पहिली बेटी धनाची पेटी असं आपल्याकडे नेहमी म्हंटलं जातं. अर्थात तिच्या रूपाने आपल्या घरी लक्ष्मी आली असं आपण मानतो. मग या लक्ष्मीचं स्वागतही तसंच राजेशाही व्हायला पाहिजे की नको. अर्थातच हो. आमच्या टीमच्या हाती असा एक वायरल व्हिडियो लागला ज्यात एका चिमुकलीचं स्वागत अगदी राजेशाही थाटामाटात करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वीही आमच्या टीमने अशाच एका व्हिडियो वर लेख लिहिला होता. त्यामुळे असाच अजून एक उत्तम व्हिडियो समोर आल्याने आमच्या टीमने त्यावर आज नवीन लेख लिहिणं पसंत केलं आहे. हा व्हिडीओ सुरू होतो तेव्हा या चिमुकल्या मुलीला अगदी आनंदी आणि प्रसन्न वातावरणात घरी आणलं जातं. तिच्या रूपाने लक्ष्मी घरात आली असं मानुन तिचं स्वागत केलेलं दिसून येतं. अनेक रितीरिवाज पाळलेले दिसून येतात.
अगदी तिच्या पावलांनी कलश पाडला जातो. तसेच तिची पहिली पावलं घरात उमटावित यासाठी ही व्यवस्था केलेली असते. त्यातही त्या लहानगीला व्यवस्थित सांभाळलं जातं याच विशेष कौतुक वाटतं. आपल्या समाजात काही समाजकं’टक मुलींना अतिशय वा’ईट पद्धतीने वागवत असतात. पण कित्येक ठिकाणी मुलींना अतिशय प्रेमाने आणि मानाने वागवलं जातं आणि हा व्हिडीओ हे याचं अगदी प्रातिनिधिक उदाहरण आहे. या व्हिडियो विषयी अजून जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला असता सदर व्हिडियो हा श्री. संदेश तळकोकुळवार यांच्या घरातील असल्याचं कळलं. संदेश हे शासकीय सेवेत कार्यरत असून मूळचे नांदेड येथील असल्याचं कळतं. संदेश यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं आणि मग त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव अधिरा आणि हा व्हिडीओ तिच्या गृहप्रवेशाचे वेळी घेतलेला दिसून येतो.
अधिरा विषयी संदेश आणि त्यांच्या कुटुंबियांचे असलेले प्रेम त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स वरूनही दिसून येते. त्यामुळे अधिराच्या जन्माने त्यांना किती आनंद झाला आणि तो त्यांनी वेळोवेळी कसा साजरा केला हे पाहता येतं. आपल्या लेकीविषयी असलेलं प्रेम अगदी आत्मीयतेने आणि कलात्मकतेने मांडणाऱ्या संदेश आणि त्यांच्या कुटुंबियांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच अधिरा हिला तिच्या आयुष्यासाठी खूप खूप आशिर्वाद !
वाचकहो !आपल्याला हा लेख आवडला असेल, तेव्हा सोशल मीडियावरती शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेले दुसरे लेखही वाचायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे कळवत रहा. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :