Breaking News
Home / मनोरंजन / मुलीच्या लग्नामध्ये वधूच्या आईने केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

मुलीच्या लग्नामध्ये वधूच्या आईने केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या मुलामुलींचं लग्न, साखरपुडा म्हणजे आई वडिलांसाठी महत्वाचे क्षण. ज्या आपल्या पाल्यांना आपण लहानाचं मोठं केलं त्यांना आयुष्यातील एका नवीन प्रवासास सुरुवात करताना बघून पालकांना आनंद होतोच. सोबतच आयुष्यातील एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली यांचंही समाधान असतंच. पण सहसा हा आनंद केवळ डोळ्यांतील अश्रुंमधूनच व्यक्त होत असे. पण काळ बदलतो आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या या महत्वाच्या वळणावर आता आई वडीलही मस्त मजा करत आपल्या पाल्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसून येतात. आपल्या टीमने गेल्या काही काळात असे व्हिडियोज बघितले आहेत. त्यातील काही व्हिडियोज वर लेखन केलं तर आपल्या वाचकांना ते आवडतील हे लक्षात घेऊन शॉर्टलिस्ट करून त्यावर लेख लिहीत आहोतच. त्यातील हे पहिलं लेखपुष्प. आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो आहे एका नवऱ्या मुलाच्या आईंनी केलेल्या धमाल डान्सचा. त्यात अजून कौतुकाची बाब म्हणजे यात काकूंना सोबत केली आहे त्यांच्या चार मैत्रिणींनी.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला दिसतात ते डीजे वाले. म्हणजे मस्त गाणी आणि धमाल मस्ती ठरलेली असते. त्यात ८० च्या दशकातील एका प्रसिद्ध गाण्याची धून वाजायला लागते आणि वर उल्लेख केलेल्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात. अर्थात त्यात काकू मध्यभागी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असतात. सगळ्या मैत्रिणींचा हा ग्रुप मॅचिंग रंगाच्या पोशाखात छान दिसत असतो. एव्हाना गाणं सुरू झालेलं असतं. झीनत अमान यांच्या कुर्बानी या चित्रपटातलं ‘आप जैसा कोई झिंदगी मैं आए’ हे ते गाणं. त्या काळातील संगीत पुन्हा एकून आपल्याला बरं वाटतं आणि सोबतीला डान्स असतोच. गाण्याच्या लयीनुसार या सगळ्याच जणी मस्त डान्स करत असतात. लाईव्ह प्रोडक्शन इंडिया यांनी या पूर्ण परफॉर्मन्सची कोरिओग्राफी केल्याचं कळतं. त्यांनी खरंच छान काम केलं आहे हे नक्की. जवळपास मिनिटभर हे गाणं आणि त्यावरील डान्स परफॉर्मन्स चालतो. मग एक मस्त अशी पोझ या सगळ्या जणी देतात आणि हे गाणं संपत. पण म्हणून परफॉर्मन्स संपतो का? नाही. तो अर्ध्यावर आलेला असतो.

अजून एक ऊर्जावान गाणं आणि तेवढाच छान परफॉर्मन्स आपल्या भेटीस येणार असतो. हे गाणं असतं, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या नृत्याने गाजवलेलं ‘छम्मा छम्मा’. चायना गेट चित्रपटातलं हे गाणं किती लोकप्रिय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आधीच्या गाण्याप्रमाणे या गाण्यावरही या सगळ्या मैत्रिणी छान डान्स करतात. मागील गाण्यावरील काही स्टेप्स पुन्हा बघायला मिळतात. पण असं असलं तरी हे गाणं आधीच्या गाण्यापेक्षा गतिमान आहे. कोरिओग्राफरने ही बाब लक्षात घेऊन स्टेप्स बसवलेल्या दिसतात. त्यामुळे डान्स करताना या सगळ्या जणींचा वेग त्या गाण्याशी जुळतो. हा परफॉर्मन्स ही जवळपास एक मिनीटाहून अधिक काळ चालतो. यात या सगळ्या मैत्रिणींना प्रोत्साहन देण्याची महत्वाची भूमिका बजावतात ते सगळे उपस्थित. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे वातावरणात उत्साह वाढता असतो. परफॉर्मन्स संपल्यावरही टाळ्यांनी हे प्रोत्साहन देणं सुरू राहतं आणि व्हिडियो संपतो. दोन ते अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ. पण खूप छान आनंद देऊन जातो. या व्हिडियोतील काकूंना आणि त्यांच्या मैत्रिणींना एवढ्या उत्तम रीतीने आयुष्याचा आनंद घेताना बघून एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते.

आयुष्य आनंदात आणि प्रसन्नतेने कसं जगायचं याचं एक उदाहरण बघायला मिळतं. आपल्या टीमला तर काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी सादर केलेला हा ऊर्जावान परफॉर्मन्स खूप आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असेल हे नक्की. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. गेला वर्ष दीड वर्षभर आपण सगळेच कठीण काळातून जात आहोत. पण असं असलं तरी आपल्या लेखांच्या निमित्ताने आपल्या वाचकांचं घटकाभर मनोरंजन व्हावं ही आपल्या टीमची इच्छा असते. आपणही आमचा हा हेतू समजून घेत, कमेंट्स मधून आम्हाला प्रोत्साहन देत असता. तसेच आपले लेख शेअर करत असता. या दोहोंमधून आपल्या टीमला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळते आणि उत्साह टिकून राहतो. तेव्हा येत्या काळातही आपला हा पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला कायम मिळत राहो ही सदिच्छा. लोभ असावा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *