Breaking News
Home / जरा हटके / मुलगी झाल्यावर असं स्वागत तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिलं नसेल, बघा व्हिडीओ

मुलगी झाल्यावर असं स्वागत तुम्ही ह्याअगोदर कधी पाहिलं नसेल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पा आणि वायरल व्हिडीओ यांचं एक सुंदर नातं तयार होतं आहे. या व्हिडिओजच्या निमित्ताने आमच्या टीमलाही अनेक सकारात्मक बातम्या मिळताहेत ज्या आपल्या पर्यंत पोहोचवाव्यात असं आम्हाला वाटतं. आता हीच एक बातमी बघा ना. ही बातमी आहे मंगळवेढा तालुक्यातील. आपण सहसा ऐकतो, मुलगी शिकली प्रगती झाली. अनेक यशस्वी मुली, स्त्रिया यांच्या मुलाखती ऐकत असताना त्यांच्या आईवडिलांना त्यांना दिलेला पाठिंबा आपल्याला दिसतो. पण अजूनही काही ठिकाणी मुलगी जन्माला आल्यावर वाईट वाटणारे लोकंही असतात. पण मंगळवेढ्यातील अमर आणि धनश्री कावळे यांच्या कुटुंबाने मात्र नवीन मुलगी जन्मला आल्यावर आणि तिला घरी आणताना दाखवलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे.

या कुटुंबाने आपल्या घरात नव्याने दाखल झालेल्या या चिमुकलीचं अगदी जंगी स्वागत केलं. त्यांनी तिच्यासाठी फुलफुलांच्या पायघड्याही घातल्या. तसेच ही मुलगी घरात प्रवेश करत असताना मंगलमय वातावरण राहील याची प्रत्येक व्यवस्था केलेली होती. तसेच तिची चिमुकली पाऊले घरात उमटावीत म्हणूनही तयारी केलेली होती. घरी एखादं लहान मुलं जन्माला आल्यावर आनंद होत असतोच. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करणारे हे कुटुंब थोडं विरळच, पण त्यांचा यामागचा विचार हा स्पृहणीय म्हणावा असा. त्यांच्या या आनंदी , उत्साही आणि तेवढ्याच सकारात्मक वृत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या त्यांच्या आनंदात मराठी गप्पाची संपूर्ण टीम समाविष्ट आहे. आमच्या टिमकडून या चिमुकलीला जिचं नाव परी ठेवण्यात आलं आहे, तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभ आशिर्वाद आणि तिच्या कुटुंबाचं मनापासून कौतुक.

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पहा. त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया द्यायलाही विसरू नका. मराठी गप्पावर अशाच विविध वायरल बातम्या आणि वायरल व्हिडीओज यांच्याविषयीचे लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून सर्च करा आणि आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख मिळतील. तसेच नेहमीप्रमाणे आमचे नियमित वाचक आमचे लेख सातत्याने शेअर करत असतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *