सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खुप जोराने वायरल होत आहे. नो पार्किंग झोन मध्ये पार्किंग करून पोलिसांशीच हुज्जत घालून धमकी देणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे. हि घटना मीरा – भायंदर रोड वर घडली असून तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणाचा पोलीस लॉकअप मधील व्हिडीओ सुद्धा जेव्हा बाहेर आला तेव्हा तो तरुण ढसाढसा रडताना दिसत आहे. म्हणतात ना वाघाची शेळी होते, त्यातलाच हा प्रकार. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं ते.
मिळालेल्या माहितीनुसार एका जोडप्याने मीरा भायंदर रोड वर एका नो पार्किंग परिसरात आपले चारचाकी वाहन पार्क करून गेले होते. नो पार्किंग एरियात गाडी पार्क केल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलीस शिपाई दबडे गाडीजवळ गेले. परंतु गाडीचा मालक न दिसल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात विचारपूस केली. परंतु कोणीच दिसेना तेव्हा मग पोलिसांनी गाडीला जॅमर लावला.
परंतु काही वेळाने तेथे गाडीचे मालक असलेले दाम्पत्य आले. आपल्या गाडीला जॅमर लावल्यामुळे तरुण भलताच भडकला. आपली चूक आहे हे मान्य करण्या ऐवजी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशीच अरेरावी करू लागला. भर गर्दीत पोलिसांना धमकी देऊ लागला. ‘तुमच्या बापाचा पैसा आहे का इथे? वर्दी काढ, आता दाखवतो’ अशाप्रकारच्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारण्याची आणि चिरण्याची तरुणाने धमकी दिली. आरोपीच्या पत्नीनेही पोलिसांशी गैरवर्तन केले. भर रस्त्यात ह्या दाम्पत्याने पोलिसांना शिवीगाळ केली. तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याचे कपडे फाडून उभे चिरण्याचीसुद्धा धमकी दिली. सोबत कोणत्या पोलीस ठाण्यात येऊ ते सांग, असेही म्हटले. हे सर्व घडत असताना वाहतूक पोलीस शिपाई दबडे ह्यांनी संयम ठेवला. त्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा शिवीगाळ केली नाही. ह्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. रस्त्यावर चालू असलेला हा प्रकार पाहून एक पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी तेथील गर्दी कमी करण्यास सांगितले. पोलीस कर्मचारी आल्यावर सुद्धा दाम्पत्याचा मुजोरपणा मात्र काही केल्या कमी होत नव्हता.
शिवाय तरुणाने सुद्धा मास्क घातला नव्हता. मुजोर दाम्पत्याच्या ह्या संतापजनक कृत्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल आणि मास्क न लावल्यामुळे को’रोनाचे नियम मोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्यानंतर तरुणाचा पोलीस लॉकअपमधला दुसरा व्हिडीओ बाहेर आला. ह्या व्हिडीओ मध्ये तरुण खाली मान घालून जमिनीवर बसून ढसाढसा रडताना दिसत आहे. सुरुवातीला कोणत्या पोलीस ठाण्यात येऊ, असे मुजोरीने म्हणणाऱ्या ह्या तरुणाला पोलिस ठाण्यात गेल्यावर मात्र रडू कोसळले. खाकी दणका बसताच तरुणाची अक्कल चांगलीच ठिकाण्यावर आली. ह्या दोन्ही घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. हा घडलेला सर्व प्रकार म्हणजे वाघाची शेळी होणे होय. स्वतः नियम मोडून नंतर वाहतूक पोलीस कर्मचार्यावरच अरेरावी करून धमकी देणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली. तरुणाला स्वतःची चूक कळून वेळीच शहाणपण सुचलं असतं, तर त्याच्यावर अशी वेळ आली नसती.
बघा व्हिडीओ :