आपल्या प्रत्येकामध्ये निदान एकतरी कला असतेच असते. अगदी बाकी कोणतीही कला नसली तरी अभिनय ही कला असतेच असते. बरं आपण या कलेचा वापर व्यावसायिकरित्या करतोच अस नाही. पण तिचा उपयोग आपण लहानपणापासून करत असतो हे मात्र नक्की आहे. कधी शाळेतुन सुट्टी मिळवण्यासाठी, मोठं झाल्यावर ऑफिसमधून सुट्टी मिळण्यासाठी आणि अगदी भांडणात तर आपण अभिनयाचा वापर करत असतो. इतरही अनेक प्रसंग असतात जेव्हा आपल्यातील या कलेचा आपण वापर करत असतो. अर्थात हे जरी गंमतीने घेतलं तरी खरं आहे. या इतर प्रसंगांमध्ये सगळ्यांत जास्त अभिनय कुठे दिसत असेल तर तो लग्नाच्या वेळी !
काय एकेकाचा अभिनय पहावा. त्यात मानपान करवून घेणारे तर जबरदस्त अभिनेते असतात. आम्हीच काय ते राजे या थाटात त्यांचा वावर असतो. त्यांचा पोकळ थाट बघून मजा वाटते. इतरही काही मंडळी असतात ज्यांचा अभिनय बघून हसू येतं. पण हीच गोष्ट एखाद्या वधूने केली तर ? ऐकायला थोडं कठीण वाटेल आणि पचायला जड जाईल. पण अस होऊ शकतं.
आता आपल्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचा आधार घेऊ. हा व्हिडियो कुठचा वगैरे माहिती नाही. पण यात जी काही घटना घडते त्यामुळे जबरदस्त हसायला येतं हे मात्र नक्की ! होतं काय तर एके ठिकाणी लग्न संपन्न झालेलं असतं. बहुधा बाकीचे सगळे कार्यक्रम ही झालेले असतात. त्यामुळे आता पाठवणीची वेळ झालेली असते. आता पाठवणी म्हणजे अतिशय नाजूक प्रसंग, अतिशय हळुवार प्रसंग होय. अशावेळी भल्या भल्या माणसांना हुंदके आवरत नाहीत. बरं हा काही अभिनय नसतो. खरंच हा अतीशय भावनाशील करणारा असा प्रसंग असतो. त्यामुळे इथेही तेच होतंय अस आपल्याला दिसतं. नवरी ताई रडत असते. तिला तिची माहेरची जागा सोडून जायची इच्छा नसते. निदान सुरुवातीला तिच्या वर्तनातून असं दिसतं. तिचा, ‘मैं नहीं जाऊंगी’ हा धोशा चालु असतो. नवरदेवाला आणि बाकीच्यांना ही हसू आवरत नसत. तर काही जण मात्र गंभीरतेने ही गोष्ट घेत असतात. पण नवरदेवाला हसायला यायला नको असं वाटत असतं. पण तो का हसत असतो ते लवकरच कळतं. कारण तिचं हे रडणं बघून एक ताई पाठून येतात आणि तिला घेऊन जाऊ लागतात. चल घरी अस सांगायला लागतात. तर पठ्ठीला ते पण नको असतं. तोपर्यंत ती नवरदेवाचा हात सोडून उभी असते. पण जशी ही दुसरी ताई तिला पाठी घेऊन जाऊ लागते तेव्हा ही पुन्हा नवरदेवाचा हात पकडते.
आता तिचं बोलणं बदललेलं असतं. नवऱ्याचं घर हेच माझं घर अस तिचं म्हणणं असतं. आता काय बोलणार. बरं हे इथेच संपत नाही. हे सगळं पुढे ही चालू राहतं. शेवटी शेवटी तर या नवऱ्या मुलीच्या ओळखीचे एक गृहस्थच तिला दटावत काहीतरी सांगतात आणि हा व्हिडियो संपतो. म्हणायला गेला तर हा सगळा हास्यास्पद थरार काही वेळ चालतो आणि मग बंद होतो. पण या काही वेळात आपलं बरचसं मनोरंजन करून जातो. अर्थात या लेखाच्या द्वारे या घटनेतील जो हास्यास्पद भाग आहे त्यावर केवळ नर्मविनोदी टिपणी करावी वाटली म्हणून हा लेख लिहिला गेला. या लेखाचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही हे कृपया लक्षात घ्या. तसेच आपणही केवळ या व्हिडियोकडे काही क्षण मनोरंजन म्हणूनच बघा ही विनंती. बाकी आपण सुज्ञ आहातच. असो.
बरं तर मंडळी हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! हा लेख आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. तसेच या लेखाप्रमाणे आमच्या टीमचे अन्य लेखही जरूर वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :