Breaking News
Home / मनोरंजन / मुलांनो आईच्या पसंतीचीच मुलगी करा रे… बघा हा अतरंगी व्हिडीओ

मुलांनो आईच्या पसंतीचीच मुलगी करा रे… बघा हा अतरंगी व्हिडीओ

लग्नामध्ये नवरी-नवरदेव, दाजी-मेहुणी, दीर-वहिनी यांच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची जोडी असतो. ही जोडी म्हणजेच सासू-सूनेची. मात्र, या जोडीच्या बाबतीत सासू आणि सून या दोघीही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जातात. त्यांचे व्हिडिओदेखील अतिशय कमीच पाहायला मिळतात. मात्र, सध्या असाच एक सासू- सूनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. जो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

आता या व्हिडीओत काय आहे हे समजून घेण्याआधी आपण हे नातं समजून घ्यायला हवं. ‘सासू-सून’ हे नातं कोडया सारखच असतं, पण हे नातं असतं बाकी मज्जेशीर… आपले पूर्वज सांगून गेलेत की सासू-सून ह्या आई-मुली सारख्या असतात. प्रत्येक घरात सासू आणि सूनेच वेगळच रूप पहायला मिळतं आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा ! काही घरांत सासू आणि सून दोघी खाष्ट असतात, तर काही घरांत सासू गरीब गाय आणि सून चंडीकेच दुसर रूप असते. काही घरांत याच्या उलट चित्र असत. सासू कजाग आणि सून मवाळ असते. आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका!

आता यात गंमत अशी कि या सासू – सुनांच्या भांडणात नवऱ्यांचं बिचाऱ्यांच भरीत होत. आता एखाद्या सासूला आपली सून आवडत नसेल तर काय होऊ शकतं, याचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच, काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामेच पाहिले असतील. पण किती दिवस तुम्ही फक्त असे ड्रामे पाहणार. त्यामुळे आता आपण हा खराखरा व्हिडीओ पाहणार आहोत.

या व्हिडीओत नवीन घरी आलेल्या सुनेला सासू स्वागत करत असते. यांच्याइकडे बहुदा नव्या नवरीचे स्वागत नारळ ओवाळून केले जाते. महाराष्ट्रातील बहुतांश भागात भाकरी-तुकडा ओवाळून टाकला जातो. मात्र जिथला हा व्हिडीओ आहे तिथे नारळ ओवाळून फेकला जातो. तर या व्हिडीओत गम्मत अशी झाली की, सासूबाईंनी कौतुकाने आपल्या सुनेवरून नारळ ओवळला पण फेकताना तो असा फेकला ज्यामुळे सुनेचा धडकन कपाळमोक्ष झाला.

म्हणजे नवा कोरा कडक नारळ खटकन नव्या सुनेच्या नाजुळ कपाळावर लागला. हाच व्हिडीओ नेमका व्हायरल झाला आणि लोकांनी म्हटले की, आईच्या आवडीची सून आली नाही की असंच होतं. खरं पाहिलं तर चुकून नारळ लागला आहे, पण नेटकर्यांनी मात्र मुद्दाम मारला असे म्हटले आहे. पण आमचे मत असे आहे की, नारळ चुकून लागला कारण नारळ लागल्यावर सासूबाई वेगाने सुनेकडे धावल्या आणि तिला जवळ केले. अगदी लेकीला लागल्यावर आई धावते तशीच धाव इथल्या सासूबाईंची होती. या व्हिडीओची काही लोकांनी टर उडवली असली तरी आम्ही ज्या पद्धतीने हा व्हिडीओ पाहिला त्यात आम्हाला नात्यात असणारा खरेपणा दिसला.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.