Breaking News
Home / मराठी तडका / मुलगी झाली हो मालिकेतील आर्या खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा आर्याचे खरं आयुष्य

मुलगी झाली हो मालिकेतील आर्या खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा आर्याचे खरं आयुष्य

मराठी गप्पाच्या नियमिय वाचकांनी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला असेलंच. मराठी चॅनेल्सच्या टी. आर.पी. च्या शर्यतीत एका आठवड्यात कोणकोणत्या वाहिन्या आणि मालिका आघाडीवर आहेत हे या लेखात दिलं होतं. हा लेख १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधी साठी होता. यात स्टार प्रवाह ही वाहिनी सगळ्यात पूढे असल्याचं चित्र होतं. तसेच सर्वात जास्त पाहिलेल्या मालिका विभागातही स्टार प्रवाह वरील मालिकांचा दबदबा असल्याचं दिसून आलं होतं. या आठवड्यातही हेच चित्र कायम आहे. तरीही बदलत्या अनुक्रमाने मालिकांमध्ये असलेली चुरस ही खासकरून दिसून येते आहे. १४ ते २० नोव्हेंबर या काळात तिसऱ्या क्रमांकावर असणारी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आता, २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान दुसऱ्या क्रमांकावर आल्याचं चित्र होतं. नव्याने दाखल झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. वेगळं कथानक, नवीन आणि जुन्या कलाकारांचा उत्तम मेळ असलेला संच, यांमुळे मालिकेतील येणाऱ्या भागांविषयी प्रेक्षकांमध्ये सदैव उत्सुकता असते.

या मालिकेतील चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा मराठी गप्पाने घेतलेला आहे. आज आपण या मालिकेतील अजून एका अभिनेत्रीच्या अभिनय प्रवासाचा आढावा घेऊ. या अभिनेत्रीने मालिकेत आर्या ही व्यक्तिरेखा साकारली असून, तिचं खऱ्या आयुष्यातील नाव श्वेता अंबिकर असे आहे. श्वेता ही मुळची पुणेकर. सध्याचे अनेक आघाडीचे कलाकार हे ललित कलाकेंद्र या संस्थेतून अभिनयाचे धडे गिरवून पुढे आलेले आहेत. मराठी गप्पावरील अनेक लेखांत अभिनेते आणि अभिनेत्रींवरील लेख वाचताना आपल्याला हे जाणवलं असेलंच. श्वेता ही सुद्धा ललित कलाकेंद्र येथे शिकली. तिथे तिने स्वतःतील अभिनेत्रीला घडवलं. तसेच माणूस म्हणूनही ती घडली. हा प्रवास सोप्पा नसला, तरीही आपण करतो ते उत्तमचं हा आत्मविश्वास तिच्यात असल्याने तिने येणाऱ्या आव्हानांवर मात केली. तिचा या काळातील एक घनिष्ठ मित्र म्हणजे अमेय गोरे. काही काळापूर्वी त्याने आपल्या या घनिष्ठ मैत्रिणीचं कौतुक करणारी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. त्यातून तिचा ललित कलाकेंद्र मधील अभिनय प्रवास डोकावतो.

तिने आत्मविश्वासाने एकांकिका आणि नाटकांमधून काम सुरू केलं. पुढे ती मालिकांमध्ये जास्त रमली. माझे मन तुझे झाले, पुढचं पाऊल, दुर्वा या तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने अभिनित केलेल्या मालिका. उत्तम कलाकारांना नेहमीच एका कामातून दुसरं काम मिळत जातंच. श्वेताच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. पुढे मालिकांतून अभिनय सूरु होताच. बाजी, स्वराज्य रक्षक संभाजी, तू माझा सांगाती या तिने अभिनित केलेल्या ऐतिहासिक कथानक असलेल्या मालिका. यांमधली तिची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील ‘राणू अक्का’ यांची छोट्या वयातली व्यक्तिरेखा गाजली. ही महत्त्वपूर्ण भूमिका श्वेताने अतिशय तन्मयतेने आणि जबाबदारीने साकारली. या ऐतिहासिक मालिकांसोबत तिने दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मलिकेतूनही अभिनय केलेला आहे. रेवा असं तिच्या या मालिकेतील व्यक्तिरेखेचं नाव. मालिकांमधून अगदी सहजतेने वावरणाऱ्या श्वेताने काही वर्षांपूर्वी एक लघुपट ही केला होता. ‘भेट’ असं या लघुपटाचे नाव. एक गृहिणी, जी मुंबईत नव्याने राहते आहे आणि तिला तिचा नवरा, मेट्रोचा प्रवास शिकवतो. या गोष्टीचा पुढे तिच्या आयुष्यात कसा सकारात्मक फायदा होतो हे या लघुपटातून दाखवलं होतं.

या लघुपटाला पुरस्कारही मिळाले होते. तसेच एका ऐतिहासिक घटनेवरील वेब सिरीज मध्येही तिने अभिनय केलेला आहे. ‘गोंद्या आला रे’ असं या वेब सिरीजचं नाव. रँड या जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याचा व ध करणाऱ्या चापेकर बंधू यांच्या आयुष्यावरील ही वेब सिरीज. या वेब सिरीज मध्ये श्वेताने यमुनाबाई चापेकर यांची व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या आजवरच्या प्रवासात मालिका, लघुपट, नाटक या सगळ्या माध्यमांतून तिने मुशाफिरी केली आहे. अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास तिला यानिमित्ताने लाभला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे तिच्यात अभिनेत्री म्हणून झालेली प्रगती, जी तिच्या विविध भूमिकांमधून झळकते. येत्या काळातही तिच्या पुढील प्रोजेक्ट्स मधून ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील हे निश्चित. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *