जगात तुम्हांला वेगवेगळ्या प्रकारची माणसं मिळतील. काही लोकं आपल्या चांगल्या कामामुळे लोकांच्या स्तुतीस पात्र ठरतात तर काही लोकं आपल्या वाईट कामांसाठी ओळखले जातात. तुम्ही सर्वांना अश्या अनेक बातम्या ऐकल्या असतील, ज्यात जेव्हा कोणत्या महिलेचा पती हे जग सोडून जातो तेव्हा तिच्या सासरचे तिच्यावर अ-न्याय करतात. तिचा छ-ळ करतात, इतकंच काय तर त्या महिलेला घरी राहणं देखील मुश्किल होऊन जातं. परंतु आज आम्ही मध्यप्रदेशमधील नरसिंगपूर जिल्ह्यातील एका कुटुंबाबद्दल माहिती देणार आहोत. ह्या कुटुंबाची आजूबाजूच्या प्रदेशात खूप चर्चा आणि प्रशंसा होत आहे. झौनटेश्वर मवई गावातील डेप्युटी रेंजर पदावरून निवृत्त झालेले रवी शंकर ह्यांचे पुत्र संजय सोनी ह्यांचे दोन महिन्यापूर्वी एका अपघातात नि-धन झाले.
ज्यामुळे घरातील सून आणि दोन मुलींच्या डोक्यावरची पित्याची छायाच हरपली होती. संजय सोनी ह्याच्या जाण्याने कुटुंबात खूप दुःखद वातावरण होते. कुटुंबातील सर्वजण खूप दुखी होते. खासकरून संजय सोनी ह्याच्या पत्नीवर खूपच वाईट परिस्थिती ओढवली होती, जे शब्दात वर्णन करणे खूपच कठीण आहे. रविशंकर ह्यांचा मुलगा संजय सोनीच्या जाण्यानंतर सुनेची रडून रडून खूप वाईट हालत झाली. पतीच्या जाण्याने ती पूर्णपणे तुटून गेली होती. संजयचा विवाह २००८ मध्ये करेली येथील राहणाऱ्या सरिता सोबत झाले होते. दोघांनाही दोन मुली असून एकीचे वय ११ वर्ष तर दुसऱ्या मुलीचे वय ९ वर्ष आहे.
२५ सप्टेंबर रोजी एका अपघातात संजयचे नि-धन झाले होते. ह्यादरम्यान संजयचे वडील रवी शंकर ह्यांनी खूप साहसी निर्णय घेतला. होय, रवी शंकर ह्यांनी आपल्या सुनेचे मत घेतल्यानंतर तिचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गेल्या महिन्यात गुरुवारी २६ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या सुनेची पाठवणी (विदाई) मुलीसारखी आपल्या घरातून केली. सासरे रविशंकर ह्यांनी आपल्या सुनेच्या वडिलांना आणि भावांना सांगितले होते कि त्यांनी सुनेसाठी योग्य अश्या मुलाचा शोध घ्यावा आणि रविशंकर ह्यांनी स्वतः सुद्धा जाऊन पाहिले कि आपली सून ज्या घरात जाणार ते घर तिच्यासाठी योग्य आहे कि नाही ते.
सुनेसाठी अनेक ठिकाणी स्थळे आली. काही ठिकाणी बोलणी झाल्या, परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा स्थळ जमत नव्हतं. शेवटी स्थळं शोधता शोधता जबलपूर जवळील पिपरीया येथील राजेश सोनी सोबत सुनेचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. रविशंकर ह्यांनी आपल्या मुलाची जी कार होती ती मुलीच्या नावे केली. जेव्हा त्यांचे पुत्र संजय सोनी ह्याचे नि-धन झाले तेव्हा त्याच्यानंतर विम्याचे ३ लाख ७६ हजार रुपये मिळाले होते. ते सर्व पैसे त्यांनी आपल्या सुनेच्या नावे केले. जे काही दागदागिने होते, ते सुद्धा सुनेला दिले. सुनेच्या दोन्ही मुलींच्या नावे एफडी सुद्धा केल्या.
सासरे रविशंकर ह्यांनी राजेश सोनी सोबत मुलीचे स्थळ पक्के केले. राजेश सोनी हे जबलपूरमध्ये ट्रान्सपोर्ट आणि रेस्टारंटचा व्यवसाय करतात. जवळजवळ ३ वर्षांपूर्वीच एका अपघातात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. राजेश सोनी ह्यांना अजून कोणी मुलं नाहीत, त्यांच्या कुटुंबात दोन भाऊ आहेत.
(फोटोमध्ये सासरे रविशंकर आणि सून सरिता)