं या लहान मुलांच्या ! त्यातूनच मग गंमती जंमती होतात. याचे असंख्य व्हिडियोज आपण आणि आम्ही बघितले असतील. पण तरीही प्रत्येक नवीन व्हिडियो, नवीन काही तरी गंमत आणत असतो. आज आमच्या टीमने असाच एक गंमतीशीर व्हिडियो बघितला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक क्लिनिक दिसू लागतं. त्यात पेशंटसाठी बसायला जागा असते. बहुधा ते लहान मुलांसाठीचं क्लिनिक असावं. त्या बसायचा जागेवर एक मुलगा शाळेच्या गणवेशात, पायाची घडी घालून बसलेला असतो. तर समोर डॉक्टर ताई उभ्या असतात. व्हिडियो सुरू झाल्यापासून तो डॉक्टर ताईंना गयावया करत असतो.

इंजेक्शन देऊ नये म्हणून हे गयावया करणं सुरु असतं हे काही वेगळं सांगायला नको. पण त्या पोराचं ते गयावया करणं इतकं विनोदी असतं की काही विचारु नका. तो डॉक्टर ताईंच्या थेट पायाच पडायला तयार असतो. त्यात डॉक्टर ताई पण गंमत करणाऱ्या असतात. त्याला थोडंस इंजेक्शन देऊ का म्हणून हाताने विनवत असतात. त्यामुळे गंमतीशीर असा प्रसंग घडत असतो. इतकंच नाही, तर त्याच्या विनंतीला ऐकून त्याला पायाही पडायला देतात. पण नंतर आशीर्वादासाठी जवळ घायला बघतात तर कसलं काय. तो पळून आईच्या पदराआड लपायला बघत असतो. एवढा वेळ हसू येणारी आई सुद्धा त्याला मायेने जवळ घेते. शेवटी आईच्या छत्रछायेपेक्षा सगळ्यांत जास्त सुरक्षित ते काय असतं. बहुधा काहीच नाही. असो. मंडळी, हा व्हिडियो आपण जरूर बघा. त्या लहान मुलाची भीती आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे निर्माण होणारा विनोद ही अव्हेरता येत नाही. म्हणूनच हा लेख लिहिला. त्यातील गंमतीदार प्रसंग आवडून गेला. तसेच आम्हाला झालेला आनंद, आपल्याला ही व्हावा, म्हणून सदर व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर करतो आहोत. त्याचा जरूर आनंद घ्या.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *