आजकालच्या तंत्रज्ञानयुक्त जगात ऑनलाईन नातं बनणं खूप सोपं झालं आहे. बऱ्याचदा असं घडतं की, ज्या व्यक्ती ला आपण ओनलाइन भेटतो ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. यात जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जात असाल तर काही गोष्टी लक्षात असूद्यात. याने तुमची डेट पण परफेक्ट होईल आणि तुम्ही सुरक्षित ही राहाल. आम्ही तुम्हांला काही गोष्टी सांगू इच्छितो, ज्या तुमच्या ब्लाइंड डेटच्या वेळी खूप महत्वाच्या असतील. या गोष्टी लक्षात असूद्यात
1) ऑनलाईन रिसर्च
ही सुद्धा सुरक्षेची पुढची पायरी आहे . कित्येकदा लोक सोशल मीडिया वर त्यांच्या प्रोफाइल ची चूकीची माहिती देतात. अशात जर तुम्हाला स्वताला सुरक्षित ठेवायचे असेल तर त्या व्यक्तीबद्दल ऑनलाइन रिसर्च करा. आजकाल एक व्यक्ती बऱ्याच साइटवर दिसू शकतो. अशात] च तुम्ही त्या व्यक्तीची वेगवेगळ्या साईट्स वरची माहिती पडताळणी करून काढू शकता आणि स्वताला सुरक्षित ठेऊ शकता. समोरच्या व्यक्तीच्या कॉमन मित्रांशी बोलून त्यांच्याबद्दल ची माहिती काढू शकता आणि खरं काढून घेऊ शकता. हा तुमचा प्रयत्न भविष्यात तुम्हाला चुकीचे पाऊल टाकण्याआधी थांबवेल.
2) वेन्यू ची निवड करा
जर पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीला भेटायला जात असाल तर आपण आपल्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणून भेटण्यासाठी असे ठिकाण निश्चित करा, जे ठिकाण तुमचे जास्त परिचयाचे असेल. कोणत्या ही अपरिचित जागी जाण्याचा मुर्खपणा करू नका. कोणत्या जवळच्या व्यक्तीला पुरेशी कल्पना देऊन जा. जेणेकरून कोणतीही घटना होत असेल तर एखाद्या व्यक्तीला तरी त्याची कल्पना असू शकेल.
3) कॉल करा
जरी तुम्ही तुमच्या कोणत्या जवळच्या व्यक्तीशी ओनलाइन बोलणं करून भेटण्याचे ठरवलं असेल. तेव्हा असं करणं योग्य ठरेल, कि तुम्ही त्या व्यक्तीशी फोन वर थोडा वेळ घालवावा. जर आपण त्या व्यक्तीशी थोडा वेळ बोललात तर समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तीत्वाची आपल्याला कल्पना येईल. आणि फोनवर बोलल्यामुळे त्या व्यक्तीशी थोड्याच वेळात भेटल्यावर ट्युनिंग चांगलं जमू शकेल.
4) सकारात्मक संवाद
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीला भेटायला जाल तर तुमचा संवाद सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संवादाची सुरूवात सकारात्मक विचारांनी सुरू करा ज्याने करून तुम्हाला संवाद साधताना काही अडचणी येणार नाहीत.
5) पर्सनल संवाद टाळा
पहिल्या भेटीतून तुम्हाला एकमेकांची साथ आवडू लागली तरी ही पर्सनल संवाद शक्यतो टाळावे .जो पर्यंत तुमच्या नात्यात पूर्णपणे विश्र्वास येत नाही आणि आपल्या पर्सनल गोष्टींसह टांसपोर्ट ही शेअर करू नका. जर तुम्ही ह्या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची ब्लाइंड डेट सुरक्षित आणि चांगल्याप्रकारे होऊ शकते.