Breaking News
Home / मनोरंजन / मुलांच्या शाळा लवकर चालू झाल्या पाहिजेत, नाहीतर अजून असे अतरंगी व्हिडीओ बनवत बसतील

मुलांच्या शाळा लवकर चालू झाल्या पाहिजेत, नाहीतर अजून असे अतरंगी व्हिडीओ बनवत बसतील

लहान पोरं आणि त्यांचं निरागस वागणं हे आपल्याला भावून जातं. अगदि प्रत्येक वेळी. पण हीच मुलं मोठी झाली की हळूहळू त्यांच्यातील निरागसता कमी होत जाते. अर्थात ती काही झटक्यात नाहीशी होत नाही. पण वय वाढण्यासोबत लहानांना ही आजूबाजूचा अनुभव यायला लागतो. त्यामुळे हुशारी वाढते. सोबत खोडकरपणा ही वाढतो. त्यामुळे आधीच्या निरंगसपणाची जागा आता या मुलांच्या खोड्या घेत असतात.

पण तरीही या खोड्या आपल्याला हव्या हव्या वाटतात. कारण एकदा का हे वय सरलं की मुलांचं एक वेगळं विश्वच तयार होतं. अस विश्व ज्यात आपल्याला काही अंशी प्रवेश असतो आणि नसतो सुद्धा. त्यामुळे या वयात त्यांच्या खोड्या, त्यांचं खट्याळ वागणं, मजा मस्करी करणं यांची गंमत अनुभवावी तेवढी कमी असते. त्यात या वयात मुलांना आणि त्यांच्या आजूबाजूच्यांना मुलांतील सुप्त गुण कळत असतात. त्यात ज्यांना खोड्या करायला आवडतात त्यांचं तर काय विचारू नका. त्यांना तर नवनवीन गोष्टी सुचत असतात, कळत असतात. कधी कधी तर आपल्याला ही त्यांचा हा खट्याळपणा अनुभवायला मिळतो. त्यात काही अतरंगीपणा असेल तर अजून धमाल.

आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. या व्हिडियोत आपल्याला भेटतो एक खट्याळ पण गोड पोरगा. कदाचित आपणही या मुलाचा हा धमाल व्हिडियो पाहिला असेल. नसेल पाहिला तर हा लेख वाचून त्याविषयी थोडक्यात जाणून घ्या आणि मग बघा. तर व्हिडियो सुरू होतो तेव्हाच हा मुलगा आपल्या समोर येतो. त्यामुळे अगदी पहिल्या क्षणापासून ते व्हिडियो संपेपर्यंत तो आपल्या समोर असतो. खरं तर तो व्हिडियोत अगदी अधे मध्ये ही आला असता तरी लक्षात राहीला असताच. याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील खट्याळ भाव. हा एक डान्स व्हिडियो आहे. त्यात एका लावणीच्या एका कडव्यावर हा मुलगा डान्स करत असताना हा व्हिडियो चित्रित केला आहे. त्यामुळे त्यातील बोलांवर या मुलाने केलेले हावभाव बघून हसायला येतं. त्यात ‘माझ्याकडे बघून लाजतोय आईना’ या वाक्यानंतर एके ठिकाणी ‘हां’ या शब्दावर एक बिट आहे. तो बिट हा मुलगा अगदी नकळतपणे पकडतो. खरं तर त्याच्याकडून हे नकळत होतं. पण त्यामुळे त्याचा हा डान्स बघताना केवळ विनोदी मनोरंजन होत नाही. तर बघताना एक चांगला डान्स बघण्याचा आनंद ही घेता येतो.

आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर या गोष्टीची दखल घेतली असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला तर जरूर बघा. आपल्याला आवडून जाईल. बरं व्हिडियो तसा मोठा नाहीये. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. त्यामुळे वेळेचा अपव्यय न होता ही मजा घेता येते. असो. आता यापेक्षा अजून त्याविषयी काही लिहिलं तर आपला वेळ दवडण्यासारखं होईल. त्यापेक्षा आमच्या टीमने शेअर केलेला व्हिडियो आपण जरूर बघा आणि त्याचा आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *