रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवर गाणे तयार करून महानगरपालिकेला ट्रॉल करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा नवीन गाणं घेऊन आली आहे. ह्या गाण्याचा व्हिडीओ तिने शेअर सुद्धा केला आहे. ह्या व्हिडीओत ती लाल साडी मध्ये एखाद्या नवविवाहित नवरी सारखी सजलेली दिसत आहे. आणि रस्त्यावरील खड्डयांना आपला चंद्र म्हणवून घेत त्याची पूजा करताना दिसत आहे. मलिष्काने मुंबईच्या वरील खड्ड्यांना चंद्र संबोधून चंद्रसंबंधित सर्व गाणे ह्या व्हिडीओ मध्ये टाकले आहेत. शेअर केलेल्या ह्या व्हिडीओ मध्ये ती लाल रंगाच्या साडीत मुंबईतील खड्डे असलेल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर दिसून येत आहे. मलिष्का ह्याअगोदर सुद्धा मुंबईच्या रस्त्यांचा मुद्दा घेऊन गाणे घेऊन आली आहे. तिचे ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ आणि ‘गेलं मुंबई खड्ड्यात’ हि गाणी अगोदरच व्हायरल झालेली आहेत. ह्या गाण्यांमार्फत तिने बीएमसीला ट्रॉल केले होते. आणि ती गाणीही भलतीच लोकप्रिय झाली होती.
काय आहे ह्या व्हिडीओ मध्ये :
मागच्या वेळी ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ व्हिडीओ मध्ये मलिष्काने ‘गोल गोल’ गाण्याला नव्या लुकचा टच देऊन बीएमसीच्या खड्ड्यांना घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. ह्या गाण्यामुळे बीएमसीसोबत वाद सुद्धा झाले होते. व्हिडीओ वायरल झाल्यानंतर बीएमसीने मलिष्काच्या घरी डेंगू चे मच्छर सापडल्याची नोटीस पाठवली होती. ह्या वेळी मलिष्काने जो व्हिडीओ बनवला आहे त्याची सुरुवातच अंतराळातून होते. व्हिडीओच्या सुरुवातीला अंतराळातून एक आवाज येतो, ‘चंद्रयानाच्या मदतीने भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि चंद्र सुद्धा आपल्या जवळ आला आहे.’ ह्यानंतर मलिष्का दिसून येत आहे. ती मुंबईच्या अनेक गल्ल्या फिरून रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यांच्या आसपास नाचताना दिसून येत आहे.
तुम्ही सुद्धा बघा व्हिडीओ :
ह्या व्हिडीओला मलिष्काने आपल्या फेसबुक पेज वर शेअर केले आणि बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. काही तासातच ह्या व्हिडिओला लाखों लाईक्स मिळाले आणि कमेंट्सचा पूर आला. आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो बीएमसी प्रत्येक वर्षी रस्त्यांवर लाखों रुपये खर्च करते तरीसुद्दा रस्त्यांवर खड्डे बनतात हा मुद्दा शोधून मलिष्काने हे गाणं तयार केले आहे. मलिष्काचा हा अंदाज सोशिअल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेक यूजर्सनी व्हिडीओला अप्रतिम म्हणत लिहिले कि ती प्रत्येकवेळी काहीतरी नवीन घेऊन येते. आम्ही खाली मलिष्काने शेअर केलेला हा व्हिडीओ देत आहोत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हांला मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल काय वाटते, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.