आज आपल्या टीमने एक असा काही वायरल व्हिडियो पाहिला की ज्याने आमची हसून हसून मुरकुंडी वळली. एवढंच काय तर, सहसा आपली टीम प्रस्तावना लिहून मग मूळ विषयाबद्दल लिहीत असते. पण आजच्या या व्हिडियोविषयी काही प्रस्तावना सुचेना. हा ! एक वाक्य मात्र सुचलं आणि त्यातच सगळं आलं अस वाटून गेलं. हे वाक्य म्हणजे ‘अतरंगी मित्रांचा सतरंगी डान्स’. या वाक्यावरून तुम्हाला कल्पना आली असेलच की आपल्या टीमने आज कोणता व्हिडियो पाहिला असेल ते. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.
हा व्हिडियो म्हणजे सहा खोडकर मित्रांनी एकत्र येत केलेला एक डान्स परफॉर्मन्स आहे. पालघर जिल्ह्यातील कावळे येथील एका संस्थेच्या कार्यक्रमात या मुलांच्या डान्सने अगदी धमाल उडवून दिली होती. अर्थात हा काही नेहमी सारखा अगदी परफेक्ट स्टेप्स करत केलेला परफॉर्मन्स नाहीये. म्हणजे स्टेप्स ठरवून केलेल्या असल्या तरी त्यांच्यात विनोदी बाज जास्त वापरला गेला आहे. म्हणूनच या डान्सला अतरंगी मित्रांचा सतरंगी डान्स अस म्हणावसं वाटलं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला ही सहा जण स्टेज वर पाठमोरी उभी असलेली दिसून येतात.
नऊवारी साडी नेसली असली तरी ही सगळी मुलं आहेत हे काही सांगावं लागत नाही. उपस्थित प्रेक्षकांना ही त्याची कल्पना असते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच त्यांचा जल्लोष सुरू झालेला असतो. बरं त्यात डान्स करणारे अतरंगी आहेत याची प्रेक्षकांना कल्पना असल्यावर मग काय बघायलाच नको. बरं पहिलं गाणं ‘आली कडक लक्ष्मी आली’ हे असतं. त्यात आपल्याला एकेकांचे चेहरे बघायला मिळतात. नऊवारी साडीवर दाढी मिशा असलेले चेहरे पाहणं आपल्यासाठी प्रथमच असतं आणि बहुतेक शेवटचं असतं. पण हसू मात्र नक्की येतं. त्यात प्रत्येकाची हेअरस्टाईल म्हणजे बाप रे बाप. नंतर एकेक करत गाणी वाजायला लागतात आणि ही मंडळी डान्स करत राहतात. ‘कडक लक्ष्मी आली’ या गाण्यानंतर ढोल आणि ताशाचा आवाज ऐकू येऊ लागतो. त्यावरही या ग्रुपच्या मस्करीवाल्या डान्स स्टेप्स मुळे उपस्थितांना खूप आनंद होतो.
मग सुरू होतं ते ‘ढोलकीच्या तालावर’ हे गाणं. यावरही उपस्थितांना आवडेल असा डान्स केला जातो. मग ही सगळी मंडळी बसतात. आता बैठकीच्या लावणीची वेळ आहे असं वाटून जात. तेवढ्यात ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे सदाबहार गाणं ऐकू येत. पण त्यावर अपेक्षेपेक्षा कमी वेळ डान्स केला जातो. पण बैठक न बदलता, ‘दिल धक् धक् करने लगा’ या गाण्यावर या मंडळींचा गंमतीदार डान्स सुरू होतो. मग त्यातली दोन जण उठतात. त्यांची विनोदी अदाकारी बघून उपस्थितांना हसायला येतंच सोबत त्यातील एका मित्राला सुद्धा आपलं हसणं आवरत नाही. पण म्हणून डान्स थांबतो अस होत नाही. ‘दिल तो पागल हैं’ सिनेमतालं ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ हे गाणं आपल्या कानावर पडत. जुन्या आठवणी नक्कीच ताज्या करणारं हे गाणं.
मग येतं ते ‘निशाणा तुला दिसला ना’ हे प्रेमगीत. अर्थात ही मुलं त्यावर काय मजा करतात हे तुम्हांला व्हिडियो बघून जास्त कळेल. बरं बघायला गेलं तर बराच वेळ झालेला असतो. पण अजून दोन गाणी बाकी असतात. त्यातलं एक असतं, बाजीराव मस्तानी चित्रपटातलं ‘पिंगा गं पोरी पिंगा’. त्यावर या मुलांचा चांगला डान्स होतो. एव्हाना उपस्थितांना त्यांचा हा डान्स एवढा आवडलेला असतो की त्यांच्यावरून अनेक जण पैसे ओवाळून टाकत असतात. त्यांना हा परफॉर्मन्स कितीही आवडला तरी प्रत्येक परफॉर्मन्स कधी तरी संपतोच. तसाच हा परफॉर्मन्स ही अजून एक गाणं होऊन संपतो. यातही शेवटपर्यंत या मित्रांची मस्करी चालूच असते. पण त्यांची मस्करी आणि त्यांच्यातील ट्युनिंग तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आवडून जाते.
आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास, आपल्याला ही हा व्हिडियो आवडला असण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत असते आणि आपल्या भेटीस आणत असते. आपणही त्यास उत्तम असा प्रतिसाद देत आम्हाला प्रोत्साहन देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला येत्या काळातही मिळत राहू दे ही सदिच्छा. आम्हीही आपल्यासाठी नेहमीच उत्तम लेख लिहीत राहू याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख वाचा. सगळे लेख आवडीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :