Breaking News
Home / मनोरंजन / मुला-मुलींच्या ह्या ग्रुपने सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

मुला-मुलींच्या ह्या ग्रुपने सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज म्हंटले की काही ठोकताळे आपल्या मनात चट्कन येतात. जसे की एखादा डान्सचा वायरल व्हिडियो असेल तर सहसा एखाद्या लग्न समारंभातील किंवा एखाद्या उत्तम डान्सरचा व्हिडियो असेल. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो बघितला. हा डान्स व्हिडियो आहे एका समारंभातील. हा लग्न समारंभ नक्कीच नाही, पण कदाचित एका जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचा समारंभ असावा असं वाटतं. तसेच यात डान्स शिकलेली मंडळी नाचत असतात असं ही नाही. पण यात समाविष्ट असणाऱ्या सगळ्यांचा डान्स इतका उत्तम होतो की आपल्या लक्षात राहतो.

या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला एक जोडी डान्स फ्लोअर वर दिसून येते. गाणं सुरू होतं आणि ही दोघेही हलके हलके डान्स करायला लागतात. मग हळूहळू गाणं रंगत जातं तस तसा त्यांचा डान्स ही रंगत जातो. मग दुसरं गाणं सुरू होतं. या गाण्यासाठी नवीन जोडी डान्स फ्लोअर वर येते. हे गाणं असतं – झूट बोले कौआ काटे. लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजातलं हे गाणं बऱ्याच दिवसांनी ऐकून बरं वाटतं.

त्याला साजेसा असा छान डान्स ही केला जात असतो. शेवटी जेव्हा या जोडीतील मुलगी मैं मैके चले जाऊंगी म्हणत जात असते आणि मुलगा तिला ओढत दुसरी कडे घेऊन जातो ते गंमतीदार वाटतं. पुढे मग तीन मुलांचा ग्रुप येऊन ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या गाण्यावर डान्स करून जातो. त्यांच्या तोडीस तोड डान्स करण्यासाठी मग दोन मुली पुढे येतात. ‘परदेसी, तेरा यंहां कॊई नहीं’ या गाण्यावर छान परफॉर्मन्स देतात. एव्हाना आपल्या लक्षात येतं की चार गाणी आणि त्यावर मस्त असे डान्स झाले आहेत. पुढेही हा म्युझिकल सिलसिला चालू राहतो. जुनी हिंदी गाणी वाजत राहतात आणि त्यावर ही सगळी तरुण मंडळी छान छान डान्स करत राहतात. त्यात गदर सिनेमातील गाण्यावर एक मुलगा अगदी काही क्षणांचा पण उर्जावान परफॉर्मन्स देतो. जबरदस्त. पुढले परफॉर्मन्स ही त्याला साजेसे असतात. त्यात गाण्यानुसार केलेली कोरिओग्राफी भावून जाते. तसेच डान्स करणाऱ्यांमध्ये असणारा उत्साह आपल्याला ही उल्हसित करतो.

त्यात जेव्हा ‘उडे उडे, जब जब जुल्फे तेरी’ हे गाणं अजून मजा आणतं. कारण तोपर्यंत आपण सोलो किंवा जास्तीत जास्त तिघांचे एकत्र असे परफॉर्मन्स बघत आलेलो असतो. या डान्सच्या वेळी सगळी तरुण मंडळी एकत्र येतात. तसेच स्टेप्स सुद्धा गंमतीदार असतात त्यामुळे रंगत भरत जाते. हा उत्साह पूढे ही कायम राहतो. हा ग्रुप पुन्हा एकदा एकत्र येऊन नाचतो तो शेवटच्या गाण्यात. त्याआधी होणारं एक गाणंही आपल्या लक्षात राहतं. कुछ कुछ होता है या चित्रपटातलं टायटल सॉंग साजरं करताना ही मित्र मंडळी सगळ्यांची वाहवा मिळवतात. मग येते ती शेवटच्या गाण्याची वेळ. यात सगळा ग्रुप एकत्र येतो. गाणं सुरू होतं – मेहेंदि लगाके रखना, डोली सजा के रखना. पूर्ण ग्रुप नाचायला लागला की कशी छान मजा येते हे काही सांगायला नको. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते वातावरणात. आपणही कधी न कधी, याचा अनुभव घेतलेला असेलच. या परफॉर्मन्सचं वैशिष्ट्य असं की या परफॉर्मन्सच्या शेवटी ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे त्यांनाही सामील केलं जातं. वातावरणात प्रसन्नता असतेच आणि याच सकारात्मक वातावरणात विडीयो संपतो.

या व्हिडियोला बघताना खूप आनंद होतो. जवळपास १७ वेगवेगळी गाणी यात ऐकायला मिळतात. त्यावरचे तेवढेच छान डान्स बघायला मिळतात. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला नक्की आवडेल म्हणून हा लेखप्रपंच मांडला. आपल्यासाठी म्हणून टीमने केलेला हा लेख आपल्या पसंतीला उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लिहिण्यास प्रोत्साहन देत असता. तसेच मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करत असता. हा लेखही यास अपवाद नसणार. तेव्हा आपल्या या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !! येत्या काळातही आपला लोभ आमच्या टीमवर कायम राहू द्या ही सदिच्छा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *