Breaking News
Home / मनोरंजन / मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही

सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात फोटोज वायरल होण्याचं प्रमाण हे प्रचंड होतं. मग कालांतराने मंदावत जात आज ते जणू नाहीसं झालंय. अर्थात अस असलं तरी त्याची जागा आता व्हिडियोजने घेतली आहे. अर्थात आता व्हिडियोज वायरल होण्यासाठी त्यातील कंटेंट ही तसाच असावा लागतो. त्यात काही तरी भन्नाट असावं लागतं.

कारण आधीच्या मानाने व्हिडियोज बनवणारे अनेक जण तयार झाले आहेत. तसेच यांतील बहुतेक जणांना आपला व्हिडियो वायरल व्हावा असं वाटत असतं. त्यासाठी मग त्यांचा प्रयत्न ही असतो. पण प्रेक्षक ही हुशार आहेतच. काहीही पाहून त्यास प्रसिद्धी मिळावी असं काही प्रेक्षकांकडून वागलं जात नाही. त्यामुळे अनेक मस्त मस्त व्हिडियोज हे कित्येक वर्षे झाली तरी वायरल होऊन फिरत असतात. आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ! हा व्हिडियो आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिला असू शकतो. किंबहुना आमच्या टीममध्ये ही काही जण असे आहेत ज्यांनी हा व्हिडियो काही वर्षांपूर्वी पाहिलेला आहे.

आज कसा काय तो पुन्हा आमच्या दृष्टीस पडला. त्यातील कंटेंट तेव्हाही मजेशीर वाटला होता. बरं यातील विषय हा तसा जुनाच आहे. हा व्हिडियो एका लहान बाळाच्या गंमतीदार वागण्यावर आधारलेला आहे. गंमतीदार म्हणावा कारण त्यातील बाळाला नक्की काय होतंय याची कल्पना नसते. अगदीच लहान वय असल्याने त्याला कशाचीच कल्पना नसते. अर्थात आजच्या काळातही हे असे व्हिडियोज आपण वरचेवर पाहतोच. असो. तर व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला एक कुटुंब एका जागी जमलेलं दिसतं. त्यात अगदी केंद्रस्थानी एक बाळ आणि बहुधा त्याची आई उभी असते. आजूबाजूला लहान मुलींपासून ते मोठ्या स्त्रीयांपर्यंत अनेक जणी असतात. बाळाला जेवण भरवलं जाण्याचा कार्यक्रम होत असतो. कार्यक्रमच म्हणायला हवा. कारण लहान मुलांना जेवण भरवणे आणि त्यांनी एकाच वेळी निमूटपणे ते खाणे म्हणजे नववं आश्चर्य मानायला हवं. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक घरी हेच चित्र दिसून येतं. फक्त या घरात चित्र थोडं वेगळं असतं. कसं वेगळं? तर हे बाळ धड जेवत नसतं. तोंडाजवळ जेवणाचा चमचा नेला की तोंड फिरवून घेतं. मग काय भरावणार कसं ? अख्खा दिवस तर पडला नाहीये पुढ्यात!

म्हणून मग याची आई एका बाटलीला हातात घेते. ती बाटली त्याच्या तोंडाजवळ नेते. अर्थात ती बाटली रिकामीच असते म्हणा. पण या बाटलीतून काही तरी प्यायला मिळेल या आशेने हे बाळ तोंड उघडतं आणि दुसरी एक व्यक्ती जेवणाचा चमचा त्याच्या तोंडात कोंबते. बरं हे एकदाच नाही तर वारंवार होत जातं. त्यामुळे या बाळाची कमाल वाटत जाते. अर्थात त्याचं वय लहान असल्याने त्याला त्या बाटलीतील फरक कळला नसावा आणि त्याने तोंड उघडलं असावं ही दाट शक्यता आहे किंवा अजूनही काही कारणं त्याच्या या वागण्यामागे असू शकतात. अर्थात ती कारणं काहीही असोत. पण हे निरागस बाळ त्याच्या अनभिज्ञ वागण्यामुळे आपसूक क्षणभर का होईना आपलं मनोरंजन करून जातं हे नक्की ! असो. आता लेखाच्या शेवटी एक गोष्ट मात्र नक्कीच नमूद करावीशी वाटते ती म्हणजे हा लेख लिहिण्यामागे केवळ वाचकांचेे मनोरंजन हा हेतू होता. आपली टीम कोणत्याही प्रकारे मद्य सेवन करण्यास प्रोत्साहन देत नव्हती, देत नाही आणि यापुढेही देणार नाही याची कृपया सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती !

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *