Breaking News
Home / बॉलीवुड / मुलाखत घ्यायला आलेल्या मुलीला हृदय देऊन बसले होते रजनीकांत, पहिल्याच भेटीत लग्नासाठी केले होते प्रपोज

मुलाखत घ्यायला आलेल्या मुलीला हृदय देऊन बसले होते रजनीकांत, पहिल्याच भेटीत लग्नासाठी केले होते प्रपोज

साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभेनेते रजनीकांत ह्यांना कोण ओळखत नाही, हे एक असे नाव आहे जे आजच्या काळात सर्वानाच माहिती आहे. रजनीकांत खासकरून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत, परंतु ते फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. रजनीकांत हे स्वतःमध्ये एक ओळख आहे, आणि त्यांच्यासाठी कोणत्या परिचयाची गरज भासत नाही. रजनीकांत ह्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. पूर्ण जग त्यांना रजनीकांत ह्या नावाने ओळखते. रजनीकांत ह्यांचं जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये कर्नाटक प्रदेश मधील बंगळूर येथे झाला होता. काही दिवसांअगोदरच त्यांनी आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. रजनीकांत ह्यांनी इतकं यश मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यांना चित्रपटात पहिली संधी १९७५ मध्ये मिळाली होती, त्यावेळी त्यांचे वय २५ वर्षे होते. ‘अपूर्व रागांगल’ ह्या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती. ह्या चित्रपटात कमल हसन ह्यांची मुख्य भूमिका होती.

रजनीकांत ह्यांना साउथचे लोकं देवाच्या स्वरूपात पूजतात. इतकंच नाही तर रजनीकांत ह्यांचे काही मंदिर सुद्धा बनवले आहेत. साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांत सुद्धा रजनीकांत ह्यांनी काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सर्व चाहत्यांची मने जिंकली. चित्रपटातील त्यांची ऍक्शन दृशे प्रेक्षकांना खूप आवडतात. भलेही ते चित्रपटात खूप ऍक्शन असलेल्या भूमिका निभावत असले तरी खऱ्या आयुष्यात ते एक खूप चांगले व्यक्ती आहेत. आज आम्ही तुम्हाला रजनीकांत ह्याच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. त्यांना त्या मुलीवर प्रेम झाले होते जी त्यांची मुलाखत घ्यायला गेली होती. पहिल्याच भेटीत रजनीकांत आपले हृदय देऊन बसले आणि पहिल्याच भेटीत त्यांनी लग्नासाठी प्रपोज केले. रजनीकांत ह्यांनी २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील लता रंगाचारी नावाच्या मुलीसोबत विवाह केला. ह्या दोघांची पहिली भेट १९८१ मध्ये झाली होती. दोघांचीही प्रेमकहाणी खूपच मनोरंजक आहे. खरंतर, रजनीकांत ‘थिल्लू-मल्लू’ ह्या चित्रपटाची शूटिंग करत होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या जवळ एका मुलाखतीसाठी विचारणा झाली. हि मुलाखत घेण्यासाठी लता रंगाचारी पोहोचल्या होत्या. लताजी ह्या कॉलेज मॅगजीनतर्फे मुलाखत घ्यायला आल्या होत्या. जेव्हा रजनीकांत ह्यांनी लता ह्यांना पाहिले तेव्हा पहिल्याच नजरेत त्यांना लताजींवर प्रेम झाले. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे मुलाखत संपता संपता रजनीकांत ह्यांनी लताजींना लग्नासाठी देखील विचारले.

जेव्हा रजनीकांत ह्यांनी लताजींना लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा हे ऐकून लताजी अगोदर तर थक्क झाल्या होत्या परंतु नंतर लताजींनी स्मितहास्य करत सांगितले होते कि त्यांच्या आईवडिलांशी ह्याबाबतीत बोलावे लागेल. रजनीकांत हे ह्या गोष्टीचा विचार करून त्रस्त झाले होते कि लताजींचे आईवडील लग्नासाठी होकार देतील की नाही ? परंतु दोघांच्या आईवडीलांनी लग्नासाठी होकार दिला. नंतर २६ फेब्रुवारी १९८१ मध्ये रजनीकांत आणि लताजींचे लग्न झाले. रजनीकांत ह्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या नावाच्या दोन मुली असून दोघीही लाइमलाईटपासून दूर राहतात. मुलगी ऐश्वर्याचा विवाह साऊथचा अभिनेता धनुष्य ह्याच्याशी झाला आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर रजनीकांत हे बस कंडक्टर म्हणून काम करत होते. एके दिवशी बसमध्ये त्यांची तिकीट फाडण्याची स्टाईल पाहून एक डायरेक्टर खूप प्रभावित झाले. त्यानंतर रजनीकांत ह्यांना चित्रपटात काम दिले होते. आता ते चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.