आताच्या काळात प्रत्येक तरुणाला वाटतं कि सैनिकात जाऊन देशाची रक्षा करावी. तसं पाहायला गेलं तर सैनिकात जाणाऱ्या प्रत्येक जवानाच्या जीवनाचे अनेक पैलू असतात. सैनिकामध्ये भरती असलेल्या जवानांना पावलोपावली संकटांचा सामना करावा लागतो. कधी केव्हा काय होईल, ह्याबद्दल सांगणं खूपच कठीण आहे. जेव्हा कोणी जवान आपल्या देशासाठी शहीद होतो तेव्हा संपूर्ण देशाची मान त्या जवानाच्या सन्मानासाठी गर्वाने उंच होते, परंतु ज्या घरचा मुलगा शहिद झाला आहे, त्यांच्या घरातील व्यक्तींसाठी हि खूप दुःखद वेळ असते. मुलाच्या जाण्याचे दुःख आई वडिलांशिवाय जास्त कोणी समजू शकत नाही. त्यातसुद्धा आईचं म्हणाल, तर ती खूप खचून जाते. परंतु आज आम्ही तुम्हांला एका अश्या आईबद्दल सांगणार आहोत, जिने आपला मुलगा गमावल्यानंतर स्वतःला खचून दिले नाही. उलट असं काही काम करत आहे कि, त्या कामाचा नेहमी डोळ्यासमोर आदर्श राहील.
गाजियाबादमधील इंदिरापुरम येथे राहणाऱ्या शहीद स्क्वॉड्रन लीडर शिशिर तिवारी ह्यांच्या आई सविता तिवारी ह्यांनी आपल्या मुलाला वीरगती प्राप्त झाल्यानंतर बेसहारा मुलांना स्वतःची मुलं समजून त्यांना सुशिक्षित करण्याचा विडा उचलला आहे. जसं कि आपल्या सर्वांना माहितीच आहे कि, कोणत्याही विकसित समाजाची कल्पना शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही. समाज आणि देशाचा विकास शिक्षणानेच होऊ शकतो. परंतु सरकार वेळोवेळी वेगवेगळे प्रयत्न करूनही बहुतेक गरीब मुलं अशी आहेत, जे शिक्षणापासून वंचित राहून जातात. समाजातील अश्याच काही मुलांना सुशिक्षित करण्याची जबाबदारी काही लोकांनी स्वतःहून घेतली आहे. ह्या जबाबदार व्यक्तींपैकी एक सविता तिवारी ह्या सुद्धा आहेत. आपला मुलगा शहीद झाल्यानंतर सविता तिवारी ह्यांनी गरीब आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना सुशिक्षित करण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरुवात केली आहे. सविता तिवारी ह्यांचे असं म्हणणं आहे कि, “माझ्या मुलाला गमावल्यानंतर त्याच्या आठवणीत मी हे काम सुरु केले, कारण गरीब मुलं शिक्षण घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील.” तसं तर त्या सहारा नसलेल्या मुलांसाठी खूप काळापासून कार्य करत आहेत. परंतु मुलाच्या जाण्यानंतर त्यांनी ह्या कामासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे.
सविता तिवारी ह्या आठवड्यातून ५ दिवस ४ ते ५ तास आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या जवळपास ४०० मुलांना मोफत शिक्षण देतात. सविता तिवारींचे म्हणणं आहे कि, त्यांना आपल्या मुलगा शहिद झाल्यानंतर स्वतःला खचून जाऊ द्यायचं नव्हतं. त्यांचा मुलगा नेहमीच देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्यासाठी आई सविता ह्यांनी सुद्धा स्वतःला समाजकार्यात झोकून द्यायचं ठरवलं. त्यांनी सांगितले कि, आपल्या आजूबाजूला जेव्हा कोणी मुलगा पोट भरण्यासाठी कचरा टिपण्याचे काम करायचा, तेव्हा ते पाहून डोळ्यांतून पाणी यायचे. त्याच वेळी त्यांनी मनात पक्कं केलं कि, अश्या गरीब मुलांना शिकवून त्यांना पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध करून देतील. सविता तिवारी ह्यांनी आपले पती शरद तिवारी ह्यांच्यासोबत मिळून १५ ऑगस्ट २०१८ रोजी ‘शहीद स्क्वॉड्रन लीडर शिशिर तिवारी चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरु केली होती. ह्या ट्रस्टच्या माध्यमातून दोन्ही दाम्पत्य गरीब मुलांना शिकवण्यासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा करतात. सविता ह्यांनी जेव्हा हि ट्रस्ट उघडली होती, तेव्हा केवळ १० मुलंच यायचे, परंतु आता २ वर्षानंतर जवळपास ४०० मुलं शिकण्यास येतात.
ह्या चांगल्या कामात त्यांच्या जवळची माणसं मदत करतात, परंतु तरीसुद्धा अनेकदा आर्थिक साहाय्य मिळत नाही. तरीसुद्धा सविता ह्या मुलांची संपूर्ण व्यवस्था करतात. त्या म्हणतात कि, “माझं एकच स्वप्न आहे कि ह्या मुलांनी शिक्षण घेऊन पोलीस ऑफिसर, आर्मी ऑफिसर, वकील, डॉक्टर बनावे. हीच माझ्या मुलासाठी खरी श्रद्धांजली असेल.” ६ ऑक्टोबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर शिशिर तिवारी शहीद झाले होते. त्या अपघातात ७ जवान शहिद झाले होते आणि इतर २ जण नि’धन पावले होते. त्यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांचे आई सविता तिवारी आणि वडील वायू सेनेतील ग्रुप कॅप्टनच्या पदावरील निवृत्त अधिकारी शरद तिवारी ह्यांनी स्वतः ला सांभाळलं होतं.