सध्या महाराष्ट्रासह देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाळ्यात लोक आपापल्या पध्दतीने आनंद घेत असतात. मागच्या वर्षी भर कोरोनात लोकांनी डीजे लावून पावसाचा आनंद घेतला होता. तो कोल्हापूरच्या अतरंगी लोकांचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपासून हायवेला ट्रकसमोर नाचून पावसाळ्यात फिरायला निघालेल्या पोरांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर काही लोकांनी टीका केली तर काहींनी त्या मजा घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचे कौतुक केले. बेसिकली पावसाळा हा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. अगदी एखाद्या कवीपासून तर एखाद्या तळीराम व्यक्तीपर्यंत… शाळेला सुट्टी पाहिजे असलेल्या लहान मुलापासून तर पिकाचे भरघोस उत्पादन घेण्याची इच्छा असणाऱ्या शेतकरी राजापर्यंत… गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचे स्वप्न बघणाऱ्या आणि मित्रांसोबत बाईकवर लांब फिरायला जाऊन मनसोक्तपणे आयुष्य एन्जॉय करणाऱ्यांना… अगदी सगळ्या सगळ्यांना पाऊस हवा असतो.
खरं पाहिलं तर आईस्क्रीम किंवा कोणताही कूलर जेवढा आपल्याला कडक उन्हापासून दिलासा देत नाही तेवढा पाऊस देतो. काही भागात लोक अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजून काही ठिकाणी पावसाचे आगमन होण्यास काही दिवस लागतील, पण तोपर्यंत हा व्हिडीओ नक्कीच मन:शांती देऊ शकेल. हा आनंद एका मोठ्या माणसाचा आहे, जो या मदमस्त पावसाचा मनसोक्त आनंद लुटत आहे.
कुठलाही सर्वसामान्य माणूस जो पावसाचा आनंद लुटत असतो तो फार फार तर पावसात बिनछत्रीचा निघेल. मात्र आज आमच्याकडे असा व्हिडीओ आहे, ज्या पद्धतीने हा माणूस पावसाचा आनंद लुटतोय, ते पाहून तुम्ही हसून हसून हैराण व्हाल. आपल्याला व्हिडीओत दिसून येईल की, हा व्यक्ती अगदी शर्ट – पॅन्ट घालून पावसात भर रस्त्यावर झोपला आहे, जो रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला आहे, जिथून वाहने, लोक जात आहेत, अशा रस्त्यावर हा माणूस एखाद्या दारुड्याप्रमाणे रस्त्यावर झोपून पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी तो रेनकोट घालून रस्त्यावर मस्त झोपला आहे.
हा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईमध्ये शूट करण्यात आला होता. हे पाहून कोणाचेही मन खूश होईल, कारण हे पाहायला खूपच भारी दिसत आहे आणि हे पाहून आपल्याला हसूही येत आहे. पावसाचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेणारे खूप लोक पाहिले पण अशा पध्दतीने भर रस्त्यात रस्त्यावरचे पाणी अंगावर घेऊन झोपणारा महाभाग एखादाच… एखाद्याला हौस असते, एखाद्याला कंड असतो पण ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार न करता आनंद घेत असतात. आपल्या मनासारखं जगण्याचे किडे असे अंगात असायला लागतात.
हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :