Breaking News
Home / मनोरंजन / मुलीने वडिलांना स्टेजवर बोलावून सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

मुलीने वडिलांना स्टेजवर बोलावून सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

काही नाती ही केवळ निखळ प्रेमाची बनलेली असतात. जसे की वडील आणि मुलीचं नातं. जसं आई मुलाचं नातं मानलं जातं, तसंच हे वडील मुलीचं नातं. या वडील मुलीच्या नात्यातील अत्युच्च क्षण म्हणजे जेव्हा मुलीच्या लग्नाचा वेळ. या वेळी आपण जिला अगदी आता आता पर्यंत लहान समजत होतो तिचं लग्नसुद्धा व्हायला आलंय या भावनेने वडिलांच्या मनात काय काहूर माजलेलं असतं ते एक वडीलच समजू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला अशा वाडीलांपासून दुरावणार म्हणून मुलीची अवस्थाही काही वेगळी नसते. पण असं असलं तरीही त्या क्षणांचा आनंद ही असतोच. या आनंदाची मजा घेणंही महत्वाचं असतं. कारण हा क्षण पुन्हा पुन्हा येणार नसतो. अशाच एका लग्नातील एक सुखद प्रसंग आपल्या टीमने व्हिडियो रुपात पाहिला आणि त्याबद्दल लिहावं असं वाटून गेलं.

हा व्हिडियो आहे एका पंजाबी कुटुंबाच्या लग्नातला. यात नववधू होती ती म्हणजे पलक कोहली. या लग्नप्रसंगी पलक ही मंचावर येते. सोबत आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं लागलेलं असतं. पंजाबी म्युझिक ने बऱ्याच वेळेपासून सगळ्याना वेड लावलं आहे. हे गाणं त्याचं द्योतक म्हणायला हवं. ‘लेहेंगा’ हे ते प्रसिद्ध गाणं. एक बिलियन हुन अधिक व्ह्यूज मिळणारं हे गाणं. जस मानक यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत, संगीत दिग्दर्शन केलेलं आहे, गाणं गायलं आहे आणि ते गाण्यात परफॉर्मन्स देताना ही दिसूनही येतात. असं हे लोकप्रिय गाणं वाजत असतं. पलक मस्त एन्जॉय करत डान्स करत असते. पण असं असलं तरी या गाण्यात तिच्या प्रिय वडिलांनी सामील व्हावं असं तिला वाटत असतं. मग काय, कॅमेराच्या पाठून ती त्यांना बोलावते. काका ही येतात. पण त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलीला आनंदी बघून एक प्रकारचं समाधान असतं. हे समाधान मानून घेत असताना ते केवळ कौतुकाने आपल्या मुलीकडे पाहत असतात. जिला अगदी आता आता पर्यंत लहान समजत होतो तिचं लग्न होतंय असे काहीसे विचार त्यांच्या मनात असावेत. त्याचेवळी पलक ही आपल्या डान्स मध्ये गुंग असते. पण तिच्या डान्सच्या केंद्रस्थानी तिचे वडील असतात.

ती त्यांना त्या डान्स मध्ये घेऊ पाहते. ते ही तिला आलिंगन देतात आणि मग बाजूला उभे राहतात.त्यांच्या देहबोलीतून त्यांना वाटणारं समाधान झळकत असतं. तसेच आपल्या वडिलांसोबत मंचावर डान्स करण्यात पलक व्यस्त असते. अगदी एका मिनिटाचा असा हा व्हिडियो आहे. पण खूप सारा आनंद देऊन जातो. पलक आणि तिच्या वडिलांमुळे या व्हिडियोला चार चांद लागतात हे नक्की. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला हा व्हिडियो नक्की आवडला असेलच. याचप्रमाणे आपल्या मराठी गप्पा टीमने या व्हिडियोवर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. आपणही अगदी आवडीने हे लेख शेअर करत असतात. आपला प्रत्येक शेअर आमचं प्रोत्साहन वाढवतं असतो. तेव्हा आपलं प्रोत्साहन देणं सुरू ठेवा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *